पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सेवाभावी

सेवाभावी : डॉ वसुधा गाडगीळ
*********

" पण रमे , एक गोष्ट सांग , तू लग्न कां नाही केलंस ? असं आयुष्य एकटीनं काढणं ...कठीण आहे गं ! " कॉलनीतल्या बागेच्या बाकावर बसून दोघी मैत्रीणी गप्पा मारत मन मोकळे करत होत्या.
" एकटी कुठे गं पौर्णिमे ! आता भाऊ रिटायर्ड झाले ,भावांबरोबर राहाते की ! " रमाने पौर्णिमेला हसत उत्तर दिले.
" किती म्हंटलं तरी तू त्यांच्या साठी लग्न नाही केलं पण त्यांनी तुझा विचार केला कां ? "
" अगंबाई , नुसता माझाच नव्हे तर अख्या देशाचा विचार केला म्हणूनच चौघेही एका पाठोपाठ एक सेनेत भरती झाले आणि मी , मी त्यांच्या आरोग्यासाठी जवळ राहिले. "
" पण आता काय...!"
" आता काय ! अगं रिटायर्ड झाल्यावर ही ते कॉलेजमध्ये जाऊन तरूणांना सेना , सीमेवरील सैनिकांची ड्यूटी... ह्या सर्व बाबतीत सांगतात येवढेच नव्हे तरं ट्रेनिंग देतात. मी त्यांचं जेवणखाण बघते. राष्ट्रसेवा..."
" समजले... त्यांच्या बरोबरच तुझी राष्ट्रसेवा भावना ! धन्य आहेस तू...खरी राष्ट्रसेविका !"

- डॉ. वसुधा गाडगीळ ,इंदूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू