पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आई होण्याचे श्रेय

आई होण्याचे श्रेय

आज १६ जून आज माझ्या धाकट्या मुलीचा वाढदिवस. आता तिचे लग्न हून दिड वर्ष झाले . तिला शुभेच्छा दिल्या. थोड्या वेळानी देवाला नेवेद्यासाठी शीरा करु लागले . मी घरात सर्वांच्या वाढदिवसाला सत्यनारायण करते . प्रसाद भाजताना मला तिच्या जन्माची आठवण आली.
मला पहिली मुलगी . ती साडे सहा वर्षाची . तिचे नाव 'सिद्धी' असे ठेवले. ती होणार तेव्हां माझा एकच ध्यास होता की देवा मला पहिली मुलगी हू दे . देवाने माझ्या मनाचे सिध्द केले म्हणून माझ्या सासऱ्यांने सुचविले ते नाव सिध्दी असे ठेवले. तिला आजी कडे सोडून आम्ही दवाखान्यात जायला निघालो. कारण माझ्या दुसऱ्या डिलिव्हरीची वेळ आली होती.
माझे सीझर करावे लागणार होते . ऑपरेशन थिएटर मध्ये जोरात तयारी चालु होती. मी घाबरून शांत पडले होते . मना मध्ये देवाचा जप सुरू होता. ऑपरेशन सुरू झालं होतं डॉक्टर्सच्या गोष्टी सुरू होत्या .दोघी लेडी डॉक्टर्स तर चक्क आंब्याच्या लोणच्याची रेसिपी एक मेकांना विचारत होत्या. मला खूप भिती वाटत होती
देवा या दोघी लोणच काय करतात आहे .
तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. मला समजेल तोवर बाळ झाले ही . मग पोटावर काही वेळ खेचा- ताण सुरू होती तेवढंच कळत होते. मग सर्व हालचाल बंद . जवळ जवळ अर्धा तास झाला तरीही कुणी काहिच बोलत नाही असे जाणवले . पुन्हा थोडा वेळ मी शांत पडून होते पण आता माझा जीव घाबरु लागला . देवारे माझे बाळ बरे आहे ना..
थोड़ा वेळ परत मी वाट बघत पडून राहिले .मग कुणाची तरी चाहुल लागली तसेच मी विचारले कोण आहे इकडे ..??
"मी डॉक्टर"
" ..डॉक्टर माझं बाळ बरं आहे ना.."
"होहो तुझ बाळ उत्तम आहे"
मी धीराचा श्वास टाकला. मला कोणी सांगत कां नाही काय झाले आहे मला..आता पुन्हा शांतता पसरली . तुला पहिली मुलगी आहे ना ? हो डॉक्टर मी म्हणाले .आता मला थोड़े
समजले , डॉक्टर मला काही झाले तरी आनंद होइल .तुम्हीं बिन्धास्त सांगा . आता त्यांचा छान आवाज़ आला .अगं तुला गोड़ मुलगी झाली आहे .ऐकून मला धीर आला.मला कोणी सांगत कां नव्हत डॉक्टर ? मी किती आतुरते न वाट बघत होते .
डॉक्टर साहेबांनी निःश्वास सोडला . तुला आनंद झाला ऐकुन बरे वाटले .आता तू बोलु नकोस तुला आरामाची ग़रज़ आहे . इतर वेळी जर दूसरी मुलगी झाली कि ती बाई इतकी निराश होते, रड़ते की तिला संभाळणे कठिण होते . म्हणून आम्ही लगेच सांगत नाही. थोडा वेळ थांबलं आणि थोडी सेट झाली की मग तिला सांगतो.तिची घरची माणसं तिचा राग करतिल असं तिला वाटतं .
आई कड़े काही दिवस राहून आता मी आपल्या घरी आले.कामाला बाया आल्या पण एकही मला शुभेच्छा देत नव्हती. सरळ काम करून निघून जायची. मग मी दोन लाडवाचे डबे तयार केले दोन नवीन साड्या दोघीन साठी आणल्या . दोघींनाही लाडू आणि साडी दिली . त्यांना सांगितले मला खूपच आनंद झाला आहे ही भेट माझ्या कडून तुम्हाला . दोघींच्या चेहऱ्या वरचे आनंदाचे भाव बघून मला पण खूप बरं वाटलं. त्यांनी मला आशिर्वाद आणि शुभेच्छा दिल्या . "हम लोग डर रहे थे कुछ भी बोलने से कि आपको अच्छा लगेगा कि नहीं" .. .
"कोई बात नहीं" मी त्यांना बोलले . मला आठवतं माझ्या काकूला तिसऱ्या मुली नंतर दुःखी होऊन नर्स ने तुम्हाला पुन्हा मुलगी झालीय असे सांगितले तेंव्हा काकू रागाने तिला म्हणाली "मला झाली तुम्हाला नाहीं ना मग तुम्ही कशाला वाईट वाटून घेता " मला त्यात नर्सची चूक कमी आणि आपल्या समाजाची जास्त चूक वाटते .
आता मुलींसाठी सर्व क्षेत्र मोकळे आहेत . मुलांच्या वर्चस्व असलेल्या क्षेत्रात ही मुलींची दखल झाली आहे . त्यांना शिक्षण हा पुढ़ येण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे . आणि मिळालेल्या संधीचा पूरेपूर उपयोग ही त्या करतात .
माझ्या बाळाचं मी थाटात बारसं केल़ आणि नाव ठेवलं 'श्रेया' कारण तिनी पुन्हा एकदा मला आई होण्याच़े श्रेय दिले होते..

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू