पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संगीतकार - पु. ल देशपांडे

संगीतकार - पु. ल देशपांडे  यांनी दिलेला  संगीतमय नजराणा , आज त्याच्या  स्मृतीदिना निमित्य त्यांना समर्पित . 

येताय मंडळी ?   कुठे काय ?  कुठे आहात  ? ठेवा योग्य अंतर  आणि 


इथेच टाका तंबू 
थोडी हिरवळ थोडे पाणी 
मस्त त्यात ही रात चांदणी 
उतरा ओझी विसरा थकवा 
सुखास पळभर चुंबू 
 इथेच टाका तंबू , इथेच टाका तंबू 


चला जमले सगळे,  जस जस पुढे जायला लागू  आपण,  तस रंगून जायला होईल आपल्याला, जसा 


दास रामनामी रंगे , राम होई दास 
एक एक धागा गुंते  रूप ये पटास 
राजा घनश्याम !
कौसल्येचा राम बाई , कौसल्येचा राम 
भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम 


नदीकाठचे एखादे मस्त देऊळ , समोर नदीचे स्वच्छ नितळ पाणी ( कल्पनेत ) आणि हे गाणे . 
लागली समाधी ......  ज्ञानेशाची  हो ज्ञानेशाची 
इंद्रायणी काठी . 


मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड , अंगणात झाड कैवल्याचे , कैवल्याचे 
इंद्रायणी काठी , देवाची आळंदी  लागली समाधी  ज्ञानेशाची . 


अशी समाधी लागली पाहिजे वेळोवेळी , मग आपण स्वतः:च स्वतः:ला म्हणू 


माझे जीवनगाणे , माझे जीवन गाणे 
व्यथा असो आनंद असू दे 
प्रकाश किंवा तिमिर  असू दे 
वाट दिसो अथवा न दिसू दे , गात पुढे मज जाणे 


एकदा का मनाने असे ठरवले की  मग तसा फरक पडत नाही  की सुराचा नाद कुठून येतो ते. आपण फक्त आनंद घ्यायचा . 


ही कुणी  छेडिली तार 
प्राजक्ताच्या मधुगंधासह कुठुनी ये केदार ?


कधीकधी अनावधानाने काही प्रसंग  कोड्यात टाकतात म्हणून त्याचा अर्थ बरोबर कळणे आवश्यक ठरते  नाहीतर 


" शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले 
प्रथम तुला पाहिले आणिक घडू नये ते घडले 


अर्थ नवा गीतास मिळाला 
छंद  नवा अन ताल निराळा 
त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले "


पण जर तुम्ही  कुणाला ' शब्द '  दिला असाल तर 


वायदा केला विसरू नका याद ठेवा पक्की 
जमलं तर आज या , न्हाई तर उद्या नक्की 


आणि हा वायदा पूर्ण केलात की ( ती )
हसले मनी चांदणे 
जपून टाक पाऊल साजणी नांदतील पैंजणे 


मंडळी, या लेखातील प्रत्येक गाण्यातील संगीत तुम्ही गुणगुणलेत ना ? चला आता गाण्यांची  रिमझीम थाबवू , भाईंनी संगीत दिलेल्या आणि तमाम मराठी जणांच्या कायमस्वरूपी मुखी असणा-या या गाण्याने 


'पावसाची रिमझीम थाबली रे ' 

तुझी माझी जोडी जमली रे 

आभाळात छान छान 
सातरंगी कमान 
कमानीखाली त्या नाच 


( भाईप्रेमी ) अमोल 
१२/०६/२०२०

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू