पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सामाजिक दूरी


सामाजिक दूरी
***********
"  वर्तमानपत्रातही आले आहे  , आता सामाजिक रीत्या सर्वांना एकमेकांपासून दूर राहावेच लागणार आहे. कुठेही येणे नको जाणे नको ! आम्हाला सर्वांना घरात कोंडूनच राहावे लागणार. समजलात का ! कसली नातीगोती  आणि कसलेकाय ! " दिलीपने अख्या कुटुंबाला ही बातमी वाचवून दाखवली आणि तणावाने म्हणाला
" केवढा कठीण काळ आला आहे ! "
" अगदी सोपे आहे दिलीप ! तुम्ही सगळेजण  एकमेकांबरोबर बसून जेवणखाण करता ना..... मी तर कित्येक वर्षांपासून बाजूच्या पड़वीत एकटा... "
वडिलांच्या तोंडून सामाजिक दूरीचे उदाहरण ऐकून दिलीप अचंबितच झाला !

-डॉ. वसुधा गाडगिल ,इंदौर.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू