पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गुरू

बोबडे बोल सुधारत माझे

मनी संस्कार रुजवले ,

चुकल्यावर कान पकडून

योग्य वेळी रंगवले ...

बोट धरून चालण्याची

माझी केली सुरवात,

त्यांनीच शिकवले संकटांवर

कशी करावी मात ...

  हात पकडून त्यांचा मी

​अ, आ,इ चे धडे गिरवले ,

थाप मिळताच शाबासकीची

मी त्यांचेच नाव मिरवले ...

ज्यांनी दिला माझ्या

ओल्या मातीला आकार ,

त्यांनीच केले माझे

साधेसे जीवन साकार ...

दिली ज्यांनी शिजोरी

अनुभवांची आयुष्यभरासाठी ,

खात्री ने सांगते ते गुरू

सदैव माझ्या पाठी ...

या सर्वांमुळेच झालीय माझी

योग्य वाटचाल सुरू ,

आज ऋणी मी मानते की

धन्य ते गुरू ,

की धन्य ते गुरू ...




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू