पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ओळख

ओळख

******


" साहेब , घ्या साहेब , तोंड गोड करा साहेब ! "  लाडवाचा डबा बंगल्याच्या साहेबांसमोर उघडत बंड्या खुषीत म्हणाला.

" कश्या बद्दल गोड तोंड करतोय ! " साहेब लाडवाचा तुकडो तोडत म्हणाले.

" मला नोकरी लागली. आता मी बैंकेत साहेबाच्या पदावर काम करणार. "

" असं होयं ! खूप आनंदाची बातमी दिली बरं ! रमे... अगं रमे ! हे बघं बंड्याने लाडू आणले ! " ते बंड्याला म्हणाले 

" जा आत जाऊन मैडमला पण दे. " 

बंड्या आनंदाने आतल्या रूममध्ये गेला. मैडम ने त्याला रोखून बघितले.

" कोण तू ! कचराकाढणारीचा मुलगा ना ! "

" माझी आई स्वच्छताकरणारी आहे. " बंड्या अपमानाने दुःखी झाला.

मैडम थोड्या उंचस्वरात त्याला म्हणाल्या

" त्या कोपऱ्यावरच्या टेबलावर एकीकडे ठेवून दे ! "

बंड्याने टेबलावर लाडवांचा डबा ठेवला पण मनावर दडपणघेत तो दुखी होऊन घराकडे परतला. त्याचे मन खळबळत होते...

" वेळ ,काळ ,परिस्थिती सर्व बदलली ....लोकांचे विचार आणि माझी ओळख कधी बदलणार ! "

- डॉ. वसुधा गाडगीळ ,इन्दूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू