पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चेन्नई एक्स्प्रेस

चेन्नई एक्सप्रेस नावाचा एक सुंदर सिनेमा /पिक्चर होता.कथा आणि त्याच चित्रीकरण,याच्यात खूप सुंदर असं निसर्गरम्य निसर्ग दाखवला होता .दूध सागर धबधबा दाखवला होता. त्या शुटिंग मुळे आम्हाला मैत्रिणींना चेन्नईला जाण्याची खूप ओढ निर्माण झाली होती. 

पर्यटनाचा फॅड हल्ली वाढलंच आहे. त्यानुसार आम्ही सतत पर्यटनाचे बेत आखत असायचो,तेच थ्रिल मानत होतो.

फार वर्षांपूर्वी लोकप्रभामध्ये विचित्र या शब्दाला सुद्धा चिवित्र म्हणायची पद्धत होती. आणि त्यानुसार लेख आले होते.

 मी आज जी कथा सांगणारे ती सुद्धा,अशा पावसाच्या एका काळ्याकभिन्न कर्दनकाळ रात्रीच्या ,चिवित्र घटनेचीच आहे.

तर ग्रुपचा  तिरुपतीला जायचं आणि त्यापूर्वी चेन्नईला एका मैत्रिणीच्या,आशाच्या नातेवाईकाचे घरी राहायचं, किंवा  हॉटेलात राहायचे असा बेत होतो.पूर्वतयारीचा आढावा,कुणी काय खाऊ आणायचा,काय बघायचे त्याची रिविजन करावी ,खायला निमित्त म्हणून ,बेत करून आम्ही पाच जणी, आदले दिवशी एका हॉटेलमध्ये जमलो. खूप हसलो,तरंगत होतो. आमच्या पर्यटनाच्या लिस्ट मधल्या यादीत अजून एक निसर्गरम्य ठिकाण जमा होणार होतं. नवल म्हणजे ते आधी कुणीच बघितलेलं नव्हतं आणि तिरुपती देवाची महती माहिती असल्यामुळे सगळ्याजणी उत्साहित होतो .दुसऱ्या दिवशीचे चेन्नई एक्सप्रेसचे कन्फर्म तिकीट होतं.

जायचा दिवस उजाडला .दादरला प्लॅटफॉर्मवरुन संध्याकाळी ट्रेन सुटणार होती. आणि त्यानुसार आम्ही प्लॅटफॉर्मवर एकेक जण ,एकेक ग्रुप तीन जणी ,अशा पाचजणी येऊ लागलो.

 पण नवल म्हणजे पाच जणी जरी जमलो मात्र अचानक विजेचा कडकडाट झाला.अशुभ सारखा पाऊस अनपेक्षित आला.रडल्यासारखा आवाज झाला आणि जोरात पाऊस सुरू झाला . 

माझ्या या तीन मैत्रिणी त्यांना मजा करायची म्हणून खूप हौसावल्या होत्या .पण माहित नाही काय झाल,त्यांचा दोघींचा अतिशय मूड गेला.वीज गेली ,सर्वजणी कावराबावरा होत होत्या आणि तिसरी तर ,स्टेशन वरचे आवाजाच्या ओरड्याला घाबरली,जवळजवळ रडायला लागली.

"तिरुपती राहू दे ,मद्रास राहू दे, सगळं राहू दे. मी बाई घरी जाते."ज्योति  असं म्हणू लागली .पाच तिकिट होती आणि बेतानुसार जमलो होतो. तरी त्यातल्या तीन जणी आम्ही तुम्हाला सांगायलाच आलो की आम्ही येत नाही.नाही येत,तुम्ही दोघींच जा, असं म्हणून अचानकच निघून गेल्या.

नेहमीप्रमाणे माझ्या नशिबानुसार मी अडकले.मी भित्री आणि आशा वकील आणि खंबीर न डळमळणारी होती ती दोघीचणी त्या चेन्नई एक्सप्रेस प्रवासामध्ये ऊरलो होतो .

मग तिकिटाची पण फजिती, तिघींची तिकीट कॅन्सल केल्यामुळे ,आम्ही वेगळ्या वेगळ्या बर्थ वर असल्यामुळे, आशा ती वेगळ्या ठिकाणी आणि मी वेगळ्या ठिकाणी होतो .

असेही काय चेन्नई एक्सप्रेस झपाट्याने जात होती. थोड्या वेळाने पाऊस थोडा कमी झाला आणि रात्रीचा प्रवास होता. आम्ही चेन्नईला सकाळी पोहोचणार होतो. तसं झालं वेळेवर सकाळी आम्ही चेन्नईला पोहोचलो. एगमोर रेल्वे स्टेशनवर आशाचा मित्र आम्हाला घ्यायला आला होता. रेल्वे स्टेशन वरून आम्ही त्या आशा च्या मित्राच्या घरीच गेलो. मी आशाला म्हटलं,

" तू तर म्हणाली भारी हॉटेल बुक केले आहे,भारी हॉटेल बुक केलेय.मग हे काय?". 

"अग हॉटेल काय परवडणार आहे का? माझा मित्र आहे आणि त्याच्या घरी आपण राहू या, काही बिघडत नाही. तीन-चार हजार हॉटेलचे देण्यापेक्षा त्याच्या घरी सगळ्या सोयी आहेत.सहा खोल्या आहेत.नोकर,स्वयंपाकिण आहे .तो बंगला हेरिटेज वास्तू आहे. ठीक आहे तुझा आग्रहच असेल तर रात्री जाऊ हॉटेलात"आशा

आम्ही त्या मित्राच्या घरी पोचलो.हा मित्र,सूरज पण कळकटलेले होता .त्याचे घर पण कळकळलेलं होतं आणि स्वयंपाक घर तर भयंकर घाणेरडे होत.सूरज वकील होता . तो एकटाच राहतो. त्यामुळे त्याच्याकडे मोलकरीण येऊन स्वयंपाक करून जायची .

मोलकरणीने तिच्या परीने स्वयंपाक चांगला केला होता. आम्ही खाल्ला. आशाने नेहमीप्रमाणे, आपण घराची मालकीण आहोत असा हक्क दाखवण्यासाठी,

तिला, हे जमलं नाही ,ते जमलं नाही,ओटा स्वच्छ नाही. वगैरे.' कुरकुर केली. पण मोलकरीण न बोलता तिथे सगळं आवरून निघून गेली.मग आम्ही तयार होवून निघालो. दिवसभर इथे तिथे फिरलो.नट चिरंजीवी याचा बंगला बघितला आणि गोल्डन रॉक सीटवर,ब्रिजवर गेलो .समुद्र अनुभव घेतला. येऊ न शकणाऱ्या मैत्रिणींना जेलसी वाटावी, म्हणून तिथे व्हिडिओ कॉल करून त्या मैत्रिणींना आमचा आनंद सुद्धा दाखवला. तोपर्यंत सर्व ठीकठाक होतं. पाऊस पण थांबलेला होता आणि पावसाचे चिन्ह पण नव्हतं .नंतर बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि चेन्नईचा फील घेतला. त्सुनामीमुळे खूप कुप्रसिद्ध झालेल्या एरियात पण फिरलो. तिथे आशाने एक बंगला विकत घेतला होता केअर टेकर ला पैसे देऊन त्या बंगल्याचे काम काज बघितलं .बंगला जवळजवळ पूर्णच होत आला होता. नंतर एका हॉटेलला जेवलो.

तिरुपतीच्या ट्रीप ची चौकशी केली ट्रॅव्हल कंपनीतून तिरुपतीला जायचं ,खर्च,धर्मशाला बुकिंग चौकशी केली. मात्र सगळ्या गाड्या फुल होत्या आणि त्या ,तिरुमला एरिया मध्ये खूप दमदार पाऊस होत होता. अवकाळी पाऊस होता. आम्ही चेन्नईचा आनंद मात्र घेतला आणि रात्रीच्या वेळी घरी परतीचे रस्त्यावर आलो. तेव्हा मला लक्षात आलं की ,अरे ह्या सुरज नावाच्या मित्राकडेच रात्री राहायचा तिचा बेत दिसतोय .

मी आशाला म्हटले,

" आशा अग रात्री राहायचे हॉटेल तरी घेऊ या!"

" गप्प बस ग तू जा हव तर,तुला ईथे कोण बघतंय?सूरज तर बघणार नाही" असं म्हणून तिने मला गप्प केलं. एकटीने हॉटेलची खोली घेऊन राहणे एवढी मी बोल्ड नाही .

आम्ही घरी आलो. घर भरपूर मोठं होतं .खरं तर तो मोठा वीस हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट होता आणि त्यातल्या पुढच्या भागात एका बैठ्या बंगल्यात त्या मित्राचे सासरे अप्पा राहत होते.एक अय्यप्पा मंदिर होतं. धार्मिक वातावरण होतं. तुळशीवृंदावन होतं आणि त्या अवेळी ते सूरजचे सासरे तिथे उघडे बंब पूजा करत होते. त्या सासर्यांनी तिरप्या नजरेने मला, आशाला आणि त्या मित्राला सुद्धा बघून घेतलं.परत मंत्र पुटपुटले आणि आपले लक्ष नाही असं दाखवत आत गेले. आम्ही पुढे बंगल्यात आलो .आशा मला म्हणाली ,

"हे त्या सूरजचे सासरे.सूरजची बायको वेगळी  झालीय,सूरज यांची बायको मुलीकडे राहायला अमेरिकेला गेली आहे .जवळजवळ त्यांच्या घटस्फोट झालेला आहे. ही सर्व प्रॉपर्टी सुरतचे सासरे आप्पा यांचीच आहे. तरी ती सुरज ची बायको म्हणते मला प्रॉपर्टी नको .काही नको, काही नको .तिने कोर्टात सुद्धा लिहून दिले .त्यामुळे हा बंगला ,ही प्रॉपर्टी ही सगळी माझ्या मित्राची सूरजची, म्हणजे पर्यायाने माझीच आहे."

" मग ते सासरे?"मी

" अगं हा सगळा प्लॉट त्यांचा आहे. त्यामुळे त्या प्लॉटच्या कोपऱ्यात, ते सासरे जिवंत असेपर्यंत राहतील.सूरजी बायको ही एकुलती एक,जीवित मुलगी होती ना.आता कायदे-कानून  नुसार सर्व सूरज सरांचे झाले आहे."

" अच्छा असं होय!"मी 

दोघे काही बोलले नाही .सूरज हुशार वकील होता.बघून नजरेने लोकांना ओळखू शकत होता.रात्री,त्या हेरिटेज भूतबंगला मधील, एका खोलीत ,एका बाजूला मी ,दुसऱ्या बाजूला ती मैत्रीण आशा,अशा आम्ही निजलो .घरात खूप जुन्या वस्तू होत्या.आत ऐतिहासिक अडकिते, जुनी भांडी, फ्रेम ,बिद्रीवर्क केलेल्या वस्तू ,जुन्या प्रकारच्या किल्ल्या ,झुंबर फर्नीचर होते. खूप मोठे घराचे आवार होते. जुन विटांचे,दगडी देवडींचे बांधकाम होतं.सिमेंटची एक खोली होती.रंग उडाला होता.तरी मजबूत आणि काही भाग लाकडी,दार कोरिव अस घर ,पारंपरिक चांगलं होतं .

खूप दमल्यामुळे मला झोप लागली. पण रात्री साडे बाराच्या दरम्यान मला दरदरून घाम फुटला आणि जाग आली. समोरच्या पलंगावर आशा नव्हती. ठीक आहे ती तिच्या मित्राला सूरजला भेटायला आली होती .कदाचित मित्राच्या खोलीत गेली असेल ,अस मनाशी म्हणून मी फारसं मनावर घेतलं नाही .मी कुशीवर वळले.

आणि माझं लक्ष पंख्याकडे गेलं .छतावर लटकत असलेल्या,बंद , जुन्या काळच्या पंख्याला दोरखंडाने काहीतरी लटकत होतं .बापरे या आशाने तर काही भानगड केली नाही ना !मी भयंकर घाबरले .माझे नशीबाचा आहे की तिथे प्रॉब्लेम असेल तिथे सगळ्यात आधी माझा पाय जातो .पण फासावर लटकलेली बाई दुसरीच कोणीतरी होती .साउथ इंडियन बायकांसारखे रुप,नाकात मोठे मोठे मुरण्या घातल्या होत्या.पिवळा दोरा आणि खड्याचे दागिने होते. लांब काळेभोर केस होते. एका उंच स्टूल वरून, कुणीतरी त्या बाईचं प्रेत/देह उतरवायचा प्रयत्न करत होत. ते स्टूल खालून आशाच्या मित्राने धरल होत .

मला दरदरून घाम फुटला .समोरच्या खिडकीतून येणाऱ्या कवडशाच्या प्रकाशात, मला एवढेच दिसलं .त्याहून अधिक दिसलं नाही.

 पण जास्त निरखून बघता, ती दिसणारी आकृती निघून गेली. ते चित्र धूसर झालं आणि समोर काहीच दिसेना.

 माझी झोप उडाली पण मी ओरडु किंवा काहीही सांगू शकले नाही. मी तसच झोपायचा प्रयत्न केला. आणि झोपले.

 सकाळी मी उठले तेव्हा आशा आणि तिचा मित्र समुद्रकिनारी फिरायला गेले होते.ती आम्रपाली नावाची मोलकरीण आली होती. आम्रपालीने मला चहा करून दिला. मी तिला म्हटलं ,

"रात्री मला इथे फार विचित्र स्वप्न पडलं. या खोलीत काही आत्मा आहे का? मला असं दिसलं की ..."

आम्रपाली  माझ्याकडे रिकाम्या डोळ्यांनी बघत बसली आणि म्हणाली की ,

"साहेबांच्या बहीणीने तसं काहीतरी त्या खोलीत करून घेतलं होतं खरं! सूरज सरांचे बायकोने तो प्रयत्न केला होता. बाईंना घटस्फोट घ्यायचा होता, पण बाईंचे वडील आप्पा जुन्या विचाराचे होते ते बाईंना घटस्पोट घेऊ देत नव्हते. त्यामुळे बाईंनी असा काहीतरी प्रयत्न केला होता. पण त्या फास लावणे तून वाचल्यावर आप्पा बाईंना घेऊन त्या समोरच्या बंगल्यात राहायला गेले. कित्येक वर्षे सुरज सर या बंगल्यात एकटेच राहतात .अर्थात या बातम्या, हे कळलेलं कांड असं आमच्या ऐकिवात आहे."

" बहिणीने की पत्नीने?"मी

 "हो मिळवलेली माहिती सांगते कि या खोलीत,नंतर एका बाईने असं करून घेतलं .लहान वयाची होती .त्या प्रसंगावर काही बोलू नये.भय वाटते. गरिबाला पोटासाठी कुठेतरी काम करावंच लागतं साहेब पैशाची कुरकुर करत नाही आणि माझी कोर्टाची केस सुद्धा फुकट चालवतात .त्यामुळे मी नाईलाजानेच या बंगल्यात काम करते .ती बाहेर उंच पायऱ्या पायऱ्यांची जी दगडी विहीर दिसते ना ,ती पण भूताची आहे.त्या फाशी प्रकरणानंतर साहेबांची बायको माहेरी, पुढे परदेशी निघून गेली. सुरज सरांप्रमाणे ती पण वकील होती. तिला कुठेतरी परदेशात चांगली नोकरी लागली .आता मुलगी आणि आई परदेशातच राहतात .अप्पा मात्र इथे त्यांचं गणगोत आहेत म्हणून चेन्नईतच राहतात .काही वर्ष सुरज सरांची

बायको आणि मुलगी तो बाहेरचा बंगला आहे ना,ते देऊळ ,तो हा सर्व भाग त्या बाईंच्या वडिलांचा ,अप्पांचा आहे. तिथेच सूरज सरांची पत्नी राहिली. कधीही ती या घरी आली नाही .मुलगी होती ,घर सोडल तेव्हा पाच वर्षाची होती.मुलीला तिनेच वाढवलं."

"काका आणि सूरज साहेब ?"मी विचारले

"साहेबांकडे वेगळ्या वेगळ्या मैत्रिणी यायच्या. आता गेली पाच वर्ष ही आशा मॅडम नावाची ही तुमची मैत्रीण येते ."मोलकरणीने माहिती पुरवली.

 तोच दाराचे फाटक वाजलं. चोर पावलांनी ,आशा हाती,कोर्ट कामाची फाईल,पिशवीत घेवून येत आहे ,हे लक्षात येताच मी विषय बदलला .

"इडली बहुत अच्छा बनाते हो आप! कैसे बनाते हो ?"असं करून मी त्या चुलीशी स्वयंपाक करणाऱ्या बाईशी ,आम्रपाली शी विषय बदलून बोलायला सुरुवात केली. 

स्वयंपाक खोलीत जुना पितळी बंब पितळी हांडे पितळी देवघरासारखे एक चौकट तुटकी मुटकी एक खुर्ची कोरीव काम केलेले हत्तीचा डिझाईन असलेला एक टीपॉय होता. अशा घरभर जुन्या वस्तू होत्या. उभा नाचणारा गणपती होता .नटराजाची मोठी मूर्ती होती. कळकटलेला फ्रेम केलेला कौटुंबिक फोटो होता,त्यात तो स्वप्नात दिसलेला पंखा होता. लाकडी मेज,घोडा होता.चक्क आशाच्या मित्रानी सूरजने धरला होता .मी हादरले .डोळे फाडून फाडून बघत राहिले. एक मोठी समई होती. त्या नटराजाच्या मूर्तीच्या पायाशी घुंगरू ठेवले होते.

 मला तर परत फॅन आठवला.बेडरुमच्या फॅन वर लक्ष गेलं .फॅनच्या खोलीत एक उंच स्टूल ,घोडा ठेवला होता.

काल भास झाला त्यात होता तसाच होता.काल फॅनला दोरखंडाने मान लटकवून घेतलेल्या बाईचं प्रेत, त्या उंच स्टूलवर चढून कुणीतरी पुरुष खाली उतरवत होता. मी डोळे फाडून पडून अंधारात बघत होते .काय चाललंय?

ईथे दोर आणि मी काल बघितलं तो स्टूल,जो खालून आशाच्या मित्राने धरलेला होता तो त्या पुढचे खोलीत होता.

काल तो मित्र आणि सर्व आकृती धुसर झाली होती. काहीच दिसेना झमलाल होत,मला भास झाला होता का काय ?की स्वप्न  पडल होत?

काल प्रकाशाच्या कवड्याच्या मला तेवढेच दिसलं होतं ते खरं होतं का खोटं होतं ?का स्वप्न होतं का भास होता? मला काहीच समजेना.

 मी डायनिंग टेबल वरून उठून गॅलरीत आले. समोर एका सुप्रसिद्ध नटाचा बंगला होता .तोच नट आशा च्या मित्राकडे ही सर्व प्रॉपर्टी विकत देखील मागत होता .पण आशाच्या मित्राने, वकील असल्यामुळे ,नकार दिला होता.

काल बराच वेळ मी झोपे वाचून तळमळत होते. पहाटे जाग आली तेव्हा परत दामटून झोपले होते. नंतर उशिरा जाग आली, तेव्हा सात वाजले होते .मग बागेत फिरत,देऊळ बघत दुपार झाली. स्वयंपाक खोलीतून मोलकरीण स्वयंपाक करण्याचा आवाज येत होता.आशा आणि तिचा मित्र बाहेर कामा निमित्त कुणा साक्षीदाराला भेटायला,फिरायला गेले होते. मी आतल्या खोलीत आले .मोलकर्णीने मला परत चहा करून दिला. बाकीचे सगळेजण कॉफीच पितात (मद्रासला )म्हणून चहा सुद्धा तिच्याकडे धड नव्हता.कडु आणि कमी दुधाचा चव पण नव्हती. पण मी टोस्ट पण खाल्ला.

 मी त्या मोलकरीणीशी,आम्रपाली शी, परत थोडा संवाद साधायचा प्रयत्न केला. ती ओरिसाची होती. तिला हिंदी थोडं थोडं समजत होतं. मी तिला विचारले ,

"या घराचा काही भयाण इतिहास आहे का?इतक सुंदर घर ,करोडोची प्रॉपर्टी ,असं जुनं जुनं का ठेवलंय? किती धुळ माती,पडदे खराब,काय या मच्छरदाण्या कळकटलेल्या, तुम्ही ते पडदे काढून धूत का नाही?साहेब ते देऊळ,विहीरीचा काठ आणि घराला रंगरंगोटी का करत नाही?"

 ती मला म्हणाली,

" बाई काहीतरी कायदेशीर गडबड आहे .कोर्ट केस आहे ."

"मला रात्री स्वप्न पडलं की पंख्याला फास लावून प्रेत लटकते. असं काही खरच या घरी घडलं होतं का ?साहेबांची बायको खरच  कुठे आहे? काय या घरातच कुठे आत जमिनीत गाढून टाकली आहे"मी

"नक्की  कल्पना नाही . साहेब जे सांगतात त्यावर आम्ही विश्वास ठेवतो साहेबांची बायको अमेरिकेला मुलीकडे राहते. पण तुम्ही म्हणता तसं या घरात घडलं होतं असा एक विवाद कानावर आहे .आतल्या खोलीत साहेबांच्या बहीणीने फास लावून घेतला होता आणि त्या प्रसंगा नंतर साहेबांची बायको वडलांकडे राहायला गेली. तुम्हाला मी काल सांगितलं ना ते कोपऱ्यावरचे घर आहे ना समोरच ते त्यांच्या वडिलांचं आहे.तिथे बाई राहात होती. पाच वर्षाची मुलगी घेऊन गेली ,ती तिथेच राहिली. कोर्टात पण लिहून दिला मला प्रॉपर्टी नको .काही नको ,काही नको .सूरज सरांना घटस्फोट लिहून दिला. साहेबांनी लग्न नाही केलं पण वेगळ्या वेगळ्या मैत्रिणी येत असतात. गेले पाच वर्षे झाली, ही आशा मॅडम नावाचीच मैत्रीण आहे ."

मी खोदून विचारले तेव्हा आम्रपालीने निर्मळ मनाने न लपवता खुल्लम खुल्ला सांगितलं. 

आशा आणि तिचा मित्र फिरून,साक्षीदाराशी चर्चा करुन आले होते. त्यामुळे विषय संपला. आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केले.कपडे केले आणि दिवसभरासाठी परत बाहेर कोर्टात गेलो.ते कामा करिता कोर्टात फिरत होते.आशाने मला एका देवळात  बसायला सांगितलं.जर कंटाळा आला तर कोर्टात ये म्हणून  सांगितले . थोडा वेळ मी देवळात बसले .पण लोक अगदीच मला, घरून भांडून आलेल्या मुलीकडे बघाव त्यासारखं किंवा बेवारस असल्यासारखं बघत होते .त्यामुळे मी कोर्टात एका लिंबोणीच्या झाडाखाली, दगडी बाकावर येऊन बसले .दिवस कोर्टात गेला. पाच वाजता कोर्टातून परत निघालो. पण परत मी आशाला म्हणाले ,

" आज आपण हॉटेलला राहू या.मी पैसे देते ना ग !म्हणजे त्या बंगल्यात परत नको जायला,चालवणार नाही ,सहन होतं नाही,खूप डास चावले, मला झोप नाही आली. असे आजारपण येईल.तूला सांगितले नाही पण पंखा फास्ट होता. रात्रीची झोप येत नाही." वगैरे वगैरे सांगितलं, पण तिने दुर्लक्ष केलं.

या दुसऱ्या दिवशी रात्री आशाच्या एका परिचितांकडे लांब वर आम्ही रिक्षाने गेलो. ट्रॅफिक खूप लागला ,म्हणून वाटेतच रिक्षा सोडली. तिथून पुढे जवळजवळ मैल भर चालत आम्ही त्या माणसाकडे गेलो .पौर्णिमेचा दिवस होता. संध्याकाळची छान हवा होती.मोठा चंद्र उगवला होता .ज्यांच्याकडे गेलो त्यांचे घर निसर्गरम्य होते. मोठी टेरेस होती .भरपूर झाडे लावलेली होती. कुंड्यांमध्ये फुल होती .मोगरा घमघमाट करत होता.आंब्याचे झाड, तिथून चंद्र डोकावताना दिसत होता. माझी आशा नावाची मैत्रीण आणि तिचा मित्र यांना त्या घरमालकाशी, त्या गृहस्थाशी ,जे जज होते,काहीतरी कोर्टकचेरीबद्दल चर्चा करायची होती. ते चर्चा करत बसले. मी गॅलरीत बसले .त्या सद्ग्रुहस्ताची बायको सुद्धा माझ्याशी गप्पा मारायला येऊन बसली. ती म्हणाली ,

"तुम्ही आशाच्या मैत्रीण का?"

 त्यांच्या प्रश्नावर मी हो एवढंच बोलून गप्प बसले.त्या चहा/कॉफी  करायला आत गेल्या .आतून आशा आली आणि म्हणाली,

" त्यांना काहीही माझ्या ,सूरजच्या खाजगी गोष्टी सांगायच्या नाही." मी ठीक म्हणाले आणि गप्प बसले .पण चहा घेवून आल्यावर त्याच बाई सांगू लागल्या,

" त्या बंगल्यात त्या खोलीत तुम्हाला काही भास होतात का हो ?तुम्ही त्या घरी राहिलात तेव्हा ,मानवी नाही असं काही तीन पायाच जाणवलं का?झोप लागली नाही ,खोलीत काही आहे अस वाटल का ?आंब्यावर काही भूत दिसलं का?तुम्हाला आंब्याच्या झाडावर लटकलेलं प्रेत दिसल का?"त्या

"नाही काय झाल,काय इतिहास आहे?"मी विचारल.

" एक त्यांनी पूर्वी पुरुष पेंईंग गेस्ट  ठेवला होता .त्याला स्वप्नात एक माणूस येऊन सांगायचा, की मला सूरजने ठार मारलं. ज्या रॉडनी खून केला तो रॉड माळ्यावर पडलाय. त्या पाहुणा माणसाने स्टूलवर चढून बघितलं,तर माळ्यावर रॉड होता. वेगवेगळी पत्र होती. चित्र होती .या सूरजचे,मित्राच्या पत्नीचे ,काही कागद,डॉक्टरचे रिपोर्ट,होते.सूरजने कोणीतरी दूरच्या नात्यातली, पत्नीच्या नात्यातली बाई ,घरकामाला आणली होती .ती बाई तिथे वारली .धो धो पाऊस पडत होता आणि काय घडलं माहित नाही .रात्री तिने फास लावून घेतला .सूरज सर ,मॅडम सगळे वकील आणि जज आहेत ना !हुशार कुटुंबातले,त्यांनी ते प्रकरण मिटवलं ."

आशा बाहेर आली आणि तो विषय तिथेच थांबला. माझी तर बोबडी वळली होती. आम्ही इतका वेळ तिथे होतो ,पण त्या बाईंनी जेमतेम चहा/कॉफी दिला. आमच्या हातात खायला काही दिल नाही. तिथून बाहेर आल्यावर आम्ही हॉटेलमध्ये जेवलो,बिर्यानी खाल्ली  .

अचानक अंधारून आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. छत्र्या होत्या. पण वाकडा तिकडा येणारा पाऊस छत्री,टोपी यांना जुमानत नव्हता .कसेबसे रिक्षा पकडून,रखडत,पायपीट करून स्टेशनवर आलो. तिथून ॲगमोर रेल्वे स्टेशन आणि पुढे घर ,अशाच प्रकारे दोन तास प्रवास करून रात्री साडे अकराला घरी आलो .

त्या खोलीतली माझी दुसरी रात्र होती.

 अंधार होता .लाईट गेले होते .हॉटेलमध्ये जाऊ या म्हणायला सुद्धा मला त्राण नव्हते .ईतकी मी घाबरले होते.

 रात्र झाली .पावसाळी रात्रीत गूढ होत.वाड्याचे दरवाजे टकटक,पाऊस थेंब ठकठक वाजत होते. ते सगळं भयानक होते.

रात्री  त्या मित्राच्या सूरजच्या पत्नीचे वडील,अप्पा दार ठोठावु लागले .एवढ्या रात्री कोण आल म्हणून मी घाबरले .माझी मैत्रीण आशा जास्ती घाबरली. ती म्हणाली,

" अग्गोबाई ,सूरज अहो बघा कोण आहे ?लोक काहीतरी माझ्या चारित्र्यावर संशय घेतील व कोणी बघितल तर? कोण आहे बघा ."

अस म्हणून ती आय लपून बसली .मला लपायला जागा ही माहिती नव्हती.त्या शय्या घरातल्या अंधारात मी आपली तशीच बसून राहिले .त्या पलंगावर पंखा बघत ,चुळबूळ करत होते.त्या मित्राची सासरे अप्पा आले होते. ते म्हणाले,

" उद्या कोर्टाची शेवटची तारीख आहे .एकदाच हे मिटवून टाका, तुम्ही  मोकळे,घर मोकळे,मी जिवंत असेपर्यंतकेस संपु दे.नटाला विका घर.!हो आणि हे देवाचं पवित्र पाणी आणले होते, मी या खोलीत शिंपडतो."

 खोलीत पाणी शिंपडून ते निघून गेले. पावसाळी रात्र होती .झाडांवर भुताच्या आवाजाचे आवाज करणारे पक्षी होते.खोलीत रॅकवर पिवळ्या कागदाचे कोर्टाचे रिपोर्ट होते. काही बॅगा सुद्धा  होत्या.भरपूर सामान होतं.उंदीर पण असतील. आप्पाची बाहेर जाताच आशा आत आली आणि म्हणाली ,

"काय हे अप्पा असे रात्री अवेळी दर वाजवतात ?भीती नाही वाटत का? मूर्ख म्हातारा!"

"मागे पण माझा तो पेंईंग गेस्ट  मिळालेला माणूस घाबरला आणि त्यानी हे घर सोडून दिलं.कोर्ट  कामात मदत व्हायची."सूरज पुटपुटला.

परत परत आकाश भरून येत होत.कोसळला ,सर आली की चंद्र दिसेनासा होई.आता परत गडगडाटी आवाज झाला.वीज चमकली आणि पाऊस कोसळायला लागला. आशा माझ्या समोरच्या पलंगावर येऊन बसली

" असाच पाऊस कोसळत होता, ज्या दिवशी त्या सूरजची माझे मित्राची बायको वारली ."आशा म्हणाली.

"वारली? त्या मित्राची बायको तर अमेरिकेला असते ना?"मी

" हो दुसरी बायको अमेरिकेत असते. पहिली बायको मेल्यावर ही दुसरी केली होती ही सर्व प्रॉपर्टी त्या दुसऱ्या बायकोची आहे दुसरी बायको खूप सुंदर होती .आम्ही ते दोघ ,वकिल ऑफिसमध्ये होते तेव्हापासून यांच्या कुटुंबाला चांगलं ओळखते .हो एक दूरची बहीण सुद्धा त्यांची घरात राहायची.बाल विधवा होती ,त्या विहिरीत पडून वारली ,असं पण सूरज सांगतो .कुणी काय तर कोणी काय वेगळंच सांगतो कोर्टात अजून तिसरच सांगतात खूप खूप त्यांच्या कुटुंबाचा इतिहास आहे."आशा आत सूरजच्या खोलीत गेली.

 अशाच पावसाळी रात्री कोण विहिरीत पडून कोण फास लावून असं मरतं. बापरे ऐकून माझे हात पाय थंड झाले .मी जणू मासा होते,गळाला लागले,जाळ्यात सापडले होते आणि तडफडत होता .

ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत मी बराच वेळ जागी होते. नंतर कधीतरी झोप लागली .सकाळी उठून परत आशाला कोर्टाचं काम होतं .त्यामुळे चहा नाश्ता करून आम्ही कोर्टात गेलो .मात्र कोर्टात जाण्यासाठी निघताना बॅगा भरूनच सोबत नेल्या. धो धो पाऊस कोसळत होता पण त्यातल्या त्यात आनंद हा होता की अकरा वाजता कोर्टाचं काम झालं की दुपारी एक वाजता च्या ट्रेनने आम्ही आमच्या घरी मुंबईला परतणार होतो.

आम्ही ऍग्मोर स्टेशनवर आलो.पण गाडी लेट होती.रात्री खूप उशिरा आली.अंधार आणि पाऊस मी चेन्नई एक्सप्रेस मध्ये चढले . देवाची प्रार्थना केली भूत बंगल्यातून जिवंत परत आल्याबद्दल देवाचे आभार मानले.

 हल्लीचा आधुनिक काळ ,प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर टाकायची असते. त्यामुळे आशाने फोटो फेसबुकवर वगैरे टाकले होते .शिवाय तिथून आशाने व्हिडिओ कॉल करून त्या ,न आलेल्या मैत्रिणींना जळवण्यासाठी आम्ही तिघं सोबत आहोत आणि कसा छान पाऊस पडतोय आणि कसे एन्जॉय करतोय असं दाखवलं. मी पण आपली वरवर फोटो पुरती हसले.

"देवा रे कमी ओळखीच्या ,अर्ध ओळखीच्या किंवा अनोळखी बायकांबरोबर /पुरुषांचे सोबत कधीही प्रवास करायचा नाही अशी मी आज शपथ घेते."

आशा माझ्यासोबत ट्रेन मध्ये  आली होती.सूरज सर स्टेशन वर पोहोचवायला आले होते.स्टेशनवर चहा घेतला.आशा पण ट्रेन मध्ये चढली. पण दुसऱ्या डब्यात होती .चेन्नई एक्सप्रेस सुटली.

 धो धो पाऊस कोसळत होता. त्या रात्री नक्की काय घडलं ?जे दिसलं ते काय होतं? सुरज सरांची पहिली बायको त्या घरात गाडली आहे का?कोण त्या विहिरीत पडून वारल आहे? त्या पुरातन वस्तुसंग्रहालयासारख्या  इतक्या सुंदर घरात हे लोक असे का राहत आहेत ?मला कधीही समजत नाही. जुन्या पारंपरिक वस्तू ,वास्तूंना अनेक वर्षांचा इतिहास असतो. शोषणाचा, फसवणुकीचा ,प्रॉपर्टी डिस्प्युट चा काळा इतिहास हे अशा वस्तूंचं ईर्षा योगाचं नशीब असतं का ?वकील लोकांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतात. ज्यामुळे त्यांना गुन्हेगारी बद्दल फारशी संवेदनक्षमता नसते.

 माझी संवेदनक्षमता अधिक असल्यामुळे ,रात्रि दिसल,ते असं काही घडलं असेल का ?

आताही कधी अचानक तो बंगला तो प्रसंग  आठवतो .ते स्वप्न , तो भास आठवतो.

ती आत्मे मदत मागत होते का ? काही सांगू इच्छित होते का ? सुरज सरांच्या व्यक्तिमत्त्वात काही लांडीलबाडी होती का? पण मी काय करू शकत होते ?

पाऊस कोसळत होता. चेन्नई एक्सप्रेस धावत होती

**

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू