पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

देवाने आपल्याला तोंड दिलय न

देवाने आपल्याला तोंड दिलय न.

मला वाटतं कधी कधी मोठे जे सांगत असतात ते सर्व बरोबरच असते. सांगण्याचे कारण असे की माझ्या सासूबाई आहेत अगदी बिनधास्त. कधीच न घाबरणार नाही कशी ही परिस्थिती असो त्या मात्र खंबीर. विशेष म्हणजे त्यांचे एक ब्रीदवाक्य आहे ते म्हणजे घाबरायचे कशाला?देवाने आपल्याला तोंड दिले आहे न, त्याचा वापर करावा. आमचे सासरे आणी त्या भरपूर फिरत असायचे. माझ्या सासूबाईनां घरी बसणे अजीबात आवडत नाही. एकदा गमंत च झाली, झाले असे की त्या दोघांचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस. आम्ही सर्व दिर जाऊ मिळून कार्यक्रम आयोजित करावा अशी योजना करत होतो. मग त्यांना विचारले तर त्या म्हणे माझा ओकांरेश्वर चा प्लान आगोदरच झालेला आहे, आम्ही सर्व चाट पडलो. त्यांना विचारले की तीथे हाटेलात बुकींग करावे लागेल, जाणार कसे तर त्यांनी झट उत्तर दिले देवाने तोंड दिलय न, आम्ही विचारतं जाऊ आणी तीथे गेल्या वर व्यवस्था लावून घेऊ. खरचं ते दोघे काही बुकिंग नसताना गेले, तीथे खूप एन्जॉय केला, सासूबाई अगदी जरी ची साडी, डोक्यात गजरा, मस्त तयार झाल्या आणि तुम्हाला काय सांगू तेथे स्टुडिओ मधे जाऊन चक्क फोटो ही काढला, आजही तो फोटो आमच्या घरी लागला आहे. काय मजा नं.

एकदा मला आठवते की माझ्या मुलीचे बी.काम. झाले व पुढे ती एम .काम.करणार होती, फार्म भरायला भरपूर अवकाश होता, साधारण पणे हे फार्म अक्टोबर महिन्यात भरले जायचे. त्या वेळी सिंहस्थ असल्याने ते लवकर भरण्याची तारीख होती आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती, विक्रम युनिव्हर्सिटी चे काम. ह्यानां सांगितले तर म्हणाले की आणखी झोप काढा.असे ऐनवेळी एका दिवसात कुठे काम होते का?बडबड करून हे बंकेत निघून गेले. मग आम्ही काळजी करत होतो की आता एक वर्ष वाया जाणार हे सासूबाईनां कळाले, त्या म्हणाल्या चल आपण दोघी जाऊ आणी फार्म भरून येवू मी कधीच हे काम केले नसल्याने मला भीती वाटत होती, कुठे जाऊ कुणाला विचारू?त्या कसल्या घाबरतात, त्यांनी सर्व मार्कशीट पूर्ण फाइल घ्यायला लावली आणि खरचं अकरा ते चार मधे धावपळ करून आम्ही फार्म भरला, शेवटी एका सरांची सर्व पेपर्स वर सही घ्यायची होती, त्यामध्ये एक मार्कशीट नेमकी कशी काय घरी राहिली ते आठवून मला तर घाम फुटला. त्या आपल्या लगेच पुढे झाल्या व म्हणे देवाने आपल्याला तोंड कशासाठी दिले आहे,त्यांनी सरांना विनवणी करून, की बाबा आम्ही फार लांब राहतो, घरी जाऊन येईपर्यंत तुमचे आफिस बंद होणार, आणि आज शेवटची तारीख आहे ,आमची मुलगी येवू शकत नाही तुम्ही प्लीज हे काम करा आणि काय आश्चर्य काम झाले .मुलीचे एका वर्षाचे नुकसान होता होता वाचले.

कधी कधी आमच्या सासूबाई भलतीच "रिस्क" पण घ्यायच्या आणि आमच्या तोंडचं पाणी पळायचं. एकदा त्या दिल्लीला गेल्या, गाडी मध्यरात्री पोहोचणार होती. आमच्या ह्यांनी सासूबाईंना ताकीद दिली होती की रात्री अपरात्री कुठे जाऊ नका, वेटिंग रूम मधेच विश्रांती घ्या. सकाळी ऑटो करून जा. पण आमच्या सासूबाई चक्क 12 वाजता ऑटो करून ग्रेटर कैलासला आमचे नातेवाईक डॉ प्रभाकर माचवे, ह्यांच्या घरी जाऊन पोहोचल्या!


एक अजून घटना आठवते ती म्हणजे आम्ही मुंबई ला गेलो होतो गाडी घेऊन, एका कार्यक्रमात. तो होता दादर ला मग तो संपल्यावर आम्हाला थेट मीरा रोड जायचे होते, हे घाबरत होते कसे जाणार, रस्ता माहीत नाही, नवीन शहर मग काय ह्यानां म्हटले देवाने आपल्याला तोंड दिले आहे न?अक्षरशः आम्ही विचारत विचारत गेलो. कुणीही आम्हाला गंडवले नाही, व्यवस्थित पूर्ण रस्ता दाखवून दिला.त्या दिवशी आम्हाला जाणवले की मुंबई म्हणतात तेवढी वाईट नाही. बरोबर एका एका सिग्नल ला आम्हाला लोकांनी व्यवस्थित गाईड केले. सर्वात शेवटी एक गाडी मीरा रोड ला जाणारी च होती तीच्या पाठोपाठ आम्ही एक तास भर होतो आणि व्यवस्थित मावसभावाकडे पोहोचलो. तर बघा पटले ना की देवाने आपल्याला तोंड दिले आहे व ते जर उघडले तर काम पटपट होते.


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू