पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आजकल हिणवत असतो आरसा

आजकाल हिणवत असतो सतत  आरसा

म्हणून मी बघत नाही त्याच्याकडे फारसा


रोज रोज त्याने काय म्हणून टोचून बोलावे

आपले मानले तर काय डोक्यावर बसावे !


त्याने उठसूट टोचून-बिचून मोकळे व्हावे

आपण मात्र दिवस दिवस चरफडत राहवे


किती किती मी सांगू याच्या जहाल गोष्टी

मी केस कलप करतांना याची वक्र दृष्टी


सुख माझे इतकेसेही  याला बघवत नाही

समोर आलो की मला  घालवण्याची घाई


तेंव्हाच लाईट जाऊन काळोख  पसरावा

तेंव्हाच न्हाणीघरात  हिचा  पाय घसरावा


मला खात्री आहे हे सर्व याचे कारस्थान

मला डिवचण्याचे करी नवनवे सरंजाम


तरी अगदीच कट्टी असे नाही अजिबात

माझ्या वेदनांना आरश्याची असते साथ


एकट्यात कधी स्वतः मला कुरवाळतो

किती वणवण करणार,प्रेमाने विचारतो


चेहरा जरी नाही  तुला टिकवता येणार

तुझे तजेल मन तुला जन्मभर पुरणार


पाट थोपटून दोस्तीचा हात पुढे करतो

मीही मग त्याला मिठीत समावून घेतो


त्याच्या डोळ्यांनाही नकळत पूर येतो

एकमेकांचे दुःख आम्ही समजून घेतो


                                       -विवेक सावरीकर मृदुल

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू