पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बांधिलकी वडाची

अखंड राहो सौभाग्य

म्हणून घातल्या प्रदक्षिणा

कोणा एका  झाडाला

केल्या विनविण्या


बांधले त्याच्या बुंध्याला

लांबलचक धागेदोरे

आणि काप काप कापली

असंख्य झाडे

रचण्यास आपले स्वार्थी मनोरे


वैतागून बोलत होती काही

उदास झाडे वनात

माझ्या स्वप्नात


वडाच्या झाडाला घेतले होते फैलावर

शिगेला पोहोचले होते आरोपांचे स्वर


ऐका हो ऐका या वडाचा मानभावीपणा

सत्यवान-सावित्री युगा पासून

हाच कसा  प्रिय सर्व सौभाग्यवतींना!

प्राणवायू आम्हीही देतो की सर्व सृष्टीला

पडत कसे नाही हे कोणाच्या दृष्टीला


वडाचे झाड काय बोलणार

हवालदिल  झाले होते

पुराण कथेच्या  सत्याला

बांधिल झाले होते

           -विवेक सावरीकर मृदुल

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू