पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नभ संवाद

दिगदिगंत आसमंत आज साद घालतो

धरानृपा हे मानवा तुला पुन्हा उभारतो

ही नाही कैद, तप तुझा हा निसर्ग सांगतो

धरानृपा हे मानवा तुला पुन्हा उभारतो

 

 

साक्ष्य मागता बघा हे वृक्ष उभे धाडसी

उंच डोंगरावरी विजय हा तुझ्या मानसी

डौलदार प्रगत चाल संथ कर हे सांगतो

धरानृपा हे मानवा तुला पुन्हा उभारतो

 

 

तोच हा प्रवास सप्तसागरा पलीकडे

तुझ्या अखंड उद्यमाचे गान या जगापुढे

हा प्रवास, हा हव्यास धीराने हाताळतो

धरानृपा हे मानवा तुला पुन्हा उभारतो

 

 

फुले कधी न बोलती हा मंद गंध मी असे

न धरा ही लावते, तिच्या प्रजेवरी ठसे

तुझ्या महान कीर्ती साठी आत्माहुति वाहातो

धरानृपा हे मानवा तुला पुन्हा उभारतो

                                       तुला पुन्हा उभारतो

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू