पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्नूझ

 

त्याने मोबाईल कसाबसा स्नूझ केला ,आपल्या उशीखाली ठेवला व कूस बदलून पायावरची चादर पाया पासून  डोक्या पर्यंत ओढून घेतली घेतली. परत झोप  लागणार तेव्हढ्यात त्याला भास झाला की कोणी आपल्या डोक्यावरची चादर ओढतय, गालावंर कोमल-कोमल हाताचा स्पर्श होताच त्यानें डोळे किलकिले करून बघितले त्याच क्षणी "ताsss" म्हणत ती  सरळ अंगावरच चढली.तो वात्सल्य प्रेमाने ओथंबून निघाला. तिला पाठी वरून  हळूच खेचत आपल्या कुशत घेऊन कुरवाळू लागला.

त्याच क्षणी  उशी खालचा मोबाईल परत वाईब्रेट झाला, त्यांनी लगेच बाहेर काढून त्याला बंद केला व बिछान्याच्या दूस-या टोकाला भिरकावून लावला.

व्यायाम/जागिंग काय पुढे ही करता येईल ,तसे ही काही महिन्यात सोनूलीच्या सायकल मागे धावावेच लागेल,हे दिवस कधी परत येणार नाहीं असा  विचार मनात येताच  त्याने तिला अजून जवळ ओढून घेतले, हळू हळू तिच्या केसांतून हात फिरवू लागला. मंद आवातत अंगाई चालू झाली. काही क्षणात दोघे गाढ झोपी गेले.

ह्यानी पण परत डोळी मिटून घेतले. दोघे गाड झोपी गेले.

वातावरणात अता दोघांच्या घोरण्याचा आवाज घूमत होता.

©नयना(आरती)कानिटकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू