पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संस्कृती

कथा

 कथेचे नाव :- संस्कृती

 

शहरातल टुमदार घर घर कसल बंगलाच म्हणा ना घराच रंगच एवढा आकर्षक कि कोणाचेही लक्ष जावे एवढा आकर्षित करणारा दूरून जरी बघीतले तरी रंगामुळे उठुन दिसणार जरा हटके प्रकारातले वस्तीच्या ठिकाणी असुन सुद्धा आपले वेगळ पण जपणार त्या घरावर लिहिलेल

" श्रद्धा " नाव खुपच छान दिसत होत थोडक्यात काय तर बगल्याच नाव " श्रद्धा " भर वस्तीतला बंगला भर वस्तीतला वेगळेपण जपणारा . काही काही लोक आणि काही मोजके घर बघीतले कि त्याना बघताना एक आपलेपणाची जाणीव होते आपले वाटायला लागते का कोणास ठाउक " लव अज फर्स्ट साईड " म्हणतात  त्या प्रकारातले 

त्याला कारण ही तसच आहे 

बंगला बाहेरून जेवढा टुमदार आहे तेवढाच आतुन सुद्धा अत्यंत आधुनिक सोयीने युक्त असा आहे 

सर्व प्रकारच्या सुख आणि सोई या ठिकाणी उपलब्ध 

बसायला गुबगुबीत सोफा  जेवायला छान काचेचा डायनिंग टेबल त्यावर अत्यांत आधुनिक प्रकारचे सामान काही काही वस्तु तर परदेशातुन आणलेल्या त्या मुळे त्याची चकाकी वेगळीच घरात एकुण सहा लोक राहतात त्यात आजी आजोबा आईबाबा आणि त्यांची दोन मुल एक मुलगा आणि एक मुलगी वयाने अगदी लहान म्हणता येईल असे मुलाचे नाव प्रसन्ना ८ वर्षाचा आणि प्रगती ६ वर्षाची प्रत्येकाच्या वेगवेगळ्या खोल्या प्रत्येकाच्या रूम मध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा सह सज्ज आजीआजोबा 

साठी सुद्धा वेगळी रूम्स आई बाबा साठी सुद्धा वेगळी रूम्स सुविधा सह घरातच एक छानस देवघर देवाची मुर्ती ती सजवलेली पुजा केलेली फुल गंध लावलेली बाजुलाच समईलावलेली सुगंधीत उदबत्ती लावलेली त्याचा मदमद सुवास सर्वत्र पसरलेला त्यामुळे वातावरण कस अगदी छान आणि प्रफुलीत वातावरणात राहणार हे कुटुंब या बंगल्यात एकुण तिन पिढ्या राहतात म्हणजे भुत वर्तमान आणि भविष्य काळाशी नाळ जोडणारी ही मंडळी

आजी आजोबा यानी त्याच्या काळ बघीतलेला हे जुन्या पिढीचे असले तरी आधुनिक विचारा प्रमाणे चालणारे काळाप्रमाणे वागणारे अस म्हटल्यास वावगे ठरू नये असे

आईबाबा तर आधुनिक श्री असले तरी जुन्या रूढीचा परंपराचा आदर करणारे आणि आधुनिकतेची कास धरणार

आणि प्रसन्ना आणि प्रगती जुन्या आणि नविन रूढीच्या तालमीत तयार होणारी नविन पिढी

अशा तीन पिढ्या या बंगल्यात गुण्यागाविंदान नांदत आहेत 

जसा संपुर्ण शहरात " श्रद्धा" बंगाल्याचे नाव होते अगदी तसेच

या दोन नातवांचे सुद्धा या भागात नाव होते  नाव यासाठी कि मुलांवर आतिशय चांगले सस्कार झालेले 

मुलांच्या वागण्या बोलण्या वरून संस्कार डोकावत असतात . आज संस्काराची फार मोठी आवश्यकता आहे संस्कार विरहीत समाजाची निर्मीती होउन राहीली कि काय?

असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही  मुलांवर संस्कार करण्यापेक्षा आज आई वडीलांवर संस्कार करायची आज वेळ आली आहे 

प्रसन्ना आणि प्रगती हे दोघेही रोज संध्याकाळी दिव लगाणीच्या वेळेस घरात देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लागला कि लगेच हातपाय धुवुन " शुभंकरोती

कल्याणम आरोग्यम धनसंपदा"

म्हणायला घरात येत असत आजोबा आणि आजीच्या साक्षी ने " रामरक्षा " आणि " प्रणम्य शिरसा देवंम " सुद्धा खड्या आवाजात म्हणत असत 

देवाला नमस्कार आणि मोठ्याना सुद्धा नमस्कार करत असत 

 " झाले आजोबा आजची प्रार्थना " प्रगती

" चला आता तुमचा आभ्यास करून घ्या जेवायच आहेना

सर्वांना सोबत प्रसन्ना आटप लवकर आता आईबाबा कामावरून येतीलच तो पर्यंत व्हायला पाहिजे ना" आजी

" जेवण झाल्यावर आज कोणती गोष्ट सागायची आहे बर " आजोबा"

" रामाची गोष्ट आजोबा" प्रसन्ना

" चला आटपा लवकर" आजी

असा रोजचा दिनक्रम आणि प्रेमळ संवाद नियमीत असायचा

एवढच नाही तर प्रत्येक सणाच महत्व सुद्धा आजी सांगायचा प्रयत्न करायची जेणे करून मुलाना सण कोणते आहेत ते कसे साजरे करायला हवे पूर्वीकसे साजरे करायचे त्यात कोणता बदल झाला आहे हे सर्व नातवाना आजी आजोबा समजावुन सांगत असत 

त्यामुळे होते काय निदान मुलाना आपल्या सणांची माहिती होते ते कसे साजरे करावेत याची महत्वाची माहिती मुलाना होते 

हेच तर महत्वाचे आहे एका पिढी पासुन ची माहिती दुसर्या पिढी पर्यंत पोचवण्याचे काम आजचे आजी आजोबा निश्चित करत आहेत एवढ मात्र खर 

पूर्वीच्या आपल्या जुन्या परंपरा रूढी नी आता कसे नविन रूप घेतले आहे याची जाणीव नविल पिढीला देणे खरच गरजेचे असते

आपल्या रूढी आणि परंपरेच बदलते स्वरूप कश्या परिवर्तनीय आहेत याचा आभ्यास करायला पाहिजे श्रेणे करून ही ज्ञानाची गंगा प्रवाहीत राहिल जो प्रवाहीत राहतो तो स्वच्छ आणि निर्मळ राहतो म्हणुन आपण आपल्या जुन्या आणि नविन परपरांचा प्रवाह सतत वाहता ठेवायला हवा जो प्रवाहित असतो तो स्वच्छ असतो या परंपराची जाणीव नविन पिढीला असायला हवी म्हणुन शुन्या पिढीने अधिक जबाबदारीन वागणे अत्यंत गरजेच आहे जस सुखात स्वतःपासून करायला हवी म्हणजे तोएक पायंडा पडतो एकदा का पायवाट तयार झाली कि राजमार्ग तयार व्हायला वेळ लागत नाही 

आता हेच बघना प्रसन्ना आणि प्रगतीचे 

असे संस्कारी कुटुंब तयार व्हायला हवीत जेणे करून आपण आपल्या परंपराचा अभ्यास सतत करत राहु

अशी कुटुंबे तयार व्हायलाच हवी तरच आपल्या परंपरा जिंवत राहतील काळानुरूप त्यात आपण बदल करणारच आहोत आपण सर्वानी परिवर्तन वादी व्हायलाच हव तेव्हाच तुम्ही आम्ही एखादा सुवर्णमध्य काढु शकु यात वादच नाही 

नाही का?

 

       श्रीकांत धारकर

        बुलडाणा

     ९०११०२३१९८

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू