पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विडंबन काव्य

*आज गोकुळात रंग खेळतो हरी.. हे गाणे गुणगुणताना सहज शब्द कानी आले.हा आवाज जनतेचाच वाटला मला... कोणाशी साधर्म्य वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा.*

राजकारणात रंग खेळतो किती
मते नाही तरी घेई सत्ता ही हाती।।

पत्रकार परिषदा जाहल्या अती
घेतलीत वेचुनिया शेलकी खाती
जनतेच्या मनामध्ये दाटते भिती
राजकारणात रंग खेळतो किती।।

आधीचे पाप होळीमध्ये जळाले
आकड्यांचे गूढशास्त्र आज कळाले
भल्याभल्या शहाण्यांची गुंग केली मती
राजकारणात रंग खेळतो किती।।

कश्शाही मारुनी उड्या गणित जुळविले
शत्रूच्या हातामध्ये हात मिळविले
गळामिठी घेत कशी फिरे राजनिती
राजकारणात रंग खेळतो किती।।

राज्य हाती घेता सर्व भरुनी पावले
आधीचे प्रकल्प जे उडवूनी लावले
मलईदार काम छान घेतले हाती
राजकारणात रंग खेळतो किती।।

शांता लागू.. पणजी गोवा.

( सुरेश भट ह्यांना सादर)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू