पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आठवणी

खरं तर मी आताच काही दिवसांपूर्वी अठरा वर्षांची झाली आहे म्हणून माझ्या साठी आठवण म्हणजे बालपणच आहे. खरं सांगायचं तर मी अजून ही तीच छोटीशी आकांक्षा आहे जीला बाहेर फिरायला जायची खूप आवड आहे. आणि अजूनही माझं त्या आकाशातील चंद्रावर तितकेच प्रेम आहे जितके तेव्हा होते. काही बदलले आहे तर ते आहे माझे वय.
पण तो विषय नाही आहे. जर मी माझ्या लहानपणाबद्दल लिहायला सुरुवात केली तर एक ग्रंथ ही कमी पडेल.

जर तुम्हाला 'कॉमेडी' विषय वाचायला आवडत असतील तर तुम्हाला हा लेख आवडू शकतो.माझं लहानपण खूप छान होतं. मी लहान असताना आमच्या कडे मोबाईल नव्हता आणि टीव्ही ची केबल ही नव्हती म्हणून मी दिवसभर आमच्या आंगणात खेळत असायची.

आमच्या कॉलोनीत जास्त लहान मुलं नसल्याने माझ्याशी खेळायला कोणीच नव्हते पण ह्यानी एक गोष्ट चांगली अशी झाली कि मला विविध प्रकारच्या कीड्यांमध्ये मित्र मिळाले. मी मुंगळे, मुंग्या आणि हेलिकॉप्टर (Dragonfly) सोबत खेळायची. माझा आवडता खेळ म्हणजे भींतींवर चढणाऱ्या मुंगळऱ्यांना कुंच्याने खाली पाडायचा खेळ. त्या खेळाने मी एक गोष्ट शिकले आहे कि कितीही कोणी आपल्याला खाली खेचायचा प्रयत्न केला तरीही आपण खचायचं नाही आणि परत उठून आपल्या मार्गावर तितक्याच जोशात पुढे चालायचं.पण एक गोष्ट मी सांगू इच्छित आहे कि ते मुंगळे मला खूप वेळा चावायचे. ह्या वरून एक गोष्ट अशीही शिकता येईल कि जर कोणी तुम्हाला अकारण दुखवत असेल तर सहन करायची अजिबात गरज नाही.
एक अजून मजेशीर गोष्ट म्हणजे मला ते सगळे मुंगळे एकसारखे वाटायचे म्हणून मी एकदा मुंगळऱ्यांवर वेगवेगळ्या रंगाची रांगोळी टाकली होती. मग ते वेगवेगळे दिसत होते.

मला पाऊस खूप आवडतो आणि मला पाऊस पडत असताना टोस्ट खायला खूप आवडतात. लहानपणीची आठवण म्हणजे मला पाऊस खूप आवडायचा पण त्यात भिजायला नाही आवडायचं कारण घरात आल्यावर परत आंघोळ करावी लागायची म्हणून मी रेनकोट घालून आंगणातल्या पाण्यातले बुडबुडे फोडायची. अजून एक आठवण म्हणजे जेव्हाही वीज चमकायची मी त्या समोर पोज़ देऊन ऊभी रहायची. मला असं वाटायचं कि कोणी माझा फोटोच काढत आहे.

माझे माझ्या झाडांवर खूप प्रेम आहे. माझं सर्वात आवडीचं झाड म्हणजे कडूलिंबाचे झाड. ते आताच काही दिवसांपूर्वी बारा वर्षांचं झालं आणि मी त्याचे नाव Smile ठेवले आहे. Smile नाव घेतल्यावर माझ्याही चेहऱ्यावर हसू येतं. मला आठवतं जेव्हा मी सहा वर्षांची होते तेव्हा ह्या झाडाला अंकुर आले होते आणि मी त्याला म्हणाली होती कि मी मोठी झाल्यावर त्याच्या पेक्षा उंच असणार पण आता ते आमच्या घरापेक्षा ही उंच आहे.

मला लहानपणी टिचर टिचर खेळायला खूप आवडायचं आणि आमच्या घरातल्या प्रत्येक वस्तूला माझे शिष्य व्हायचा मान मिळायचा. ते रोज इतकी मार खायचे आणि तुटेपर्यंत मी त्यांना शिक्षा द्यायची. 

लहानपणी मी अगदी छोट्या गोष्टींवरही घाबरायची. एकदा माझ्या मैत्रीणीने मला सांगितले कि हे जग नष्ट होणार आहे आणि ते ऐकून मी इतकी घाबरले होते कि माझं पोट दुखायला लागलं होतं आणि ओठ नीळे झाले होते. असे काही कॉमेडी किस्से होतंच असायचे.

ह्या माझ्या लहानपणीच्या काही आठवणी ज्या मला सतत आठवतात. मी आशा करते कि तुम्हाला हा लेख आवडला असेल. धन्यवाद.

आकांक्षा कुलकर्णी























पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू