पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आई म्हणजे

आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर

आई म्हणजे आदि आणि इति


आई म्हणजे  आधार आणि इच्छापूर्ती

आई म्हणजे आपलेपणा आणि इक्षुरस


आई म्हणजे  अन्नपूर्णा आणि इष्टदैवत

आई म्हणजे आशा विश्वास आणि प्रेम समर्पण


आईची गाथा गाता येत नाही  हेच खरे

तिच्या पूर्णत्वा पुढे सारेच शब्द आहे अधुरे


देवा पेक्षाही आहे मोठी माझी माऊली

तिच्यात मी आणि माझ्यातच तिची सावली


प्रश्न हा नाहीच मुळी  तिने काय केले माझ्यासाठी

प्रश्न हाच खंत हीच  मीच काही करू शकले नाही तिच्यासाठी


आईचे हृदय कळतच नाही कधी कुणाला

कधीतरी तुझ्या मनातला गोंधळ कळू दे ग आम्हाला


बाबांनंतर तूच आता आमचा एकमेव आधार बोलले नाही तरी मनात तुझेच असतात विचार


दिला असेल बालपणी मीच तुला खूपच त्रास

पाणी विश्वास आहे आता तूच आहे माझा प्राण श्वास


थॅंकलेस जॉब करणारी ममता मयी तू आई

साताजन्माची ऋणी मी होऊ कशी उतराई


आई तू आहेस विधात्याने न मागता दिलेले दान वचन देते तुला आयुष्यात झुकू देणार नाही तुझी मान


नाही कळत आईचे महत्व स्वतः आई झाल्याशिवाय

आज कळते आई तू सर्वश्रेष्ठ माझी माऊली माय


वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला तू निरोगी दीर्घायुषी रहा

याची देही याची डोळा आपल्या मुलींचा उत्कर्ष पहा


(माझी मोठी बहीण सौ. स्मिता जोशी हिने आमच्या आईवर केलेली कविता, हिच्या परवानगी सह)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू