पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चुकली होती वाट

जरी चुकली होती वाट वळणावर, जगाला ती भीत नव्हती,
हसणाऱ्या चेहऱ्या च्या मागे खरोखरचे ते स्मित नव्हते.
जरी होती ती लहान तेव्हा, ह्दय तिचेही दुखत होते,
डोळ्यात साठलेले अश्रू देखील, मार्ग पडण्याचे शोधत होते.
जगण्यासाठी धडपडणारी ती, जगण्यापासून पळत होती, 
मरणाला घाबरणारी ती, त्या कडेच वळत होती.
उजेडाच्या प्रेमात असणारी ती, अंधारात एकटीच रडत होती,
कधी शांत न असणारी ती, स्वतः तच घुटमळत होती.
पण आठवण होती तिला तीची जी तिच्या साठी जीव ओतते,
तिनेच तिला थांबवले वळणावर, तिच्याच साठी जीव तुटत होते.
सूर्योदय तर होतच नव्हता, एकाकी मार्ग ती शोधत होती,
पण हा तो मार्ग नव्हे हे तिला नेहमीच माहित होते.
जास्त अपेक्षा नव्हत्या तिच्या, एक मिठीच तर हवी होती,
मन मोकळं करायला पण सोबत मात्र कुणाचीच नव्हती.
जरी शांत ती दिसत होती, मनात भावनांचा उद्रेक होता,
समुद्राच्या लाटांसारखी ती जात होती पण परत मात्र ती येतच नव्हती.
लोकांचे शाब्दिक खंजीर तिच्या ह्रदयात खूपत होते,
तिच्याच नकळत ते अजून आत रूतत होते.
ज्यांनी दुखवले तिचे मन, भावना त्यांच्यात कधीच नव्हती,
त्यांच्या साठी जीव द्यावा, अशी त्यांची कधी लायकीच नव्हती.
वळून बघते मागे ती जेव्हा, अंधुक होते द्रुष्टी तिची,
शोधते तिलाच ती त्या वळणावर, ही नव्हती कधीही ओळख तिची.
जर वळली असती ती त्या वळणावर, आजची ही सुंदर पहाट नसती,
हा आनंद, हे क्षण आणि ही आठवणही नसती.
हो, चुकली होती ती वाट वळणावर, पण जगाला ती भीत नव्हती,
कोणत्याच गोष्टी साठी पर्याय ही वाट कधीच नव्हती.

आकांक्षा कुलकर्णी


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू