पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अकरावी मैत्रीण

अकरावी मैत्रीण

*************

साक्षी नावाची एक मुलगी होती. ती आज खूप कंटाळली होती. शाळेच्या सुट्ट्या होत्या पण तिला बाहेर जाता येत नव्हते, मैत्रिणींसोबत खेळता येत नव्हते. तिच्या समर क्लासेस पण बंद होत्या. 

"अजून हे किती दिवस चालणार ग आई?" तिने कंटाळून आईला विचारले.

"हे तर कुणीच सांगू शकत नाही"

"मला खूप कंटाळा आला आहे, माझी एक पण मैत्रिण नाही सोबत.." साक्षी रडकुंडीला आली.

"अगं असं कसं म्हणते ? देवाने प्रत्येक माणसाला दहा मित्र तर दिलेच आहे आणि ते सतत आपल्या सोबत असतात. " आईने हसून म्हटले.

"ते कोणते ग आई" 

"दोन डोळे, दोन कान, दोन हात, दोन पाय एक तोंड आणि एक डोकं! हे जर आपल्यासोबत आहेत तर मग कंटाळा येण्याचा प्रश्नच उरत नाही. 

आपल्या घरी किती सुंदर सुंदर पुस्तकं आहेत आपण ते वाचू, चित्र काढू, आपण रोज अंगणात सुबक रांगोळी काढू, मस्त मस्त गाणी ऐकू, मी तुला रोज एक गोष्ट सांगेन. आपण घरातील अनुपयोगी वस्तुंचा उपयोग करून क्राफ्ट करू....!घरच आजपासून आपली समर क्लास!" आता साक्षीच्या चेहऱ्यावर सामाधानाचे हास्य उमटले होते. मिश्कीलपणे हसत तीने आईला विचारले, "पण मला एक सांग तू खोटं का बरं बोललीस?"

आई गोंधळली, "मी कधी खोटं बोलले ग?"

"तू तर म्हटलं देवाने दहा मित्र मैत्रिणी दिले आहेत पण दहा नाही ते अकरा आहेत. सर्व मुलांची अकरावी मैत्रीण म्हणजे आई!!" 

साक्षी खुदकन हसली आणिन आईला बिलगली.

©ऋचा दीपक कर्पे 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू