पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तीचे जग

"तीचे जग"---

 


विंडो सीट मिळाली किंवा आवर्जून तीने घेतलीच होती म्हणा. फ्लाईट मधून प्रवास करतांना त्या खिडकीतून बघतांना अनन्या हरखून जायची त्या विश्वात ज्याचे स्वप्न तिने किशोर वयात्च पाहिले होते अण मग झोकून दिले होते स्वत:ला ते सगळ मिळवण्या करता. निसर्गा शी तीचे अनन्त प्रेम हे तीचे घर व त्याची  रुचीपूर्ण सजावट बोलकी व्हायची. घरी येणा-याला त्या घाराचेच वेध लागायचे.

    एका कान्फ्रेंस मधे नुकतीच तीची भेट "अधीर" शी झाली होती. अनन्या चा  गव्हाळ रंग, हसरे गुलाबी ओठ,बोलके डोळे, रुचीपूर्ण केसांची ठेवण  व सौम्य परिधान बघून "अधीर"  तिच्या प्रेमात पडला.

अनन्या पण भाळली त्याच्या वर.  कान्फ्रेंस मधल त्याच प्रेजेंटेशन, तो आत्मविश्वास पुरे सा होता तिला एका निर्णया वर पोहचाला.

आपल्या निर्णयाला ठाम अनन्याने आई वडिलांचे मत धूडकावून लावले होते.आई ने अनेकदा सांगितले होते कि "अग! किती ही तुमच्या दोघांच्या व्यवहारिक विचारात साम्य असल तरी जेव्हा लग्न करून एकत्र अहाल दोन वेग वेगळ्या संस्कृति शी जुळवण्यात दमछाक उडते बेटा! तेव्हा खूप काळजी पूर्वक निर्णय घ्यायचा असतो. अधीर खूप चांगला मुलगा असला तरी ही त्याचा नावां प्रमाणे अनेकदा मला जाणवल आहे त्याचा स्वभाव ही अधीर....

" Please stop it mamma. I can't live like you,   मी बघते  तुझ  सारख बाबांच्या पुढ्यात-पुढ्यात करून जगण..  no mom !I have a separate identity. माझ अस्तित्व मी निर्माण करणार. so please don;t interfere in my idiology.

 


आणी तिने घर सोडल.

 


सोन्या सारखे दिवस होते ते. चारी बाजूंनी ऊँच-ऊँच डोंगर, खाली हजार-दिड हजार फूटांची विस्तीर्ण दरी,छोट्या-छोट्या दिसणा-या झुडुपांचा हिरवा रंग चढलेला साज आणी तो नितळ पाण्याचा धबधबा. हातात हात घालून चहा चे घुटके घेत ती दोघे किती तरी वेळ धबधबा आणी डोंगर द-यांना आसमंत निरखित होती.

एक वेगळ्याच विश्वात त्याण्चे ध्रमण सुरु होते. काही वेळा नी दोघे परतले. हनिमून च्या हनी चा प्रत्येक थेंब दोघांना चाखायचा होता.

त्यानी नहाणी घरात प्रवेश केला.वस्त्रै सैल करुन पाण्याच्या झोताखाली  .मुक्त झाली ती दोघे.शावर चे थेंब जणु मऊ फुलेच. थेंबा चा स्पर्श अनुभवतांना तिच मन भरत गेल खुशीने. मोगरी सुगंधाच्या साबणाचा रेशमी स्पर्शाने तिचे नखशिखांत  बहरले.थेंबांचे नर्तन त्यांच्या अंग-प्रत्यंगा वर सुरु होते.... आणी मनावर ही....

उन्माद सरत आला होता. हळू-हळू दोधे ही आपापल्या व्यवसायिक/व्यवहारिक कामात परतले होते. आई-वडिलाच्या छ्त्रा बिना अता नवीन दिवस सुरु झाले होते.

आपली ओळख निर्माण करतांना आपला बळी जाऊ नये याची कमालिची दक्षता तिने बाळगली होती तरी या वाढत-विस्तारत जाणा-या विशाल पटावरील आपले स्थान शोधणे तिच्या साथी कठीण व सभ्रमित करणारे ठरु लागले . ती एकटी हा शोध घेत असली तरी तो अता तिच्या पुरता सीमीत राहिला नव्हता. तिच्या आजवरच्या वाटचालिचा, संचितांचा तो एक ना संपणारा मागोवा ठरला.

"अधीर" नांवा प्रमाणेच उतावळा निघाला. त्याची बाहेरची वागणूक घरात एकदम वेगळी असे.देहाच्या व्यतिरिकत त्याने कधीच तिचा विचार केला नाहीं. या वस्तवाला सामोरी जाणे किंवा निमूटपणे स्विकारणे तीला जमले नाहीं.आणी मग एडजेस्ट्मेंट ..वादावाद.....

 


आज पुन्हा एकदा तिने घर सोडले होते.

 


फ्लाइट मधल्या अनाउंसमेंट नी ती भानावर आली. .विमानातून बाहेर आल्या बरोबर थंड-थंड वा-याची झुळूक तिच्या केसांना स्पर्श करुन निघाली.अलगद तीने पुढे  डोळ्यावर आलेली बट सावरली. exit point  ला तिच्या नावाची पाटी  दिसताच हायस झाल. शोफर ने तिला हाटेलात पोहचवले.१५  दिवस इटर सोय होई पर्यंत ती इथेच रहाणार होती.

सुईट मधे तिचे सामान पोहचवले गेले लगेच चहाची आर्डर देउन तिने दुसरी  वस्त्र परिधान केली.

चहाचा कप घेऊन रुमच्या खिडकी पाशी आली. आज योगा-योगा ने कैलिफोर्नियातिल स्थान तेच होते फक्त हाटेल बदलले होते. खिडकित उभी असता परत तोच धबधबा....त्याची छटा व हिरवळ बघत एक-एक घोट निवांत पित त्या गरम चहाचा आस्वाद घेतला.

कप ठेऊन हल्केशे कार्डिगन अंगात चढवून परत धबधब्या पाशी पोहचली. मनसोक्त चिंब ओली झाली,हात पसरून आकाशाला कवटालले ,तशिच चिंब वस्त्रात बेभान कुणाची पर्वा ना करता सुईट मधे परतली.

 


पुन्हा एकदा वाफाळलेल्या नहाणी घरात प्रवेश केला. क्लेश राग,दु:ख,निराशा, मनस्तापाची वस्त्रै सैल करुन परत मुक्त झाली पाण्याच्या झोता खाली.

© नयना(आरती) कानिटकर.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू