पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अनोखी गाठ

वेस्टर्न रेल्वे का यह नरसिंगपूर स्टेशन है। १२३२१ हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जानेवाली मुंबई मेल एक्सप्रेस थोडे ही समय में प्लॅटफॉर्म क्रमांक २ पर आ रही है। इस गाडी के डिब्बों की स्थिती इसप्रकार की है….' 

 

ट्रेनची अनाउन्समेंट झाली. सूरजने मांडीवर झोपलेल्या आपल्या तीन वर्षांच्या लेकीला खांद्यावर घेतलं. मघाशी बोलून ठरवलेल्या हमालाला हाक मारून सामान थोडं पुढे घेतलं. बरोबर नऊ वाजता ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली. बोगी क्रमांक B1 पाहून सूरजने हमालाला खूण केली तसा तो बॅगा उचलू लागला. चढताना थोडी धावपळ झाल्यामुळे अनाया जागी झाली. तिला थोपटत, खांद्यावरची बॅग सांभाळत सूरज आपल्या सीटजवळ आला. अनायाला सीटवर झोपवून त्याने बॅग्स नीट लावून घेतल्या. हमालाला जास्तीचे पैसे दिल्यामुळे म्हणा किंवा एकटाच पुरुष लहान मुलीला घेऊन प्रवास करतोय म्हणून सहानुभूतीने म्हणा त्यानेही बॅग्स सीटपर्यंत आणून दिल्या. 'थॅंक्यू' म्हणत सूरजने आभार मानले आणि तो आपल्या बर्थवर गेला. खरंतर त्याला लोअर बर्थ हवा होता पण मिळाला नाही. जो मिळाला त्याची बुकींग करून त्याने प्रवास करणं योग्य समजलं. सुरजने लोअर बर्थवरून नजर फिरवली. दोन्ही पॅसेंजर गाढ झोपेत होते. 

 

अनायाला कुशीत घेऊन तो समोरच्या बर्थकडे पाठ करून झोपी गेला. रात्री दोन अडीचच्या सुमारास त्याने कुस बदलली आणि खालच्या बर्थवर हालचाल जाणवली. त्याने डोळे किलकिले करून पाहिले. हिजाब घालून कुशीवर झोपलेल्या स्त्रीजवळ एक माणूस उभा होता. सूरजने डोळ्यांना ताण देऊन पाहिलं. त्या माणसाने खिशातून एक लहानशी सिरींज काढली. त्या बाईंना हाताने हलवलं. तिने काहीच हालचाल केली नाही. 'रंडी कहीं की!' म्हणत त्या माणसाने एक चापट तिच्या गालावर मारली. हातातली सिरींज पुन्हा खिशात ठेवली. 

 

'मरो यांना' म्हणत सूरजने डोळे मिटून घेतले. त्याला झोप लागेना. नकळत त्याची नजर त्या चादर मानेपर्यंत ओढून पाठमोऱ्या झोपलेल्या स्त्रीकडे जात होती. ती इतकी निश्चल, निपचित पडली होती ते पाहून, 'ही नक्कीच गुंगीत किंवा नशेत असावी' असं वाटून गेलं. 'ती स्त्री खरंच त्या माणसाची कोणी लागते की हा माणूस तिला फसवून कुठे घेऊन चाललाय?' सूरज विचार करत जागाच होता. मधूनच चुळबुळ करणाऱ्या अनायाला थोपटत होता. 

 

सकाळचे साडेचार वाजले असतील, त्याच्या बर्थखाली झोपलेला माणूस जागा झाला. त्याने पडदे बाजूला करून कोणतं स्टेशन आलं याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. बाहेर काळोख असल्याने त्याला काही कळलं नसावं. त्याने त्या स्त्रीला हलवून पाहिले. ती शांत आहे याची खात्री झाल्यावर तो वॉशरूमकडे जायला निघाला. तो गेला तसा सूरज खाली उतरला. तो माणूस गेला त्या दिशेकडे पाहिलं. खिशातून मोबाईल काढून त्याच्या उजेडात त्याने त्या स्त्रीकडे पाहण्याचा प्रयत्न केला. मोबाईलच्या उजेडात ती थोडीशी हलल्यासारखी वाटली. तो पटकन बाजूला झाला.

 

झोप न लागल्याने डोकं जड वाटत होतं. त्याने सॅकमधून सिगारेट आणि लायटर काढून खिशात ठेवलं. सॅक आणि अनायाची एक बॅग काढून बर्थवर ठेवली अनाया पडणार नाही याची खात्री करून घेतली. दरवाजाजवळ जाऊन दोन झुरके मारावेत म्हणून तो मधल्या पॅसेजमध्ये आला. दरवाजात आधीपासूनच तो माणूस सिगारेट ओढत उभा होता. फोन कानाला लावून बंगाली भाषेत काहीतरी हळूहळू बोलत होता. गाडी वेगात होती. सूरजने खिशातून सिगारेट काढून लायटरवर हलकीच ठोकली. तेवढ्यात त्याचं लक्ष 'धुम्रपान निषेधच्या' बोर्डवर गेलं. त्याने सिगारेट दोन बोटात पकडून चुरगाळली. 'नकोच ओढायला' म्हणत लायटर खिशात ठेवलं. इतक्यात कंपार्टमेंटचा दरवाजा उघडला गेला. काही समजण्याच्या आतच झुरक्याचा धूर दरवाजातून बाहेर सोडणाऱ्या त्या माणसाला मागून एका मुलीने जोरात धक्का दिला. बेसावध असलेला तो इसम बाहेर फेकला गेला. त्याचा फोन आत पडला. तो त्या मुलीने उचलला.

 

तिने मागे वळून तिथे उभ्या असलेल्या सूरजचा हात घट्ट धरला. ती खुप घाबरली होती हे तिच्या श्वासांच्या गतिवरून कळत होतं. जे घडलं ते इतकं अचानक होतं की, सूरजच्या तोंडातून आवाज बाहेर फुटला नाही. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. एकोणीस वीस वर्षांची देखणी तरुणी होती ती. तिच्या हातातला आपला हात सोडवून घेत सूरज एक पाऊल मागे सरकला. तिने पटकन वाकून सूरजचे पाय धरले. त्याने पाय मागे घेताच तिने पुढे होऊन त्याच्या पायावर डोकं ठेवून 'साब, मुझे बचाओ' म्हणाली. खाली वाकून त्याने तिच्या हाताला धरून उभी केली. तिच्या डोळ्यातून निघालेले अश्रू सूरजच्या पावलांवर पडले. सूरज तिथून निघून आपल्या बर्थजवळ आला. अनायाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तसाच उभा राहिला. बधीर व्हायला झालं होतं त्याला. ती मुलगी आपल्या बर्थजवळ आली. तिथे काढून ठेवलेला बुरखा उचलून पुन्हा बाहेर गेली. शिलाईवर जोर लावून फाडले आणि ट्रेनच्या दरवाजातून त्याचा एक एक तुकडा वाऱ्यावर सोडून दिला. 

 

एवढ्या स्पीडमध्ये बाहेर फेकला गेलेला माणूस जिवंत असणं शक्यच नव्हतं. एक गुन्हा डोळ्यासमोर घडला होता तरी तो गप्प राहिला होता. काय चूक, काय बरोबर त्याला कळत नव्हतं. सध्या तरी गप्प राहणं हेच योग्य समजून तो शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. पंधरा वीस मिनिटांनी गाडीचा वेग कमी झाला. कोणतेतरी स्टेशन जवळ येत होतं. ती मुलगी येऊन सीटवर बसली. उभ्या असलेल्या सूरजकडे पाहत 'साब जी!' अशी हळूच हाक मारली. सूरजने मागे वळून तिच्याकडे पाहिलं. 

 

"क्युं किया ऐसा?"  -सूरज

 

तिने डोळ्यांनीच समोरच्या सीटवर बसायची खूण केली. सूरज बसला. 

"साब, मैं बुरी नहीं हुं। खुद को बचाने के लिये ऐसा करना पडा। ये मुझें बेचनेवाला था।" म्हणत तिने डोळे पुसले. सूरजचा अंदाज खरा ठरला होता. ती स्वखुशीने त्या माणसासोबत जात नव्हती. 

 

"तुम्हारे मॉं बाबा?" सूरजने विचारलं. 

 

"हम गरीब लोग है। कलिकापूर में झोपडा है हमारा। पापा मर चुकें, मॉं बिमार है, फिर भी वो और एक बडी बहन बिडी बनाते है। मैं जादा पढी नहीं पर मुझे पार्लर का शौक था। एक पार्लरवाली के यहॉं सिखने जाती थी। रास्ते में बस स्टॉप पर एक लडका खडा रहता था। उससे पहचान हो गयी। एक दिन वो घर आया और मॉं सें शादी के लिये हाथ मांगा। मॉंने हां कहा और कालि मॉं के मंदिर में शादी हो गयी। हमने तो हिंदू समझ के उससे शादी की थी पर वो नहीं था। शादी के आठ दिन बाद वो एक आदमी को घर लेके आया, 'उस आदमी के साथ तुम आगे जाओ मैं आता हुं ' बोला। वो आया ही नहीं। वो आदमी ने चार दिन शहर के कौन से तो हॉटेल में रखा। रोज एक दो अलग अलग लोग आ के मेरा टेस्ट लेके जाते थे। जलील करते थे। फिर एक दिन एक बहोत बडा सेठ आया, पठाण था, उसने बहोत पैसा देके बंबई आने को कहाँ। बंबई से दुबई भेजने वाले थे मुझे। हर एक ने मेरा सौदा किया था। मेरा शरीर वैसा भी भ्रष्ट हो चुका था, दुबई में मेरे सामने क्या रखा था मालूम नहीं। बंबई के लिये निकलने से पहले ये आदमी के साथ मुझे भेजा गया। बुरखा तो मुझे कब का पहना दिया था। इस दौरान मैने तीन चार बार भागने की कोशिश की थी, पर सफलता नहीं मिली। परसों मै भाग निकली पर मुझे फिर से पकडा गया।  मुझे बहोत पिटा और नींद की दवाई दी। दो दिन से मैं सो रही हुं। रात को ट्रेन में भी मुझे आधे नींद में लाया गया था। दवा का असर कम होने पर भी मैं मौका ढुंढ रही थी और अभी मौका मिला तो आपने देख लिया।" तिने मोठा उसासा टाकत सांगितलं. भुसावळ स्टेशन आल्याची घोषणा झाली आणि चहा कॉफीवाले बोगीत आले. 

 

"दो कॉफी!" म्हणत सूरजने कॉफी घेतली. तिच्यासमोर एक ग्लास धरला. 

 

"साब, भूक लगी है।" म्हणाली. सूरजने बॅगमधून बिस्कीट पुडा काढून तिला दिला. तिने अधाशासारखा खावून संपवला. ट्रेनने स्टेशन सोडलं. 

 

"ओ आदमी मर गया होगा?" सूरजने विचारलं.

 

"मरने दो ना साब! माँ की कृपा से उसका फोन मेरे हात लग गया, सिम निकाल के फेंक दिया. हँडसेट मेरे पास रखा है मैने। जिंदगी नर्क बनानेवालो को तो मरना ही चाहिए ना?" तिने सूरजला प्रतिप्रश्न केला. 

 

"हं. अब कहाँ जाओगी?" सूरजने विचारलं.

 

"मालूम नहीं साब. आप पढे लिखे हो, कुछ कर सकते हो क्या मेरे लिये? आप जो बताओगे वो काम करुंगी।" तिने गयावया करत म्हटलं. 

 

"और मैने भी बेच दिया तो?" सूरजने विचारलं.

 

"साब, आप ऐसा नहीं करोगे; पिछले कुछ दिन में आदमींयों कें ऑंखे पढना सिख गयी हुं मैं।" तिने त्याच्याकडे पाहत म्हटलं. 

 

"मैं तुम पर भरोसा कैसे करुं?"  खरंतर सूरजला ती काही खोटं सांगतेय असं वाटलं नाही. तरीही सूरजने विचारलं.

 

"साब, कैसा यकीन दिला दुं आपको?" रडवेलं होत तिने विचारलं आणि ड्रेसच्या हाताचा भाग टरकन् फाडला. तिच्या दंडावरचे काळे निळे चट्टे आणि सिगारेटच्या चटक्यांचे डाग पाहून तो चटकन तिच्यासमोरून उठून पाठमोरा उभा राहिला. बॅगमधून पाण्याची बाटली काढली आणि घटाघटा पाणी प्यायला. काहीतरी विचार केला आणि तिच्यासमोर येऊन बसला.

 

" जिसे तुमने गिरा के मारा उसके लोगोने पुलिस कंप्लेंट किया तो?" सूरजने विचारलं.

 

" साब, कालीमाता पापीयोंका सर्वनाश करती है। जो मर गया उसकी जगह पर दुसरा कोई आयेगा, इसे तो कोई पहेचान भी नहीं दिखायेगा।“ तिने निरागसपणे सांगितलं.

 

"एक काम करते है, नासिक उतरते है। मैं सामान और अनाया को लेके उतर जाऊंगा फिर गाडी शुरू होने के बाद तुम उतरना। मेरे पीछे, पर थोडा अंतर रख के चलना। मैं कुछ भी पुछुंगा तो हां बोलना।" सूरजने सांगितलं. तिने मान डोलावली. 

 

 सूरज नाशिकला उतरला. त्याच्यामागे ती उतरली. सूरज हमालासहीत एका शेअर टॅक्सीजवळ थांबला.

 

'ठाणे?' टॅक्सीवाल्याने मान डोलावताच तो अनायाला घेऊन बसला.

 

'मॅडम, आप भी ठाणे हो क्या?" सूरजने विचारलं. तिने होकारार्थी मान डोलावली. टॅक्सीवाला एका सीटसाठी थांबला होता. 

 

“माझ्या दोन सीट आहेत पण मी तीन सीटचे पैसे देतो. माझी लेक झोपलीय तोवर ठाण्यात पोचू." सूरजने सांगितले आणि टॅक्सी निघाली. 

 

एका सीएनजी पंपावर टॅक्सीवाला खाली उतरला. सूरजने 'टॅक्सी का भाडा' म्हणत पाचशेच्या दोन नोटा तिच्या हातात ठेवल्या. 'मैं उतरुंगा तभी मुझे भी कल्याण जाना है बोल के उतर जाना' सूरजने पुढची सूचना दिली. तिने मान डोलावली. गॅस भरून या तिघांना घेऊन टॅक्सी निघाली. भिवंडी बायपासला टॅक्सी थांबवून दोघे उतरले. अनायासुध्दा छान जागी झाली. सगळ्यांनाच भूक लागली होती. तिथल्या लहानशा हॉटेलमध्ये पोहे, उपमा आणि चहा मागवला. अनायासाठी शिरा मागवला. त्याने मोबाईल काढून ॲपमधून परेलसाठी कॅब बुक केली. पुन्हा प्रवास सुरू झाला. 

 

अनायाचे प्रश्न आणि चुळबुळ सुरु होती. 

"What is your name?" अनायाने गोड आवाजात त्या अनोळखी मुलीकडे पाहून विचारलं.

 

'अरे, एवढं सगळं झालं पण हिला आपण नाव विचारायला विसरलो.' त्याने डोळ्यानेच तिला विचारलं. 

"आरुणी" तिने  अनायाच्या गालाला भीतभीतच दोन बोटं लावत सांगितलं. अनायाने तिची दोन्ही बोटं आपल्या नाजुकशा हातात पकडून ठेवली. तिची बडबड सुरु होती पण आरुणीला मराठी इंग्रजी जास्त कळत नसल्याने ती फक्त दोघांकडे पाहत होती. मध्येच हसत होती. तिला हसताना पाहून सूरजला आपण घेतलेला निर्णय बरोबर वाटला. 'किती लहान आहे वयाने ही आणि एवढ्या लहान वयात किती नरकयातना भोगल्यात हिने! आता इतकं काही आयुष्यात घडून गेल्यावर हिला मागे फिरून जायचं नाहीये. नवी आशा नवी उमेद घेऊन स्वतःच्या पायावर उभं रहायचं आहे. हिच्यासाठी जितकं चांगलं करता येईल तितकं करायला हवं. बाकी काही गुन्हे काळाच्या शिक्षेवर सोडायला हवेत.' सूरज विचार करत होता. 

 

तासाभरात कॅब परेलला पोचली. सूरजने खिशातून चावी काढून दरवाजा उघडला. 'घरात दुसरं कोणीच कसं नाही?" असा प्रश्न आरुणीच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याकडे दुर्लक्ष करून त्याने गिझर ऑन केला. अनाया आणि तो फ्रेश झाले. आरुणी दरवाजाजवळ जमिनीवर बसली होती. सूरज बाहेर आला. 'तुम निचे क्यूँ बैठी हो? खुर्सी या सोफे पर बैठो।' त्याने सांगितलं. 

 

'नहीं साब, मैं यही ठीक हुं।' 

 

'जब तक तुम्हारा कहीं अच्छे जगह पर इंतजाम नहीं हो जाता तब तक यहीं रहो, अपना घर समझ के। अभी नहा धो के फ्रेश हो जाओ।' - सूरज

 

'हां साब।' म्हणून ती तिथेच थांबली. त्याच्या लक्षात आलं, तिच्याकडे अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीच नव्हतं. त्याने अनायाला लॅपटॉपवर poem लावून दिल्या आणि हाताने खूण करून आरुणीला आत बोलावलं. बेडरुममधलं त्याच्या आईचं कपाट उघडून दिलं. 

 

"इसमे से जो चाहिए वो ले लेना।" म्हणाला.

 

"पर मेमसाब को अच्छा नहीं लगा तो?" 

 

"यह मेरे मम्मी के कपडे है और मम्मी अब नहीं रही।" बाहेर जाता जाता तो बोलून गेला. त्याचा आवाज कातर झाला होता.

-------------------------------------------------------------------------------------

सूरज सोफ्यावर मान टेकवून डोळे मिटून बसला. आरुणी फ्रेश होऊन आली. तिने मम्मीचा ड्रेस घातला. ढगळ होता म्हणून ओढणी घट्ट बांधून घेतली. ती पुन्हा खाली बसली. 

 

'साब, कुछ काम बता दो, बैठ के क्या करुं?" आरुणी

 

त्याने तिला हातानेच खूण करून जवळ बोलावलं. ती सोफ्याजवळ येऊन बसली. 

"देखो, तुम्हारे बारे में तुमने सब बताया, अब मेरे बारे में मैं बताता हुं।" म्हणत त्याने सांगायला सुरुवात केली.

 

सूरज देशमुख, वय वर्षे २९. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्री घेतली. परदेशात जाऊन मास्टर केलं आणि आईवडिलांच्या प्रेमापोटी पुन्हा मुंबईत आला. हॉटेल लिलामध्ये नोकरीला लागला. तिथेच त्याची ओळख नैनाशी झाली. प्रेमात पडून लग्नसुध्दा केलं. वर्षभरात गुड न्युज आली. सूरजचे आईबाबा खुश झाले. नैना नरसिंगपूरची. तिच्या आईला बरं नाही म्हणून तो पंधरा दिवसांची सुट्टी घेऊन नैनाच्या माहेरी गेला. सुट्टीचे चार दिवस बाकी असताना कोरोनामुळे लॉकडाऊन झालं. सगळे जिथल्या तिथे अडकले. इकडे सूरजच्या आईबाबांना कोरोनाची लागण झाली. दोन दिवसांच्या फरकाने दोघेही गेले. सूरजला अंत्यदर्शन ही घेता आलं नाही. दुःखाचा डोंगर कोसळला तरी पाच महिन्यांची प्रेग्नंट असलेल्या नैनाची जबाबदारी होती त्याच्यावर. त्यामुळे स्वतःला सावरुन तो नैनाची काळजी घेत होता. मे महिन्याच्या सुरुवातीला नियम थोडे शिथिल झाले तसा तो मुंबईत आला. म्युनिसिपालटीने सगळं केल्यामुळे अस्थी वगैरे काही मिळण्याचे चान्सेस नव्हते. त्याने ब्राह्मण बोलावून दोघांचे कार्य करून घेतलं. दोन तीन दिवस राहून तो पुन्हा नैनासाठी नरसिंगपूरला आला. आठ दिवसातच नैनाने अनायाला जन्म दिला. सातव्या महिन्यात डिलिव्हरी झाली. सिझर केलं. नैनाला पाच दिवसांनी घरी सोडणार होते. अनाया मात्र काही दिवस पेटीत राहिली. घरी आल्यावर तिची काळजी घेणं सुरू होतं. लेकीच्या बाललीला पाहून सूरज आणि नैना खूप खुश होते. अनाया दिड महिन्याची असताना नैनाला स्ट्रोक आला आणि ती कोमात गेली. सर्व प्रयत्न करून झाले. नैना कोमातून बाहेर आलीच नाही. महिनाभर ॲडमीट असलेल्या नैनाने एका रात्री कायमचा निरोप घेतला. सूरजवर आभाळ कोसळलं. वेड्यासारखा वागू लागला. नैनाच्या आईवडील आणि भावाने त्याच्यावर डॉक्टर उपचार सुरू केले. कौन्सिलिंगच्या सिटींग सुरू झाल्या. सहा महिन्यांनंतर सूरजची गाडी पुर्व पदावर आली. नैनाचे आईवडील अनायाची छान काळजी घेत होते. अनायासाठी त्याने तिथेच रहायचं ठरवलं. तिथल्याच एका नामांकित हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. मिळणाऱ्या पगारात खर्च भागत होता. अडीच वर्षे राहिल्यानंतर नैनाच्या भावाचे लग्न झाले. सूरजला अचानक आपल्या आईबाबांच्या घरी जावंसं वाटू लागलं. पदरी लेक होती, तिची जबाबदारी होती त्याच्यावर. तिला योग्य शिक्षण आणि छान आयुष्य मिळणं गरजेचं होतं. साठवलेला पैसा कितीसा पुरणार होता? मुंबईत नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. लीला हॉटेलचा मॅनेजर कधीपासून बोलावत होता. सूरजने त्याच्याशी बोलून घेतलं. सगळं नक्की झाल्यावर त्याने नरसिंगपूर सोडलं. नैनाच्या आईची तब्येत नरमगरम असल्याने तिची इच्छा असतानाही तो त्यांना न घेताच आला होता. 'खरंच गरज लागली तर नक्की बोलावेन तुम्हाला.' असं सांगून निघाला होता तो. आता ही लढाई त्याच्या एकट्याची होती. पैशाला काही कमी नव्हती. महिन्याभराची रजा हातात होती. या महिन्याभरात सगळी सोय लावावी लागणार होती. पण आता अनायासोबत आरुणीचीसुध्दा नीट सोय करून द्यावी लागणार होती. आरुणी सोबत होती म्हणूनच तो व्हाया व्हाया मुंबईत पोचला होता. विश्वासाला तडा जाऊ न देता, भूतकाळ विसरून तिने रहावं. असं सूरजने सांगितलं आणि तिने हात जोडून मान डोलावली. 

 

दुपारचं जेवण झालं. आईबाबांची रुम आरुणीला वापरायला सांगितली. दोन तासांची झोप घेऊन तो उठला. पहिल्या मजल्यावर देसाई काका राहत होते त्यांच्याकडे गेला. चहापाणी झाल्यावर 'अनायाला सांभाळण्यासाठी नरसिंगपूरहून एक मुलगी सोबत पाठवलीय नैनाच्या घरच्यांनी, तरीही बारा तासांसाठी एक बाई हवी आहे’ म्हणाला. 'एक दोन दिवसांत बघते' म्हणताच त्याने काका काकूंचा निरोप घेतला. 

 

अनाया आणि आरुणीला घेऊन तो दादरच्या जनता मार्केटमध्ये गेला. तिला पैसे देऊन तिच्या मापाचे ड्रेसेस घ्यायला सांगितले. तिने डोळ्यात पाणी आणून 'जुना पुराना कपडा रहेगा तो भी चलेगा साब' म्हणाली.

 

'जब तुम कमाने लगोगी तो मेरा पैसा दे देना' म्हणत त्याने तिला कपडे घ्यायला लावले. तिने दोन ड्रेस, दोन गाऊन आणि अंडर गारमेंटस् घेतले. सगळे घरी आले. चारपाच दिवसांनी सूरजने एक मदतनीस फिक्स केली. घराची साफसफाई, वाणसामान भरणं, अनायाचं कपाट लावणं सगळं सूरज दोघींच्या मदतीने करत होता.

 

अनायाला मधूनच मामा आणि आजी आजोबांची आठवण आली की विडिओ कॉलवर बोलणं व्हायचं. महिना होतं आला. सगळेच घरात रुळले. मदतनीस मावशी, आरुणी आणि अनायाची गट्टी जमली होती. आरुणी मराठी शिकण्याचा प्रयत्न करत होती. तशी ती जात्याच हुशार असल्याने काही वाक्ये मराठीत बोलू लागली. घरात सगळं काम आनंदाने करत होती. 

 

सूरजने घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. अनायाचं नर्सरीसाठी ॲडमिशन केलं. दोन तीन दिवसात सूरज हॉटेल जॉईन करणार होता. सूरज नसताना देसाई काकू लक्ष ठेवणार होत्या. 

 

सूरजचा कामावर जाण्याचा दिवस उजाडला. आरुणी नेहमीप्रमाणे सहा वाजता उठून बसली. तिचं डोकं गरगरु लागलं. पोटात मळमळून आलं. तिने लिंबाची फोड दाताखाली धरली आणि सूरजच्या बेडरुमचा दरवाजा वाजवला. सूरज घाबरून उठला. बाहेर आला तर आरुणी दारात उभी होती.

 

"क्या हुआ?" 

 

"साब, यह बच्चा मुझे नहीं चाहिए। कौन से भेडिये का खून है ये, मालूम नहीं। पर ये बच्चा मुझे नहीं चाहिए। आप कुछ करो, नहीं तो मैं मर जाऊंगी। मेरा भूत वर्तमान बन के खा जाएगा मुझे। साब जी ऽ ऽ" तिने रडत रडतच सूरजचे पाय धरले. 

 

"ओह् शीट्ट्" म्हणत त्याने हाताची मूठ दरवाजावर आपटली. 

 

"रो मत, शांत हो जाओ। विचार करु दे मला. मावशी आल्या की जाऊ डॉक्टरकडे. प्लीज कोणाला काही सांगू नकोस." - सूरज 

 

दोन दिवसांत आरुणी मोकळी झाली. सूरज कामावर जाऊ लागला. तीन महिने झाले आरुणीला सूरजच्या घरी येऊन. घराचा कारभार बऱ्यापैकी तिच्या हातात होता. घर खुप छान सांभाळायची. सूरजला यायला उशीर व्हायचा त्यामुळे अनाया रात्रीची तिच्या कुशीत झोपू लागली. 

 

शनिवारी संध्याकाळी सूरज लवकर घरी आला. मावशी अनायाला घेऊन देसाई काकूंकडे गेल्या. अनायाची आणि त्यांच्या नातवाची छान गट्टी जमली होती. भाजी आणायला गेलेली आरुणी अचानक आलेल्या पावसाच्या सरीने चिंब भिजून घरी आली. पिशव्या किचनमध्ये ठेवल्या अन् बेडरुममध्ये जाऊन तिने स्वतःचे कपडे घेतले. थंडीने कुडकुडत पळतच बाथरुमचं दार उघडायला गेली आणि दार आतून उघडलं गेलं. टॉवेल गुंडाळलेल्या सूरजसोबत आरुणीची टक्कर झाली. चार बोटांच्या अंतरावर, त्याच्या इतक्या जवळ उभी असलेली आरुणी थरथरली. तो एक पाऊल टाकून पुढे आला. आरुणीच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढली आणि तिच्या मानेवर ओठ टेकवले. ती शहारली. तरीही स्वतःला सावरत "साब, मैं भ्रष्ट हुं, पवित्र नहीं हुं, आप जैसे अच्छे इन्सान के लायक नही हुं।" म्हणाली.

 

सूरज भानावर आला. आपण ही तिच्यासोबत तेच करतोय जे त्या नराधमांनी केलं. त्याला स्वतःचाच राग आला. त्याने मुठ आवळून भिंतीवर आपटली. सॉरी म्हणून आपल्या बेडरुममध्ये निघून गेला. आरुणी फ्रेश होऊन आली आणि चहा ठेवला. इतक्यात अनायाला मावशी घरी घेऊन आल्या. तिच्या येण्याने वातावरण जरा निवळलं. आरुणीने सर्वांना चहा दिला. सूरज तिच्याकडे पाहणं टाळत होता. 

 

रात्री जेवण शांततेत झालं. अनाया सूरजजवळ झोपली. आरुणीला झोप येईना. ती उठून बाहेर आली. सूरजच्या बेडरुमच्या दरवाजाच्या फटीतून पाहिलं. सूरज बेडला टेकून बसला होता आणि एका हाताने अनायाला थोपटत होता. ती दरवाजा लोटून आत आली.

 

"संध्याकाळच्या चुकीसाठी माफ कर." सूरज हात जोडून म्हणाला. 

 

"आप माफी मत मांगो, अच्छी लडकी देख के शादी किजिए। आपको अच्छी साथी चाहिए।" आरुणी

 

"मैं अच्छा आदमी नहीं हुं, बेसहारा लडकी का फायदा उठानेवाला आदमी, अच्छा नहीं हो सकता।" सूरज

 

"बेसहारा नहीं हुं मैं। मेरा मालिक है, मुझे जिंदा रखनेवाला, संभालनेवाला, साथ देनेवाला, मेरे नाम के आगे अपना नाम लगा के डॉक्टर के नजरों से बचानेवाला, मी दासी आहे त्याची. माझ्यावर अधिकार आहे त्याचा. त्याच्यासाठी जीव द्यायला तयार आहे मी. आता तर प्रेम करतेय त्याच्यावर पण माझ्या भ्रष्ट शरीराची सोबत त्याच्या शरीराला नको. अपवित्र आहे मी, माझा स्पर्श त्याच्या पवित्र मनाला नको. माझा काळा भूतकाळ त्याच्या आयुष्यात नको.' तिने रडवेलं होत म्हटलं. 

 

सूरज पटकन उठून तिच्याजवळ आला. तिचा चेहरा तळहातात धरला. "प्यार बहोत पवित्र होता है पगली! मैंने जो भी किया तेरे लिये, वो फर्ज समझ के किया। इन्सानियत के नाते मैने मदत की पण कधी तुझ्या प्रेमात पडलो कळलं नाही. माझ्या डोळ्यात बघ, प्रेमच दिसेल तुला. आरुणी, आज तुला फार मनापासून विचारतो, अनायाची आई तर तू झालीच आहेस. आता लग्न करून माझी पत्नी होशील?  करशील लग्न माझ्याशी? वैसे मैं भी दूध का धुलां नहीं हुं। अपवित्र हुं मैं भी।" 

 

"साब?" 

 

"अरे वेसे नहीं, मतलब मेरी भी ये दुसरी शादी है ना?" 

 

"ओह्... असं होय?" 

 

"हं.. जेलस?" 

 

"नाही ऽ ऽ " 

 

"खोटं. तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलचं प्रेम दिसतं मला. म्हणून संध्याकाळी तोल सुटला. गृहित धरलं तुला. सॉरी." 

 

"बार बार सॉरी मत बोलो साब।" तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला. 

 

"ठीक हे, आय लव्ह यू।" 

 

"मैं भी!" म्हणत ती जायला वळली.

 

"अरे सूनो, रुम में क्युं आयी थी? " 

 

"नींद नहीं आ रही थी तो अनाया को ले जाने के लिये।"

 

"अभी अनाया के साथ मुझे भी ले के चलो, मुझे भी निंद नहीं आ रही है। शाम को कुछ देखा है वो मन से जा नहीं रहा है।" त्याने हसत डोळा मारला. ती दरवाजातून मागे आली. त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि 'जल्दी शादी का मुरत देखो, मैं हर पल आपके साथ जीना चाहती हुं' असं कानात म्हणाली. 

 

त्याने तिच्या हाताला धरून स्वतःजवळ ओढली अन घट्ट मिठीत घेतलं. दोघांच्या श्वासांची गती अचानक वाढली.  तिने डोकं त्याच्या छातीवर घासत कंठावर ओठ टेकवले. सरसरून काटा आला त्याच्या अंगावर. हे मोहाचे क्षण नक्कीच नव्हते. समर्पणाची आस होती. खोलीतला इवलुसा लाईट साथ पुरवत होता. त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याच्या ओलसर ओठांचा मुलामा तिच्या ओठांवर चढला. हुंकारांची आणि श्वासांची जणू स्पर्धा लागली होती. भान विसरले होते दोघे. एक नदी सागराच्या ओढीने वाहवत चालली होती आणि चार वर्षे तहानलेला समुद्र सुखासाठी आतुर झाला होता. मध्येच तिचा ओठ आपल्या ओठात धरून त्याने सक केला. आणि त्याच्या पाठीवर तिचे हात रुतले गेले. मिठी घट्ट झाली. त्याने  गाऊनची बटण्सं काढून हलकेच बोट फिरवलं. ओठ टेकवले तसं तिने त्याचं डोकं दोन्ही हातात घट्ट दाबून धरलं. त्याच्या दोन्ही तळहातांचा स्पर्श गोलाकार जाणवू लागला. साब जी ऽ ऽ ऽ म्हणत तिने डोळे मिटून घेतले. ती थरथरत होती, शहारत होती, फुलत होती. त्याने हातावर उचलून घेत तिला तिच्या बेडरूममध्ये आणली. बेडवर ठेवून तिच्या पायाशी बसला. 'खूप सुंदर आहेत तुझी पावलं' म्हणत त्याने ओठ टेकवले. त्याचे पावलांवरून फिरणारे हात हळूहळू वरच्या बाजूला सरकू लागले. तिचा रोम रोम मोहरत होता. तिच्या आहात्कारांनी तो उत्तेजित होत होता. वेगात होणारे ओठांचे ओलेते स्पर्श मांडीला जाणवू लागले आणि तिने उठून त्याला घट्ट मिठी मारली. "साब, कल ही शादी कर लेते है ना।" उसासे सावरत म्हणाली.

 

"हं... बाकी सब शादी के बाद ना?" म्हणत तो दूर झाला. 

 

"आरुणी तुम मेरे साथ खुश रहोगी ना? मैं तुम्हे युज कर रहां हुं, ऐसा तो नहीं लगा ना?" सूरजने विचारलं. 

 

"नहीं साब, मैंने आपका प्यार देखा है, केअर करना देखा है। तुम्ही जेव्हा माझ्या नावापुढे तुमचं नाव लावलंत तेव्हाच मी तुमच्या प्रेमात पडलेय. माझ्या प्रेमानेच तुम्हाला प्रेमात पाडलंय." आरुणीने सांगितलं. 

 

"उद्याच सगळ्यांशी लग्नाबद्दल बोलतो. आता धीर धरवणार नाही." त्याने डोळा मारत म्हटलं.

 

"हां साब जी!" तिने डोळे मिचकावत म्हटलं.

 

"ये साब बोलना छोडो और सूरज बोलने की प्रॅक्टिस करो।" त्याने तिच्या नाकाचा शेंडा चिमटीत पकडून म्हटलं अन निघून गेला. पाठमोऱ्या त्याला ती पाहत राहिली. ‘ये मेरा पूर्ण पुरुष, काली माँ लंबी उमर देना मेरे साब को।’ तिने हात जोडत म्हटलं.

 

एका विचित्र ट्रेन प्रवासाची सुरुवात, आयुष्याच्या ह्या प्रवासाला नेईल असं दोघांनाही वाटलं नव्हतं. होरपळलेले दोन जीव प्रेमाच्या सावलीत विसावू पाहत होते. मनं जुळली कि प्रेम होतंच ना?

 

© Velvet Kavisha

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू