शून्य
शून्य
कधीतरी शून्य होऊनि बघावे
सन्यासाच्या आधीच असावे
वैराग्याच्या मधेच नसावे
संसाराच्या चवीत कधी बिना मिठाचे खावे
कधीतरी शून्य होऊनि बघावे
मी आणि माझे बाहेर पडावे
शत्रुच्या पण ह्र्दयात शिरावे
देव दानव नसून कधी मनुष्य होऊनि राहावे
कधीतरी शून्य होऊनि बघावे
मनाला शुभ्र वसन नेसवावे
जे आले ते परत करावे
जीवनाच्या वसंतात सुद्धा मोक्षमार्ग आळवावे
कधीतरी शून्य होऊनि बघावे
कटु कर्कश ते विसरुनि बघावे
आनंद अतिरेकही सोडून द्यावे
पुसुनि पाटी जीवनाचे, पुन्हा नव्याने लिहावे
कधीतरी शून्य होऊनि बघावे
शून्याचे गणित करुन पाहावे
जीवनाचे गुणित ना भाकीत करावे
डाव्या बाजूस गुणांचे भक्कम जोडीदार असावे
कधीतरी शून्य होऊनि बघावे
अंतरा करवड़े