पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बाबा

Daddy म्हणा , पप्पा म्हणा नाहीतर म्हणा आबा

आपल्या आयुष्यातील अनमोल व्यक्ती नाव त्याचे बाबा


कष्ट करून ,घाम गाळून तो करतो जीवाचे रान

सोसून सारे चटके तो भागवतो आपली तहान


तो राबतो शेतीमध्ये तर कधी ऑफिस च्या वाऱ्या

मनातल्या गोष्टी आपल्या तो जाणून असतो साऱ्या


दमून आलेला तो दिसतो कळतो आपल्याला

स्मित हास्य ठेऊन ओठांवर तो लापवतो स्वतःला

​आपल्यासाठी कधीच नसतात त्याच्याकडे पैसे उणे

​मनाने श्रीमंत माणूस तो त्याची श्रीमंती देवच जाणे

​अरे बाबा सांगते तुला जरा जग आता स्वतःसाठी

​आयुष्य तुझे खपत चालले जगता जगात आमच्यासाठी

​मुलाच्या मनातील राजा तू

​मुलीच्या काळजाचा ताबा

​आपल्या आयुष्यातील अनमोल व्यक्ती नाव त्याचे बाबा



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू