पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कालाय तस्मै नमः

कालाय तस्मै नमः


आज रश्मीच्या मुलीच्या म्हणजेच गौरांगीच्या लग्नाची बोलणी झाली. गौरांगी ही आर्किटेक्ट असते. नंतर ती इंटेरिअर डेकोरेटर म्हणून काम करते.तिचे लग्न एका नामांकित कम्पनीत काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनीअर मुलगा विराजशी घरचे ठरवतात. चालीरितीप्रमाणे बघण्याचा कार्यक्रम होतो. मुलामुलींची पसंती झाल्यावर फायनल बोलणी ठरते. त्यात विराजच्या घरचे सांगतात.त्यात विराजच्या घरचे सांगतात. आपण दोघे मिळून काय करायचा तो खर्च लग्नात करू. आम्ही आमच्या सुनेसाठी काही दागिने करून ठेवले. ते आम्ही घालणार आहोत. रश्मीला हे ऐकून आनंद होतो. आणि तिला तिच्या लग्नाच्या बोलणीचे दिवस आठवतात.


 तिला वाटते आपण आपल्या आईवडिलांना जन्माला येऊनच जणू त्यांच्यावर ओझे टाकले. आपल्याही आई वडिलांनी आपल्याला शिकवले. पण सासरच्यांनी त्यांच्याकडून त्यांना वाटेल ती रक्कम सांगून हुंडा घेतला. वरून लग्नाचा संपूर्ण भार आई वडिलांवर टाकून त्यांच्याकडचेही किती लोक लग्नात घेऊन आले. इतकेच काय तर त्यांना वाटेल त्या मागण्या त्यांनी केल्या.जसे लग्नासाठी हाच हॉल घ्या. नवरदेवनवरीला न्यायला हीच गाडी बुक करा. लग्नात हेच मेन्यू ठेवा. त्यासाठी आपल्या वडिलांना कर्ज काढावे लागले.आपल्या आई वडीलानीही  मुलीच्या सुखासाठी त्यांच्या परिस्थितीच्या आवक्याबाहेर जाऊन मुलांकडच्या वाटेल ते मागण्या मान्य केल्या.


पण आता काळ किती बदलला न मुलीच्या लग्नाचाही खर्च समोरची मंडळी वाटून घेतात. खरंच आताचे पालक समजूतदार आहेत. त्यांना कळते कि मुलींना शिकवायलाही खर्च लागतो.


हे सर्व आठवून रश्मी मनातल्या मनात म्हणते. "कालाय तस्मै नमः "



©️स्वाती वक्ते, पुणे 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू