पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रस्ते

आता आवडायला लागलेत मला लांबलचक, एकाकी रस्ते...त्याचं संपणे दिसतच नाही...

आणि आवडतं त्यावरून चालत जायला....एकटेच...

कुणीच नको मागे, पुढे...कुठेच

नकोत

नकोत कुणाचेच हात हातात गुंफलेले...

कारण जाणवायला लागलंय मला सत्य ...त्या जीवनपथाचे...त्या एकटेपणाचे...

सकाळ होताच बघेन मी केशरी सूर्योदय...निळ्या आभाळात विखुरलेल्या त्याच्या सुंदर छटा...नागमोडी वळणाच्या लांबलचक रस्त्याच्या शेवटी फुललेला तो स्फुल्लिंग...

बघेन , रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेले, लालभडक फुलांनी वेढलेले हिरवेगार वृक्ष...आणि,

 चालत राहीन एकटीच .... जीवनपथाच्याअंतापर्यंत...

एकटीच.....

सुषमा ठाकुर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू