पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कवी मनाचा खेळ

करुनी विचार बसले लिहायला

परी शब्दांची साथ मिळेना ,

गुंतले या विश्वात मी

तरी मन लिहिण्यात रमेना


शब्द जुळायला यमक पाहिले

लिहिल्या मग काही ओळी ,

विचारांचे झाले काहुर मनात

​लिहितांना वेळी - अवेळी

​गुंतलेल्या विचारांमध्ये

​मग चित्त हे हरपले ,

​शोध लागत माझा मला

​शब्द अनोळखी गवसले

​बघता बघता कडवी झालीत

​परी कशाची कमतरता ,

​साध्या सोप्या कवितेत

​नावाची ही उणिवता

​सरते शेवटी नाव ठरले

​संपला शब्दांचा मेळ ,

​कविता करणं सोपं  नाही हो

​हा तर कवी मनाचा खेळ...

​हा तर कवी मनाचा खेळ...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू