पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तिचं आकाश

तिचं आकाश
************

तिनं तिचा कुंकवाचा मोठा ठिबका
सजावला आकाशात
तो चमकू लागला
जणूकाही सूर्यप्रकाश !

तिनं तिचे कर्णफूल
सजविले आकाशात
चमकू लागले तारे
पसरली निखळ चांदणी .
निसर्गात....

तिनं तिचा तनमणिही
सजविला आकाशात
तो झाला चंद्रमा
बरसू लागली
पौर्णिमेची अमृतधारा !

तिनं तिच्या बांगड्या
सजविल्या आकाशात
खेळू लागले नक्षत्र
बोलकी झाली निशा !


तिनं तिचे पैंजण
सजविले आकाशात
अनहदनाद गूंजला
ह्या ब्रह्मांड़ात !

खरचं
ती देते ! भरभरून देते..
तिनं दिल ...
तिचं सर्वस्व दिल..
आणि उगविला...
सप्तरंगी इंद्रधनु
आकाशात !

- डॉ. वसुधा गाडगीळ ,इन्दूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू