पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

   पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

या वर्षभरात तू मला काय शिकवले


      नाही कळणार तुला


संसारा च्या राखड्यात काय विसरलो होतो


      याची जाणीव झाली मला।


 


तुझे सर्वात पहिले स्मित


      सांगत होते मला


जग हे सुंदरच आहे


       आपला दृष्टिकोण बदला ।


 


तुझा दुधा साठी केलेले आक्रांता ने


       जाणवले मला


काही खास मिळविण्यासाठी


       प्रयत्न हे लागतीलं च करावे ।


 


तुझे निरागस निश्चिन्त झोपणे


       बघून वाटले मला


चिंता च अनिद्रे चे कारण असते


       दूर ठेवूया आपण हिला ।


 


दूर ठेवलेल्या बाहुलीला मिळविण्यास


       रांगत तुझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा


जाणवले मला कि कठिण प्रसंगी


       धीर लागेल ठेवावा ।


 


तुझ्या तोंडून निघालेला पहिला शब्द


       आणि त्याला पुन्हा पुन्हा घोळविणे


निपुणता मिळविण्या साठी


       याला पर्याय नाही दुसरे ।


 


तू जेव्हा स्वतः च्या संकल्पाने


       प्रथमच राहिली उभी


कळले मज कि स्थिती बदलते


       योग्य वेळ लागते त्याला द्यावी ।


 


प्रथमच तुझे चालणे आणि पडणे


       तरी पुन्हा पुन्हा उठून पुन्हा पुन्हा चालणे


शिकवते जीवनात सुख दुःख येताच राहणार


        आपण दृष्टिकोण सकारात्मक ठेवणे ।


 


तू अशीच सुंदर, निरागस, लागावी रहा


         अशी ईश्वरा कडे प्रार्थना करतो


आई-बाबा, आजी-आजोबा आणि आत्यांना आनंदी ठेव  


         तुला वाढदिवसाचे आशीर्वाद देतो ।


​- रचना -- स्व. श्री राम मोघे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू