पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विश्व क्षितिजापालिकडचे

विश्व् क्षितिजापलीकडचे



वाऱ्यावर तरंगत बकुळीचा सुवास ,

झाली सांजवेळ , रोजचीच उदास


दिवेलागणीचे चमचम , लुकलुक दिवे

अजूनही आत्म शोधात झाड अंधारात उभे


व्याकुळ मनाने ऐकते दूर  देवळातील घंटानाद

होऊन जाते मी देऊळच पूर्ण , देऊ लागते "त्या " ला साद


गेलेल्यांच्या सावल्या मनात कोरलेल्या

येणाऱ्यांची प्रतीक्षा डोळ्यात काजळलेली


बकुळ, देऊळ , घंटानाद संपणार आहे सारेच

क्षितिजापलीकडचे असणार आहे विश्व् निराळेच ....


सुषमा ठाकुर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू