पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सुखावणारे भाष्य

सुखावणारे भाष्य
*************

जळजळीत उन्हाळा
चटके बसणारी दुपार
ऊन-ऊन रात्र
रात्रीच्या अंधारात

खिडकीच्या वाटेने
सरसरत आला वारा
वाऱ्या सोबत तोही आला
डोलू लागला खोलीत
दुडूदुडू चालू लागला अख्या घरात !

हळूहळू रूजु लागला  
माझ्या स्पंदनात
एकाएकी ....
मी दचकले ,
जणूकाही दुस्वप्नातून जागी झाले !
तो गेला बाहेर
मी त्याच्या पाठीमागे....
त्याचक्षणी थबकले !

टवटवीत , टणक हिरव्यागार पानांमधून
उमलत होत्या कळ्या
पृथ्वीला मानाचा मुजरा देत
नमल्या होत्या पांढऱ्या पाकळ्या....

थंड वाऱ्यात
धवल , कोमल फुलांचा दरवळला तो सुवास
अंधारात  चांदण्याचा पसरत होता प्रकाश
विषम परिस्थितीतही
ती शुचिता , ती स्निग्धता
ओठांवरील स्मितहास्य...
सुवासिक मोगऱ्याची फुले
करत होती सुखावणारे भाष्य ,
आयुष्याला सुखावणारे भाष्य !

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू