पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आई

आज पहिल्यांदाच मी मराठीत काही लिहीत आहे , पण मला सूचत नव्हते कि मी कोणत्या विषयावर लिहावे.
मग मला सूचले कि मी लहान असताना सर्वात पहिला शब्द "आई" म्हणाली होती. तर आज मी तिच्या साठीच लेख लिहिते. 

ती माझ्या आई पेक्षा माझी मैत्रीणच जास्त वाटते. आम्ही दिवसभर गप्पा मारत बसतो पण तरीही मला रात्री उशिरा पर्यंत तिच्याशी गप्पा मारून तिची झोपमोड करायला खूप आवडतं. मी दिवसभर तिच्या मागे फिरत असते आणि अशी दिवसात घडलेली एकही गोष्ट नाही आहे जी तिला नसेल माहीत.

मला कळत नाही कि तिला माझ्या मनातलं कसं कळतं. मला लहान असताना असं वाटायचं कि ती माझं मन वाचू शकते. पण ते खरं नाही आहे असे मला तिनेच सांगितले.

ह्या जगातील अधिकांश गोष्टी मला तिनेच सांगितल्या आहेत. आणि जेव्हा मी तिला ते सांगते , तर तिलाच आश्चर्य वाटते.

मला आठवत नाही मी तिला आई म्हणालेलं कारण मी तिला नेहमी मम्माच म्हणते. आणि मला आठवतं कि एकदा मामाच्या म्हणाल्या मुळे मी तिला आई हाक मारली होती आणि ती खूप खुश झाली होती.पण मला वाटतं मम्मातही तितकेच प्रेम आहे जितके आई म्हणन्यात आहे.

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा माझी मम्मा आहे. तुम्हाला माहित आहे तिला नाही माहीत कि मी तिच्यावरच लेख लिहीत आहे. जे काही माझ्यात चांगले आहे ते तिच्यामुळेच आहे. आणि दूसऱ्या राज्यात असूनही आपल्या भाषेवर प्रेम करायला मला तिनेच शिकवले आहे.

ती माझ्या साठी किती करते हे सांगण्यासाठी शब्द देखील अपूरे पडतात. मला रात्री बे रात्री भूक लागली तर माझ्या साठी स्वयंपाक करते, माझ्यासोबत खेळते, गप्पा मारते, मला रात्री झोप नसेल येत तर माझ्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागरणही करते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती मला समजून घेते. मला कधीही बोलावंसं वाटलं तर मी तिच्या कडेच जाते. माझ्या मैत्रिणीच्या पेक्षा तिलाच जास्त गोष्टी माहीत आहे.

जरीही मला तिला बाहेर जाताना हजार वेळा 'बाय' आणि पेपर द्यायला जाताना पेपर चांगला जाईलना याची खात्री करून तिला चिडायला लावणे मला खूप आवडतं. पण एक गोष्ट मात्र खरी आहे कि मी माझ्या पेक्षा जास्त प्रेम तिच्यावर करते आणि मी माझ्या बद्दल तरीही ऐकून घेते पण तिच्या विरुद्ध काही बोललेलं मला सहन होत नाही.

पण काहीही म्हणा, मी आणि मम्मा सोबत खूप मजा करतो. आम्ही सोबत फिरायला जातो आणि आमच्या 'गॉसीप' चे विषय चाळी पासून सुरू होउन बॉलिवूड आणि जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडीं पर्यंत जाउन पोहचतात.

"मम्मा, मला तू खूप आवडते आणि तू मला नेहमी खुश ठेवते आणि मी तुला खूप प्रेम करते.मला खरंतर सूचतच नाही मी तुला कसं सांगु कि तू माझ्या साठी किती महत्वाची आहे. " 

तुम्ही पण तुमच्या प्रिय लोकांना तुमच्या आयुष्यातील त्यांचे महत्त्व सांगा कारण वस्तू पेक्षा भावना जास्त महत्वाच्या असतात आणि कधी कधी दोन शब्दही माणसाला आनंद देण्यासाठी भरपूर असतात.

माझा लेख वाचण्याबद्दल तुमचे आभार.

आकांक्षा कुलकर्णी












पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू