पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हमे तुमसे प्यार हो गया

शॉपीझन ट्रेन कथा स्पर्धे साठी

 शीर्षक:: हमें तुम से प्यार हो गया

 

       कंपार्टमेंट मध्ये चारू एकटीच मुलगी होती. एकटीने प्रवास करण्याची तिची पहिलीच वेळ होती. ती इंदोरहून बसली होती़. समोरच्या बर्थ वर तीनही पुरूष  होते, त्यांच्या पैकी एक ग्रहस्थ समोर बसले होते. ते चारू च्या वडिलांच्या वयाचे असावेत. ते फोनवर कोणाशी तरी बोलत होते “अरे! चिंता मत करो. मेरे साथ मेरा बेटा आया है वह एसी टू में किसी से मिलने गया है. मैं अकेला नहीं हूँ. “ 

 

          तिच्या बर्थ वर अजून कोणीच आले नव्हते. बाजूच्या आडव्या बर्थ वर कॉलेजातली दोन टारगट वाटणारी मुलं होती, ती सारखी तिच्याकडे बघत असल्याचा भास तिला होत होता, म्हणून ती सारखं सावरून बसत होती.

         तिच्या बाबांची तब्येत काही दिवसापासून ठीक नव्हती. ते जाॅंडिस ने आजारी होते. त्यामुळे तिच्याबरोबर कोणीच आले नव्हते. तिने एकटीनेच निघण्याची हिंमत केली होती. तिने आपला मोबाईल काढला आणि मोबाईल मध्ये गुंग झाली. 

 

        ट्रेन ने देवास सोडले होते आणि आता खाचरोद स्टेशनवर थांबली होती. दोन भल्या मोठ्या बॅगा आणि खूप सारे समान घेऊन एक  लठ्ठ माणूस आणि त्याची  लठ्ठ बायको ट्रेनमध्ये चढले. ते तिच्याच रांगेतल्या सीटवर आले होते. सर्व सामान नीट ठेवता, ठेवता त्यांना सोडायला येणाऱ्या लोकांशी जोरजोरात बोलतही होते. सामान ठेवत असताना अचानक चारूला त्यांचा धक्का लागला आणि तिचा मोबाईल खिडकीतून बाहेर पडला. 

 

          अरे देवा ! म्हणत ती पटकन उठली. “माझा मोबाईल, माझा मोबाईल” करत रडकुंडीला आली. समोरच्या सीटवर फक्त ते वयस्क ग्रहस्थच बसले होते.

 

         आता कोणाची मदत घेऊ? त्या लठ्ठ जोडप्याला तर आपल्याशिवाय कोणाची काही पडलीच नव्हती. आपल्या धक्क्यामुळे या मुलीचा मोबाईल पडला आहे ह्याची पण त्यांनी दखल घेतली नाही. 

 

        खाचरोदला गाडी अगदी थोडा वेळच थांबते. ती रडवेली होऊन दाराकडे धावली. ज्या बाजूला प्लॅटफॉर्म होता त्याच्या विरुद्ध बाजूला तिचा मोबाईल पडला होता. त्या बाजूला दगडाची खडी आणि पाईपचे रेलिंग होते. तिने स्वतःच उतरण्यासाठी दाराच्या बाहेर पाय खाली ठेवला, आणि गाडी सुटण्याची व्हिसल वाजली. 

आजूबाजूचे लोक म्हणत होते तिचा मोबाईल खाली पडला आहे. 

 

        मोबाईल फारच महत्व पूर्ण वस्तू आहे, आणि आता तर त्याशिवाय  जीवनाला गतीच नाही. चारूला वाटले मीच पटकन उतरून मोबाईल उचलून आणते. असा तिने विचार केला आणि ती उतरणार तेवढ्यात तिच्या दंडाला धरून कोणीतरी तिला डब्यामध्ये ढकलले. “मॅडम क्या कर रही हो?” तो म्हणाला.आणि तो स्वतःच त्या बाजूला उतरला. 

       ट्रेन हळूहळू चालू लागली होती त्या माणसाने खाली उतरून मोबाईल उचलला तोपर्यंत गाडीने वेग पकडला होता.  तीन, चार डबे पुढे निघून गेले होते तो गाडीत परत चढला की नाही? त्याला काही झाले तर नसेल आणि मोबाईल?

 

            चारू मुसमुसून रडायला लागली. गाडीने आता चांगलाच वेग घेतला होता. समोर बसलेले ग्रहस्थ त्याचे वडील असावेत. त्यांचा जीव घाबरा-गोबरा झाला होता. ते सारखे इकडे, तिकडे बघत होते आणि मुलगा कुठे दिसतोय का हे बघत होते. एवढ्यात दहा मिनिटे निघून गेली होती. 

 

        तो युवक आला. “ ये लो आपका मोबाईल” तो म्हणाला. त्या क्षणी तो तिला कोणा देवदूताचा सारखा वाटला होता. 

 

“अब रोना बंद करो अपना मोबाईल सम्हाल के रखा करो” त्याने अधिकार पूर्वक तिला दटावले. 

   

       चारूला तो एखाद्या स्टंट सिनेमा सारखा हिरो वाटू लागला. ती खुदकन हसली त्या तरुणाच्या चेहऱ्यावही हसू आले. 

   

      मोबाईल म्हणजे माणसाचे सर्वस्व झाले आहे. त्याला जीवापाड जपणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य झाले आहे. सर्व माहिती, फोन नंबर सारे, सारे काही मोबाईल मध्ये असते. मोबाईलचा दहा मिनिटाचा विरह तिला मोबाईल चे महत्व पटवून गेला होता, आणि त्या तरुणाच्या दणकट स्पर्श तिला कुठेतरी सुखावून गेला होता. 

 

        मोबाईलच्या संरक्षणासाठी तिने आपल्या खिडकीची काच खाली केली समोरच्या माणसाचे आभार मानण्यासाठी तिने त्याला दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि आपले आभार कसे मानू? असे म्हणता म्हणता तिचे डोळे आणि हृदय भरून आले होते. 

 

       म्हणाली “सर आप न होते तो मेरा बहुत ही बड़ा नुकसान हो गया होता.” तिला रडू अनावर झाले. त्याच्या वडिलांनी तिला सांत्वनेचा हात दाखवला म्हणाले “कोई बात नहीं बेटी होता है ऐसा कभी कभी।”

 

       तो युवक आणि तो गृहस्थ मुंबईला जाणार होते. चारूला सूरतला मावशीकडे जायचं होतं. सोमवारी मुंबईला एका कंपनीत इंटरव्यू द्यायचा होता. घरातून एकटी अशी ती पहिल्यांदाच निघाली होती पण मुंबईला जायला एकटी धजत नव्हती. सुरतहून मावशी चा मुलगा तिचा मावस भाऊ तिच्या बरोबर येणार होता. तिचे सर्व फोन नंबर सर्व पत्ते सारे नंबर  सारं काही त्या मोबाईल मध्ये होतं. जर हा मोबाईल हरवला असता तर केवढं नुकसान होणार होतं! मोबाईल चे महत्व तिला प्रकर्षाने जाणवलं होतं. 

 

        सर्व यात्रेकरू आपापल्या बर्थवर झोपण्याच्या तयारीत होते.  तिला सुरतला उतरायचे होते म्हणून ती नुसतीच पडून होती. एम. बी ए. झाल्यावर तिचा हा पहिलाच इंटरव्यू होता. नोकरी मिळाल्यावर तिची मोठी मोठी स्वप्न होती. तिला बाबांसाठी नवीन स्कूटर घ्यायची होती आणि आईसाठी कानाचे मशीन. बाबांची स्कूटर खूप जुनी झाली होती, आणि आईला खूप कमी ऐकू यायला लागले होते. 

 

        मनोमन सारखे समोरच्या तरुणाचे ती आभार मानत होती. त्याचे व्यक्तित्व ही तिला आवडले होते. त्याचं अस्तित्व तिला एका देवदूता सारखे वाटले होते. 

 

        लाईट विझवून सर्वच झोपले होते. सूरत यायला अर्धा तास उशीर होता. 

          अचानक समोरच्या  सीटवर त्याच्या वडीलांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांच्या श्वासाचा वेगळाच घुर्, घुर् आवाज होऊ लागला. ते अस्वस्थ होऊन उठून बसले. तो तरुण वर मधल्या सीटवर वर झोपला होता. चारू चटकन उठली बाटलीचं झाकण उघडून त्याच्या वडिलांना पाणी पाजलं आणि त्या युवकाचा खांदा हलवून त्याला उठवलं तो तरुण खाली आला त्याच्या वडिलांची अस्वस्थता खूपच वाढली होती.

तो ही त्यांची अवस्था बघून अस्वस्थ झाला होता. 

 

        चारू त्याला म्हणाली “सर,तुम्ही माझ्याबरोबर इथेच उतरून जावे. माझ्या मावशीचे यजमान प्रसाद जोशी डॉक्टर आहेत आणि स्टेशन जवळच त्यांचे हॉस्पिटल पण आहे. माझा भाऊ मला घ्यायला येणार आहे. तो ह्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल. इनको तुरंत ट्रीटमेंट मिल जायेगी प्लीज आप मेरी बात मान लीजिए.” आणि ते उतरण्यास तयार झाले. 

 

         चारूने फोनवर भावाला पूर्ण परिस्थिती आधीच सांगून दिली होती.  तिचा भाऊ कार घेऊन आला होता. त्याच्या वडिलांना दवाखान्यात भरती करून ट्रीटमेंट पण सुरू झाली. त्यांना ऑक्सिजन लावला आणि थोडा आराम वाटला. तो तरुण रात्री दवाखान्यातच थांबला होता. चारूने तिच्याजवळ असलेली फळे आणि आईने दिलेली चकली  त्याला दिली  आणि म्हणाली “भूक लागली तर खाऊन घ्या काळजी करून उपाशी राहू नका.” त्याने हसून तिला प्रतिसाद दिला. 

 

      डॉक्टर ऑक्सिजन काढून बघत होते आणि चांगलाच प्रतिसाद पण मिळत होता. 

 

         ती आणि तिचा भाऊ घरी जायला निघाले. देवासारखे धावून आलेल्या माणसाला आपण काही मदत करू शकलो याचंच तिला समाधान वाटत होतं. 

 

        दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांना बराच आराम वाटला होता. ते सूरतहून टॅक्सी ने मुंबईला जाणार होते. दवाखान्यात भरती करताना त्याने वडिलांचे नाव ब्रजकिशोर शर्मा असे लिहिले होते, म्हणून त्यांचे नाव माहित झाले होते. आणि त्यांनी आपल्या मुलाला नीरज म्हणून हाक मारली म्हणून त्याचे  म्हणजे तिच्या देवदूताचे नाव पण तिला कळले होते. 

 

          त्याचे वडील डॉक्टरांच्या पाया पडू लागले तर डॉक्टरांची त्यांचे हात वरचेवर उचलून घेतले, आणि म्हणाले की ह्या मुली मुळे तुमचा जीव वाचला आहे. ही तुम्हाला वेळेवर  दवाखान्यात घेऊन आली. आता तुम्ही मुंबईला जाऊ शकतात. तुम्ही आता ठीक आहात पण तुम्हाला पुढे काळजी घ्यावी लागेल.

 

    ते दोघे दवाखान्यातूनच टॅक्सी करून मुंबईला निघून गेले.

        

चारू दोन दिवस मावशीकडे राहिली. रविवारी तिच्या भावाबरोबर मुंबईला  इंटरव्यू साठी निघून गेली रात्रीच्या गाडीने तिला परत यायचे होते. 

 

          चारुने रेल्वेच्या वेटिंग रूम मध्ये फ्रेश होऊन आपले कपडे बदलले आणि दादरला पोहचली. चारूचा इंटरव्यूचा हा पहिलाच अनुभव होता. ती जरा घाबरली होती. इंटरव्यूला पाच कॅन्डिडेट आले होते. तिचा सर्वात शेवटी नंबर होता. प्रत्येक कॅंडिडेट आत्मविश्वासाने बाहेर पडत होता. म्हणून ती अजूनच नर्व्हस झाली होती. तिचं नाव पीएनं घेतलं तेव्हा तिचे अवसानच गळाल्यासारखं झालं होतं. ती भीत भीत आत गेली आणि समोरच्या माणसाला न बघताच अभिवादन केले. आणि नजर उंच करून समोर  बघते तर काय आश्चर्यचकित होऊन ती बघतच राहिली. 

          हा तर तोच देवदूत ज्याने माझा मोबाईल चालत्या ट्रेनमध्ये उतरून आणून दिला होता. दोघेही एकमेकांकडे एकटक बघत राहिले. 

        तो मनात म्हणाला “हो ही तर तीच मुलगी जिने माझ्या वडिलांचे प्राण वाचवले.” 

 

     चारुलता सप्रे मॅडम, इंटरव्यू तर मी घेईनच पण तुम्हाला त्या आधी माझ्या आईला भेटायला यावं लागेल. तुम्हाला यायलाच हवं माझ्या घरी. माझे वडील तुम्हाला बघून खूप खुश होतील” तो म्हणाला. 

          “पण मला आज रात्रीच्या ट्रेनने परत जायचं आहे” चारू म्हणाली. 

        “माझं घर इथून जवळच आहे मी तुम्हाला ट्रेन वर सोडून देईन. ” त्याच्या आग्रहाला तिला  नाही म्हणता येईना. तिने भावाला फोन करून परस्पर स्टेशनवर येण्यासाठी सांगितले. 

 

      नीरजच्या घरी तिचे आत्मीय स्वागत झाले होते. तिच्या आईने तर तिला दोन मिनिट हृदयाशी धरूनच ठेवले होते. तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. नवऱ्याचे प्राण वाचविण्याचे उत्कट आभार त्या मिठीत होते. त्याच्या वडिलांनी पण भरपूर  आशीर्वाद तिच्या डोक्यावर हात ठेवून दिला होता. ती वात्सल्य प्रेमात चिंब नाहून निघाली होती. 

 

       मुंबई स्टेशनवर नीरज  तिला सोडायला आला होता. कारमधून उतरताना त्याने हस्तांदोलनासाठी तिच्यासमोर हात केला आणि म्हणाला “हमे तुमसे प्यार हो गया है चारू. तू मला परत भेटशील? “ चारूने आपला दुसरा हात त्याच्या हातावर ठेवला आणि म्हणाली तुझ्या सारख्या देवदूताला नाही कसं म्हणू  मी? आज माझ्या जीवनात नवीन सूर्योदय झाला आहे. तिने त्याच्या हातावर आपला दुसरा हात ठेवून संमती दर्शविली. 

 

कविता पुणतांबेकर “कुमुद” 

शाजापुर मध्य प्रदेश

70006709418

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू