पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वभाव

माणसांच्या गर्दीमध्ये हरवलाय स्वभाव ,

खरा कोणाचाच नाही सगळा खोटाच हावभाव 


पोटात न ठेवणारी असतात काहींची बोलकी मने ,

न बोलताच कळते कुणाचे मुक्यानेही बोलणे


कलाकार हृदयी ते दिलखुलास असतात काही ,

स्वच्छंदी विहार करतात त्यास कसलीही सीमा नाही


खोटारडी ही असतात कोणी तर कोणी नाटकी ,

काही असतात हलक्या कानाची व भटकंती करणारी भटकी


काही मात्र शीघ्रकोपी तोंडावरती अपमानाचा जाळ ,

काही बिचारे स्वभावाला वरण भाता सारखे मवाळ


खोटे मुखवटे धारण करून कशाला करतात यांचा वध ,

चांगले होईल ,कधी वाईटही होईल जरी नसले स्वभावाला औषध !!!

जरी नसले स्वभावाला औषध ...!


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू