पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नवीन कविता

नवीन कविता
************

आज तिनं केविलवाण्या नज़रेने बघितले
मी तिला समजावले
हे बघ , लायकी नाही तुझी
"श्रेष्ठ वाचकां " समोर येण्याची..
तिनं माझं बोट धरल - २
निवेदन करू लागली...
इतरांच्या म्हणण्याने तू मला थांबवणार !
तस नाही गं...
सखे... ऐक ना !
कविता लिहीते तेव्हा लोकं रागवतात
नाही लिहिली तर तू रूसतेस
पेचात पडलेली मी....
तू तरी समजून घे !
तिनं सोडला दीर्घ श्वास
माझ्या पाणावलेल्या डोळ्यांत बघत म्हणाली
" लोकांसाठी तू जगणार ,
मला दूर करणार !
तुझे माझे सौख्य ,
रेशिमबंधाचे नाते
त्याचा कर ना विचार ! "
त्याचक्षणी...
जाग आली मला...
तिच्या - माझ्या घट्ट मैत्रीची
जाणीव झाली मला...
मी ....
कवेत घेतले तिला
प्रेम केले तिला
पटकन उडी मारून
ती ....
नाचू लागली माझ्या बोटात
आणि....
स्मितहास्य देऊनी
तुरुतुरु चालू लागली कागदावर...
आता...
नवीन शब्द ,नवीन संवेदना ,
नवीन  भावनांच्या स्पर्शाने
लिहीली माझ्या लेखणीने.....
आशेच्या दीपमाळेने
लखलखीत प्रकाशाने
न्याहाळलेली , सजलेली
कविता !

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू