उंबऱ्यावरचं सुख
"उंबऱ्यावरचं सुख"
आई नेहमी म्हणायची, "बाहेर कितीही सोनं-चांदी गोळा केलंस तरी, घराच्या अंगणात बसून प्यायलेला चहा वेगळाच असतो रे!" हे ऐकून मला हसू यायचं.
... पण आज,खरंच खूप दिवसांनी घरी परतताना, तिच्या त्या शब्दांचा खरा अर्थ उमगतोय."सुखाची झुळूक कुठूनही येऊ शकते, पण घराच्या उंबऱ्यावरून आलेली हवा कधीही थेट हृदयापर्यंत पोचते."
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काहीतरी शिकावं लागणार असतं, काहीतरी नवं समजून घ्यावं लागणार असतं. पण काही वेळा, जितके शिकायचं आणि अनुभवायचं आहे, त्यापेक्षा जास्त त्याचंच उत्तर आपल्या स्वतःच्या घरात, आपल्या ओळखीच्या वातावरणात आणि आपल्या माणसांच्या गोड सहवासात मिळतं.
"हॉटेलच्या खोलीतल्या त्या टीव्ही च्या स्क्रीन वर बाहेरच्या जगाचा रंगीबेरंगी नजारा दिसत होता. गर्दीचे आवाज, प्रकाशाचे खेळ, झगमगाट सगळं काही तिथं होतं... पण त्या झगमगाटाच्या आडून मनाच्या एका गहिऱ्या कोपऱ्यात घरच्या उंबऱ्यावरचा गंध, आईच्या स्वयंपाकघरातून येणाऱ्या फोडणीचा आवाज, आणि बाबांच्या चहाच्या कपातील घोटांची उबट मिठास आठवत राहिली. क्षणभर वाटलं, मोठं व्हायचं स्वप्न तर पूर्ण झालं... पण खरं मोठेपण ते आहे का जिथं माणूस आपल्या मुळांशी जुळतो?"
हॉटेलच्या टीव्ही च्या स्क्रीन वर , ती बंधनं आणि इतर जगापासून काहीतरी वेगळं शोधताना मी एका वेगळ्याच जागी पोहोचले. “घर म्हणजे घरचं असतं,” असं सांगणारा एक साधा विचार मनाच्या गाभ्यात उमठला.
"मी अनिकेत, एका मल्टी नॅशनल कंपनीमध्ये काम करतो.
प्रमोशन झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाढल्या आणि त्याबरोबर देशभर फिरायची संधीही मिळाली.
पूर्वी मी ऑफिसच्या मिटींगसाठी क्वचितच बाहेर पडायचो, पण आता सिनियर मॅनेजर झालो आणि मिटींग्स, सेमिनार्स यासाठी दर महिन्याला कुठे ना कुठे प्रवास अनिवार्य झाला.
पहिले"घर आणि ऑफिस — एवढंच माझं मर्यादित क्षेत्र. या दोन ठिकाणांच्या वळणावरच माझं आयुष्य फिरत होत.
ऑफिसच्या कामासाठी कितीही मोठ्या शहरांमध्ये, चकाकत्या गगनचुंबी इमारतींमध्ये जावं लागलं, तरी मनाचा तळ मात्र कायम घराच्या उंबरठ्यावरच अडखळतो. प्रवास संपतो तेव्हा, मोकळ्या आकाशाखाली आपल्या घराकडे येणारी वाटच खरी वाटते."असं आयुष्य जगणारा.बाहेर किती ही सुविधा असो. घरचा उंबरठा तो घरचा.
ऑफिसच्या प्रोजेक्टमुळे मी मुंबईमध्ये गेलो होतो.ती मिटिंग 5स्टार हॉटेल मधे होणार होती.
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये माझी पहिली मिटिंग आणि पहिला अनुभव. प्रमोशन झाल्यानंतर चा.
एक मोठं, समृद्ध शहर, ज्याच्या प्रत्येक रस्त्यावर लग्नाची शाही सवारी, चकचकीत दुकानं, आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अतिरेक असलेल्या सुविधा दाखवलेल्या होत्या..
"त्या ५-स्टार हॉटेलच्या भव्य प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकलं आणि क्षणभर डोळे दिपून गेले. सर्वत्र झगमगती प्रकाशयोजना, सुगंधी फुलांची सजावट, मंदपणे वाजणारी सॉफ्ट संगीताची सुरावट... जणू काही स्वप्नात वावरत होतो.
काही तासांतच शहराच्या सर्व सुंदरतेची साक्ष मिळाली होती. बुफे टेबलांवर इन्फिनिटी काउंटर, सजवलेले रूम्स, क्रिस्टल लाइट्स आणि आधुनिकतेचा चंद्रप्रकाश… एका शब्दात, शहरी आलिशान जीवनाची संपूर्ण अनुभूती.
रिसेप्शनवरील स्वागताचा गोड हसरा चेहरा, कोमलपणे विचारलेले 'हाऊ वॉज युवर जर्नी, सर?', हातात ठेवलेली गरम टॉवेल्स आणि थंड पेय... सर्व काही इतकं देखणं की शरीराचा थकवा क्षणभर विसरायला झालं.
रूममध्ये गेल्यावर तर सुखाच्या मर्यादांचं नवं परिमाणच समोर होतं. मऊशार गाद्या, रेशमी पडदे, वातानुकूलित गारवा, वाफाळता कॉफीचा मग आणि काचेच्या भिंतीतून दिसणारा शहराचा रोषणाईने नटलेला देखावा!
बाथटबमध्ये सुगंधी फुलांच्या पाकळ्या तरंगत होत्या, आणि एक हलकीशी गोडशी वेलकम चॉकलेट ठेवलेली होती.
सर्व काही अगदी परिपूर्ण!
सुविधा अशा की, जणू एक क्षणही स्वतःच्या गरजेसाठी हालचाल करावी लागणार नाही. एका बटणावर कॉल केल्यावर गरम कॉफी, दुसऱ्या बटणावर हवे तसं उबदार अंथरुण... काहीतरी स्वप्नवत!
संध्याकाळी स्विमिंग पूलच्या काठावर बसून शँपेनचे ग्लास उंचावले जात होते, आणि टेबलांवर मोमबत्त्यांची उजळण चालली होती."किती सुखद होत. जणू स्वप्न.
5स्टार हॉटेल चा हा माझा पहिला अनुभव.
अगदी राजवाडा सारखं अनुभव. आजूबाजूला सुटसुटीत गणवेशातील सेवक, प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून, फक्त माझ्या एका इशाऱ्याची वाट पाहत होते. एका फोनकॉलवर गरम कॉफी समोर येत होती, दुसऱ्या कॉलवर आरामदायक तकिया लावले जात होते.
मला फक्त ऑर्डर करायची... आणि क्षणात ती गोष्ट समोर उभी राहत होती.
आयुष्यभर केवळ ऐकून होतो — राजघराण्याच्या शाही थाटाचे किस्से. पण त्या दिवशी मी प्रत्यक्ष अनुभवत होतो — राजसदृश सेवा, अमाप सुविधा, आणि विलासी वातावरण.
संपूर्ण हॉटेलमध्ये एक शांत, शिस्तबद्ध हालचाल होती. कुठेही आवाजाचा गदारोळ नाही, कुणी घाईत नाही. प्रत्येक गोष्ट जणू काळजीपूर्वक आखून घेतली होती — एक सौम्य, सभ्यपणाने भरलेली व्यवस्था.
दरवाजे आपोआप उघडले जात, वेटर्स हसऱ्या चेहऱ्याने नम्रपणे झुकत, आणि हॉटेलचा सुवासिक गंध संपूर्ण अस्तित्वाला व्यापून टाकत होता.
एका क्षणी स्वतःलाच विचारलं — 'हे खरंच आपलं आयुष्य आहे का? की स्वप्न आहे?'
पण त्याच क्षणी, मनाच्या एका दुरवरच्या कप्प्यातून कुणीतरी हळूच कुजबुजल्यासारखं वाटलं... 'या चकाकीच्या बाहेर काहीतरी अजून मौल्यवान आहे... एक अशी जागा, जिथे सेवा नाही, पण आपुलकी आहे. जिथे आदेश नाही, पण आपसूक समज आहे.'
आणि त्या विचाराने मनात नकळत घराची आठवण दाटून आली."
"५-स्टार "गारवा.".. पण घराचं सुख निराळंच!"
"हो... हे खरं होतं,
हा हॉटेलचा गारवा मनाला कितीही सुखावणारा असला, तरी घर ते घर!
इथे सगळं होतं — राजेशाही सोयी, नाजूक वागणूक, तडतडीत स्वच्छता, सुगंधी वातावरण, आणि प्रत्येक क्षणी एक 'विशेष' असल्याची जाणीव करून देणारी व्यवस्था.
पण...
या शिस्तबद्ध गारव्याच्या मागे काहीतरी हरवत होतं — आपलेपणाचा गंध, नात्यांची उब, आणि कुठलाही अभिनव नसलेली सहजता.
."एक आठवड्याचं महत्वाचची मीटिंग संपली होती,
मी फाईव्ह स्टार हॉटेलच्या राजेशाही दारातून बाहेर निघत होतो. दरवाजाचा समोर एक सेवक होता. सलाम साहेब सगळ सामान त्यानें हातात घेतलं, लिफ्ट मधून ग्राउंड फ्लोअर आलो आणि कॅब बुक करून दिली.
बाहेर येतानाचा तो अनुभव अगदी वेगळाच होता — एका बाजूला प्रचंड सोयी, ऐशआरामाचं आयुष्य मागे टाकून चाललो होतो, आणि दुसऱ्या बाजूला काहीतरी हृदयाच्या कोपऱ्यात जपलेलं वाटत होतं... घर."
तिथून विमानाचा प्रवास विमानतळाकडे निघालो.
एअरपोर्टवर सगळं गजबजलेलं होतं.
शेजारी बसलेली माणसं वेगवेगळ्या भाषेत बोलत होती, पण मला हवी होती ती एकच भाषा — घरच्यांची, प्रेमाची.
विमान हवेत झेपावलं.
खिडकीबाहेर पाहिलं. ढगांचे थर, सूर्याचा हलकासा स्पर्श, जणू देवाने पांढऱ्या शुभ्र चादरीने आकाश झाकलं होतं.
त्या क्षणी मनात विचारांचा झरा वाहत होता —
"घर म्हणजे काय?
एका पायऱ्यावर बसून चहा प्यायचा सोप्पा आनंद?आईच्या स्वयंपाकघरातून येणारा वरणभाताचा सुगंध... त्यावर ताजं ताजं तूप पडलेलं...
त्या वरणभाताच्या गरम गरम वाफेत जी चव लपलेली असते, ती चव कशाही पंचतारांकित जेवणात मिळत नाही.
हॉटेलमध्ये चमचमीत पदार्थांचा डोंगर असतो, पण तिथे त्या एका वाटी वरणभातासारखं समाधान कधी मिळालं नाही.
आईच्या हातातली जादू वेगळीच!
जेवताना घासावर तूप वाढतानाची तिची मायेची नजर, आणि "अजून वाढू का रे?" असा विचारता विचारता डोळ्यांत दिसणारी काळजी...
हा जो गंध आहे, हा जो गारवा आहे, तो लाखो रुपयांच्या डिशमध्येही सापडत नाही.
बाबांच्या हातून दिलेली ती एक पाठीवरची थाप?"
विमान जमिनीवर आलं आणि शरीरासोबतच मनही हलकं झालं.
आपण जवळ आलो आहोत... घराजवळ!
कॅब बुक केली.
ड्रायव्हर गप्पा मारत होता, पण माझं मन आपल्या गल्लीच्या वळणांमध्ये घुटमळत होतं.
गल्लीतून जाताना नेहमीची झाडं, दुकाने, आणि एखाद्या लहान मुलाच्या हातातली पतंग दिसली.
क्षणात मन लहानपणीच्या उन्हाळी सुट्टीत परत गेलं.
"पाणीपुरी खाणं, पतंग उडवणं, आणि संध्याकाळी आईच्या कुशीत पडणं..."
तो गोड गारवा आठवला.
कॅब वळली आणि माझं घर दृष्टीआडून दृष्टीसमोर आलं.
पायऱ्यांवर उभा असलेला बाबा आणि दारातून डोकावणारी आई — त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच आनंद होता.
जणू माझ्या परतीची त्यांना किती आतुरतेने वाट पाहत होती!
गाडीतून सामान काढलं.
आईने पटकन डोक्यावरून हात फिरवला.
"दमला असशील. ये, आत ये."
त्या एका हाताच्या स्पर्शाने फाईव्ह स्टार हॉटेलच्या सर्व सुविधा क्षणार्धात फिकी पडल्या.
घरात पाऊल टाकताच तो खास वास जाणवला
घराचा, आपुलकीचा, प्रेमाचा वास.
आईने गरम गरम चहा आणला.
बाबांनी माझं सामान बाजूला ठेवून म्हटलं,
"सगळं झालं ना सुरळीत? आता फक्त आराम कर."
मला वाटलं —
सगळी दुनिया एकीकडे आणि घर एकीकडे!
हॉटेलच्या खोलीत असलेल्या गुलाबाच्या फुलांपेक्षा,
आईच्या हातची गरम चहाची वाफ मला जास्त सुंदर वाटत होती.
घराच्या त्या गोड प्रेमात आणि ओळखीमध्ये असलेल्या गारव्याचं सादरीकरण कुठेच नसतं. ज्या घरात प्रत्येक आवाज, प्रत्येक गोड हसू त्याचंच असतो, त्याचं महत्व वेगळंच असतं. हॉटेलमधून तो परिष्कृतपणा, त्या चकचकीत वातावरणाच्या दृष्टीने तो सुख असतो. पण घराचं खरे सुख ते साधेपणात सापडतं, जिथे प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द माणसाच्या अंतरंगाशी जोडला जातो. "होऊन जाऊ दे" – घरी परतल्यावरच आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या ताज्या ओळखीचा गारवा सापडतो.
५-स्टार हॉटेलच्या तुलनेत तर घर चिमुकलं होत.
तेथे असलेल्या टेबल-लॅम्पपासून ते बाथटबपर्यंत सगळ्या सोयी इथे नव्हत्या.
इथे ना वेल्वेटचे गाद्या, ना अत्तराने भरलेली हवा, ना एका फोनवर धावून येणारी सेवा.
इथे होती... ओसरीवर ठेवलेली एक जुनी पलंगडी.
घरगुती चपला, भिंतींवरचे साधेसुधे फोटो आणि दरवाज्याजवळ वाजणारी विळवळती बेल.
पण...
त्या प्रत्येक गोष्टीत एक अस्सल प्रेमाचं, आपलेपणाचं सुवास होतं.
हॉटेलच्या खोलीतली पांढरी चादर जेव्हढी स्वच्छ होती,
तितकंच आईने घातलेलं जुनं, मऊसर चादरीचं उबदारपण मनाला अलगद पांघरून गेलं.
बाहेरच्या जगात जेवण महागड्या ताटांत, स्टायलिश ग्लासमध्ये होतं,
इथे मात्र स्टीलच्या ताटात गरमागरम वरणभात...
वरणावर भात ओतताना आईचा हात चुकून माझ्या हाताला लागला आणि त्या स्पर्शात एक शब्दही न लागणारा गोडवा होता.
घर म्हणजे,
जिथे वायफायचा सिग्नल जेमतेम असतो कधीकधी,
पण प्रेमाचा सिग्नल कधीच कमजोर होत नाही!
हॉटेलमध्ये मी रॉयल्टी वाटलो होतो,
इथे मात्र... मी 'माझा' वाटलो.
सुखसोयी आणि दिखावा जितकाही मोठा असला तरी,
तो 'गारवा'... त्या भिंतींच्या मागचं प्रेम, तो गंध, ती नात्यांची ऊब,
या छोट्याशा घरात भरभरून होता.
आई-बाबांनी उत्सुकतेने विचारलं, "अनिकेत, कसा झाला तुझा प्रवास? आणि फाईव्ह स्टार हॉटेलचा अनुभव आम्हाला ही सांग. आम्ही तर फक्त ऐकलं होतं, पण तू तर जाऊन आलास!"
अनिकेत हसत हसत त्यांच्या समोर बसला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलका आत्मविश्वास होता. "हो," तो म्हणाला, "फाईव्ह स्टार हॉटेलचा अनुभव चांगला होता. मोठं, भव्य, आणि हवं ते सर्व काही... सेवा, सुविधा, आराम, सगळं होतं आई बाबा कान लावून एकत होते.
अनिकेत हसत हसत पुढे सांगायला लागला, "रूम सर्व्हिसला फोन केला की.
आणि 'पाणी हवं' असं सांगितलं. एक मिनिटाचं वेळ गेला असेल , आणि लगेच एक माणूस पाणी घेऊन आला. मी थोडं विचार करतच राहिलो... आणि मग मनात एक गोष्ट आली.
"घरात असताना, स्वतःच पाणी स्वतःच घे, इथे पाणी आणायला एखादा 'नौकर ठेवला आहे का?" — हे घरआहे फाईव्ह स्टार हॉटेल नाही.
"आईचे" शब्द मनात घुमत होते.
आणि गंमत म्हणजे, घरी एखादी वस्तू हातात मागितली की आई लगेच आणून द्यायची... वर हसून म्हणायची,
'घर लहान असलं तरी सेवा मात्र फाईव्ह स्टार हॉटेलसारखीच आहे हो!'"
"फक्त बिल द्यायचं नसतं!'
"हॉटेलात चपला ठेवायला 'शू-रॅक', कपडे ठेवायला 'लॉन्ड्री बॅग' आणि जगायला 'नियम'... घरात मात्र चपला कुठेही, कपडे खुर्चीवर आणि मोकळं हसू सर्वत्र!
इथे कोणतीही बेल वाजवायची गरज नाही, आईची एक हाक पुरेशी!
हॉटेलमध्ये आवाज दाबून बोलायचं असतं, घरात मात्र हसणं आणि गोंगाट हेच स्वागताचं गीत!"
आई-बाबा हसत होते, अनिकेतच्या हॉटेलच्या गमतीजमती ऐकताना.
अनिकेतने हसत सांगत होता,
"हॉटेलात काही हवं असेल तर सर्व्हिस बेल वाजवावी लागते...
आणि आपल्याकडे? घरात तर फक्त एकच बेल आहे — आईची मायेची! ती वाजवली की गरज न सांगताच सगळं मिळतं!"
आई डोळ्यांत गोड हसू आणून म्हणाली,
"बघितलंस ना आता? घराचं मोल कुठल्या फाईव्ह स्टारमध्ये मिळतं का?"
बाबा मिश्कीलपणे म्हणाले,
"बरं झालं पोरगा हॉटेलात जाऊन आला... आता तरी घरातल्या मोलाची किंमत कळली!"
"अनिकेतने हसून म्हणाला"
"आई, तुझ्या हातचं वरणभात हा माझ्यासाठी जगातला सगळ्यात मोठा 'फाईव्ह स्टार' आहे!"
आई-बाबा दोघंही समाधानाने हसले.
घराच्या त्या छोट्याशा जागेत मोठ्ठं सुख दरवळत होतं... गारव्याची ती झुळूक पुन्हा मनाच्या उंबऱ्यावरून आत शिरली होती
हॉटेलाच्या दाराला 'Do Not Disturb' बोर्ड लावून शांत झोपता येतं.
घरात मात्र, सकाळी आईने जोरात दार उघडून विचारायचं, "अजून झोपलास का? उठ! गरम उपमा केला आहे!"
मनात थोडं वैताग येतो, पण त्याच उपम्यासोबत मिळणाऱ्या प्रेमाचा स्वाद कोणत्या हॉटेलमध्ये मिळणार?
हॉटेलात एसी चालू असला तरी, मनात एक गुदमरणं असतं. घरात मात्र, जुन्या खिडकीतून येणारं मोकळा गारवा आणि बाहेरचं चिवचिवाट ऐकताना झोपेचा वेगळाच आनंद असतो.
आई-बाबा अजूनच उत्सुक झाले, "
"म्हणजे," मी हसून म्हणालो, "हॉटेलमध्ये 'एसी रूम' असतो, पण घरात आपल्याला 'घरचं झोपायला तिथे पंखा आणि इतर मजा' असतो. आणि हो, हॉटेलमध्ये 'सर्व्हिस' असतो, घरात मात्र 'तुम्ही सगळं का नाही करत?' असा आवाज असतो!"
बाबा हसले आणि म्हणाले, "अरे, ते तसं आहे. घरातली माणसांची काळजी हॉटेलमध्ये मिळणं कठीण!"
"हो, बाबांनो!" मी तणकून म्हणालो, "हॉटेलमध्ये ५-स्टार सुविधा असतात, पण घरातचं प्रेम असलं की प्रत्येक दिवशी ५-स्टार अनुभव मिळतो! घरात हॉटेलसारखी सुविधा मिळत असली तरी 'रूम सर्व्हिस' फक्त हॉटेल्समध्ये असतो, घरात नाही! होन बाबा!
बाबा खरंच सांगू का?घराच्या उंबर्यावर जरा पाऊल टाकलं की, एक असं सुख मिळतं, ज्याचं वर्णन शब्दांनी करणं कठीण आहे. एखादी उबदार हवा, एखादं हसणारं चेहरा, आणि त्याच्याशी कनेक्ट होणारा एक जुना, खूप प्रेमळ संबंध... हे सगळं एकत्रितपणे तुमच्या मनाला एक वेगळा "गारवा "देऊन जातं.
जेव्हा घराच्या उंबर्यावर उभं राहतो, तेव्हा हॉटेलच्या सर्व सुविधा विसरून जातो. घरातल्या त्या प्रत्येक रचनेमध्ये एक नवा आनंद असतो. घर म्हणजे एक साधं असं ठिकाण, पण त्याच ठिकाणी असलेल्या सुखाचा गारवा इतर कुठेही मिळत नाही.
आणि हो!सुखाच्या सुगंधाचं मूळ नेहमी आपल्या घराच्या उंबऱ्याशीच सापडतं."हे मला आज पटत आहॆ.
हो,अनिकेत!"हॉटेलसारखी झगमगती विलासिता, कितीही डोळे दिपवणारी असली तरी, घराच्या मातीच्या गंधातल्या गारव्याशी तिची तुलना तरी कशी होणार? तिथे मिळतो थाट, पण इथे मिळतं आपलेपणाचं खरं सुख!"
त्या क्षणी समजलं. आयुष्य कितीही उंच भरारी घेत असलं, तरी उंबऱ्यावरच्या दोन पायांमध्येच खरी स्थिरता असते.
फाइव-स्टारच्या मखमली गाद्या, झगमगत्या दिवे, आणि एकाच बेलवर धावून येणारी सेवा... यांच्यातही, घराच्या चहा-कपातल्या ऊबेपुढे काहीच नव्हतं.
घर म्हणजे फक्त एक जागा नाही, घर म्हणजे... प्रत्येक धडपडीच्या शेवटी मिळणारं निवांत हसू, आणि 'घरी आलास का?' म्हणून विचारणाऱ्या नजरेचा गोड गारवा."
आई-बाबा त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे लवकर झोपायला गेले. दिवसभराच्या गडबडीनंतर तेही थोड्या शांततेच्या शोधात होते.
अनिकेतही उद्याच्या ऑफिसच्या तयारीच्या विचारात बुडालेला होता. बॅग उघडून ठेवलेली... कपडे ठेवायचे, फायली नीट लावायच्या, आणि मेंदूच्या एका कोपऱ्यात विचार सुरू होता — "उद्या प्रेझेंटेशन आहे, काही विसरायला नको..."
पण सगळ्या तयारीनंतर, जेव्हा अनिकेत आपल्या उशीत डोकं खुपसून झोपायला गेला, तेव्हा हळूहळू डोळे मिटताना त्याच्या मनात एकच विचार घोळत राहिला —
"घरातल्या या शांततेचा, मायेचा आणि गंधाळलेल्या उबदारतेचा काहीच तोड नाही... ५-स्टार हॉटेलच्या मऊ गाद्यांपेक्षा आई-बाबांच्या आशीर्वादाचा गारवा कितीतरी भारी आहे!"
आईच्या शब्दांचा अर्थ त्याला संपूर्णपणे समजलाच. सुखाची परिभाषा सोपी होती. "घरचं सुख, घराचं गारवा आणि घरातलं प्रेम... ते कुठेही मिळू शकत नाही."
"घर म्हणजे खरं जीवन, घर म्हणजे आपला "गारवा."
तृप्ती देव
