पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आंतर राष्ट्रीय महिला दिवस

आंतरराष्ट्रीय महिला दिवस 


होतेच मनात माझ्या, आहे ना मी लेक जिजाईची-अहिल्याबाईंची ,होणारच  मी राणी झाशीची ,  


आहे माझ्या पदरी  पुण्याई सावित्रीची , घेऊन मी ओंजळ  शिरीष पैं च्या  शब्द फुलांची ,  शांताबाई शेळक्यांची आणि  इंदिराबाई संतांची ,



ओवाळत गेले त्यांच्या प्रतिभेच्या सहस्त्र किरणांना ,मी माझ्या भारावलेल्या मनाने  , आणि सरले चार पाऊले पुढे .... 


निर्भयता , मातृत्व , नेतृत्व , आणि कर्तृत्व गाजवून ,


आकाशात नक्षी कोरत , मारली भरारी ,



दूर करून पंखांची उब , ओलांडला उंबरा 


सोडून दिलं दबकणं , घाबरणं , शब्द ही  उच्चारायला न धजणं 



तोडून दिला अरेरावीचा पिंजरा ,


सताड उघडलं टोमण्यांच्या बाणांनी विद्ध झालेलं मन 



प्रयत्न केला , एक आदर्श माता बनण्याचा ,


तिमिराच्या केसांत किरणांची मोरपिसे खोवण्याचा 



दुःखाच्या भयाण अंधारात आशेची एखादी पणतीही 


राज्य करू शकते हे दाखवण्याचा 



आणि मी यशस्वी झाले , बीजातले हिरवेपण जपत गेले ,


रुक्ष , कोरड्या खडकावरतीही रुजत गेले ,


आणि ... रोज  आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करत गेले . 




सुषमा ठाकूर 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू