पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

*मेरु-दण्ड पर्यावरणाचा *

प्रकृती पण करते मोठा प्रपंच,


 मेळावे महाभूत चे त्यात  पंच ।



 नभ,जल,अनल, मृण,दिनकर,   सहचरी च प्रपंचाचे जन्मांतर ।



 वायू पासून नभ निर्मिती तेव्हां,


 दिनकर उष्णकरिती जल जेव्हां।



 जल दग्धतापून कृते वाष्प निर्मिती ,


 उष्णोदक कृते जुळुं येसंचरे वरती।



 वलया वर वलये      नभा संचरी  ,


 घेउन दाट वेद- संवेदना अंतरी ।



 वेंदना कुणा सांगावी सहचरी ,


 वायूच तो घऊन संगे चराचरी।



 तया-सह सहचरी नभी संचरी


 कुशीत मावे वाष्प सतंप्त जरी।



 कुरवाळी तयासी व्याप्त गगन ,


 उद्वेलित,आक्रोशित त्याचे मन।



 काय करावे कुठे जावे सुचेना ,


 हळुच सूज्ञते जावे मातेगृही।


ती दग्ध तप्त जननी, लेकांची,


तरि कुशीत असेत्वा चिर शांती।



 शुभ्र ,श्याम  मेघ वायूसह वेगे,


 तत्पर मातृ सुखास, चाले उद्वेगे।



सप्तरथ जणू धावे अति सत्वरी,


धड़ाड,घड़ाड प्रचंड नादत्व करी।



 जणु तप्त आक्रंद विलाप त्याचा


 मातगृही जाण्या अंतरानंद त्याचा



 हर्षास उधाण काय वाखाण करावे  ,


 प्रचंड़  ह्रदय-हास्य विद्युलतेसह व्हावे 



 धरणी-गगन दिपले कंपले त्या तेजाने,


 भरधाव धाव ध्यावे श्वेत-श्याम मेघाने।



 मातृ मिलन हूरळी  सुखानुभुती 


 हळू हळू वाट चालेत्वा अंबरती।



 वाट ना ओसरी कुठवरी त्यापरि,


 वेगे-वेगे भरधांव घेतली भरारी।


  


जरि तळपत सूर्य- झळाळी ने दग्ध होते धरा,


तरि उद्दंड़ लेकरें येई  पाहून धरा होते हर्षभरा ।


  


 लेकरू पहूड़ावे कुशीत मातेच्या,


 तोषली येता बाळे कुशीत वसुधे च्या।



विसावली मेघे धरे च्या मनाअंतरी,


तोष पावली वसुंधरा ही हृदयांतरी ।


मेरु-दण्ड हा निसर्ग


अगमानिगमा चा 


हाच हरितक्रांतीपूर्ण


 पर्यावरणा चा 


ह्या मेरुदंडा चाच भक्कम टिकावा ,


प्राणवायु उद्गम वृक्ष व हिरवळ लावा ।


एक प्रतिज्ञा करू आपण जागततिक पर्यावरण  दिनी,


 कल्पवृक्ष फळ फूलं औषधी हिरवळ मात्र जगवु निषिदिनी । 

​रोपानना बालवृति , झुड़पना सहचरी,

​थोर,वृद्ध,वृक्षे,ना आधार परिवारपरि।

आनंद व आशीर्वादच् आम्हा मिळनार

​आम्च्या लेकरानचेच् ते आधार बननार

​.       ***अपराजिता*** 


सौ.सुलोचना  बेलापुरका ,देवास 







पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू