पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आणि हा CORONA माणुसकी शिकवू लागलाय ...

चीन च्या वुहान मधून कोणी एक विषाणू आला

हळूहळू म्हणता म्हणता तो जगभरात पसरला ,

घरात राहा तुम्हीही आता सांगू लागलाय

आणि हा CORONA माणुसकी शिकवू लागलाय ...


डॉक्टर बिचारे करताय अथक शर्थीचे प्रयत्न

देशाला साथ देताय खाकी वर्दीतले रत्न ,

आज माणूस त्यांच्यातच देव पाहू लागलाय

आणि हा CORONA माणुसकी शिकवू लागलाय ...


पोळी वाया घालवणारा आज वाचवू लागला अन्न

Lockdown च्या परीक्षेत जो तो झालाय सुन्न ,

घासातला घास तो गरजूंना वाटू लागलाय

आणि हा CORONA माणुसकी शिकवू लागलाय ...


यामुळेच आता थोडक्यात होऊ लागले लग्न

जो पाहाल तो Mask लावण्यात मग्न ,

येता जाता माणूस बिचारा हातपाय धू लागलाय

आणि हा CORONA माणुसकी शिकवू लागलाय ...


पायी स्थलांतर करू लागले बेरोजगार कामगार

घरी बसलेले सुद्धा होऊ लागले बेकार ,

मिळेल ते काम माणूस आता करू लागलाय

आणि हा CORONA माणुसकी शिकवू लागलाय...


सरकारनेही दिलाय यावर मदतीचा हात

माहितीय  नक्कीच करू आपण Corona वर मात ,

शीणला असला तरी हा भारत नाही थकलाय

आणि हा CORONA माणुसकी शिकवू लागलाय ...

आणि हा CORONA माणुसकी शिकवू लागलाय ...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू