पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दुस्तर घाट

दुस्तर घाट
तो म्हणाला,"लिहिणं म्हणजे नक्की काय?
शब्दांशी खेळत आरास मांडण
आहे काय नी नाही काय!
नसते उद्योग दूसरे काय!"
काही न बोलता मी मौनात!
नसती कळली कधीच त्याला
शब्दांची वाट
अनवट वळण अन्
दुस्तर घाट!
कसे सांगू मी त्याला

शब्दांनी असते नुसते आवरण पांघरलेले
आत त्याची चिरदाह वेदना
अन् सल त्यात ठसठसणारे.
वेदनेला आवरण ह्रदयाचे आणि ह्रदयाला
आत्म्याचे
तोच देतो वेदनेला खतपाणी.
तेंव्हाच होते शब्दाची
रूजवणी...
गर्भारून येतात शब्द.
अंकुरतात..
कागदावर रांगण्यासाठी
आतुरतात
तेंव्हाच लेखणीचा लागतो सूर
कवेत येते तिच्या
आकाशही सर्वदूर....


रेखा मिरजकर खारघर.
नवी मुंबई.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू