पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अनमोल भेट- मातृत्व

वेदांत आणि जागृतीच्या लग्नाला पाच वर्ष पुर्ण झाली होती. पण तरीही जागृतीच्या चेह-यावर आनंद नव्हता काही तरी तीच्या मनात सतत चालु असायच. वेदांत आणि जागृती लहानपणापासूनच चागंले फ्रेंड होते. दोघांच एकमेकांकडे जाण-येण ही असायच त्यामुळे पुढे मैत्रीच प्रेमात रुपांतर होऊन सगळ्यांच्या साक्षीने दोघांनी लग्नही केल. नव्याचे नऊ दिवस चागंले गेले पण नंतर जागृती एकटी एकटी राहु लागली . कारण होत मातृत्वाच लग्नाला पाच वर्ष होऊनही आपल्याला मुल होत नाही याची खंत जागृतीला सतत वाटत . अस नाही वेदांतला हे जाणवत नव्हत पण वेदांतला कळत ही नव्हत की, जागृतीला ह्यातुन बाहेर काढायच कस. वेदांतच जागृतीवर खुप प्रेम होत म्हणून त्याच्या हातात जे काही होत ते सगळे प्रयत्न तो करतो . पण जागृतीचा एकटेपणा काही दुर होत नाही. एक दिवस वेदांत जागृतीला घेऊन एका नावाजलेल्या डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर वेदांतला सांगतात ."या आधी कुठल्या डॉक्टरांना दाखवल होतत." वेदांत "हो डॉक्टर , मी त्यांचे रिपोर्ट आणले आहेत." वेदांत डॉक्टरांना रिपोर्ट दाखवतो . डॉक्टर रिपोर्ट बघतात आणि वेदांतला सांगतात ." वेदांत मी सगळे रिपोर्ट बघितले आहेत शरिरात रक्ताची कमी असल्याने जागृतीला बाळ होऊ शकत नाही आणि ह्याच विचाराने ती अस्वस्थ झालेली आहे . आणि त्यामुळे जागृतीला खुप नैराश्यही आलय. तिला यातुन बाहेर पडायला थोडा वेळ द्या तिच्या बरोबर वेळ घालवा तिला कुठ तरी घेऊन जा म्हणजे तिला एकट वाटणार नाही आणि यातुन बहेर पडायला ही मदत होईल." वेदांत विचारमग्न होतो. आणि काही तरी ठरऊन दोघ हॉस्पिटल मधुन  बाहेर पडतात . घरी परतल्यावर वेदांत जागृतीला म्हणतो."तु आता थोडी रेस्ट घे, तुला आरामाची गरज आहे न." जागृती 'हो' म्हणते आणि आराम करायला आपल्या खोलीत निघुन जाते. काही वेळानंतर वेदांत आपल्या आई-बाबांना डॉक्टर काय म्हणाले ते सांगतो आणि त्याला सुचलेली एक कल्पनाही सांगतो. ते ऐकुन दोघांच्या डोळ्यात पाणी येत , आणि दोघही त्याला हो म्हणतात.संध्याकाळी वेदांत जागृतीला तयार व्हायला सांगतो." जागु आता कस वाटतय , तु थोड फिरायला येऊ शकशील न आमच्याबरोबर ." जागृतीला मनातुन सगळ कळत असत ती बाहेर चलण्यासाठी तयार होते. वेदांत तीला आवरायला सागंतो . काही वेळानंतर . जागृती आवरुन बाहेर येते . आणि सगळेजण सावित्री अनाथआश्रमाकडे निघतात.आश्रमात पोहोचल्यावर जागृतीचा चेहरा बघण्यासारखा होतो. ती त्या निरागस मुलांमध्ये हरवुन जाते . आपला एकटेपणा दुख ती कधीच विसरुन गेलेली असते. ते सगळ पाहून वेदांत आणि त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकतात. त्यांना त्यांची सुन परत मिळालेली असते. तो दिवस असतो दिवाळीचा जागृतीला वेदांतकडुन दिवाळीची अशी सुंदर भेट मिळालेली असते.

"मातृत्वाची अनमोल भेट."


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू