पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अतृप्तक्षुधा

अतृप्तक्षुधा
**********

टीव्हीवर बातम्या येत होत्या.एका गावात दंगे धोपे चालले होते आणि काही केल्या ते थांबत नव्हते. सोफ्यावर बसलेला धवल ती बातमी लक्षदेऊन बघत होता. बातमी बघता-बघता त्याने आपल्या राजकारणात दखल ठेवणाऱ्या वडिलांकडे  विचारले
" पप्पा , इतकी भांडण , मारझोड... हे सर्व तुम्ही थांबवत कां नाही ! "
" गप्प बैस ! थांबवलं तर हे पोट कसं भरणारं ! " त्याला रागवत, मोठ्या वर्तुळाकार पोटावर हात फिरवत वडिलांनी उत्तर दिले. पोरगा थक्क हून एकदा टी. वी. कडे एकदा वडिलांकडे बघत राहिला.

- डॉ. वसुधा गाडगिल ,इंदौर.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू