पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मैत्री

मैत्री.

म्हणतात ना की माणसाला दोन मित्र आहेत, एक त्याचा खराखुरा मित्र, दूसरे पुस्तक.आपण बघितलं की लाकडाऊन मधे कशी फजिती झाली माणसाची. अशा वेळी त्याला कुणाची साथ मिळाली?मैत्रीण, मित्र,नातेवाईक, पुस्तक इत्यादी-इत्यादी. टीव्ही नावाची वस्तू माणूस पूर्ण पणे विसरला.

मैत्री करावी पण कशी हा पण एक प्रश्न आहे, मैत्री स्वार्थी नसावी, मैत्री जीवाभावाची असावी,त्यात स्पर्धा नसावी, जीवाला जीव देणारी निस्वार्थी मैत्री हवी. मैत्री करणे ही सोपे नसते. कुठल्याही व्यक्ती ला भेटल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे का?तो प्रथमच भेटी त अतिशय बडबडा तर नाही. एकदम बोअर तर करत नाही. मैत्री ही हळूहळू होत असते .एकदा एकमेकांना समजून घेणे आवश्यक असते असे जर झाले तर ही मैत्री दिर्घकाळ टिकून राहते.

आज माझ्या खूप मैत्रिणी आहेत ,सर्वच एका पेक्षा एक आहेत, त्यांचे आणि माझे संबंध खूप खूप वर्षांपासून आहेत.

मी माझ्या मैत्रिणी कडे राहायला पण जाते, त्या ही माझ्या कडे राहायला येतात. आमची मनं उत्तम प्रकारे जुळून आली आहेत. आम्ही लवकर लवकर काम उरकून दूपारी बारा ते पाच एकमेकींच्या घरी बसायचो, इतका वेळ कसा मिळत होता याचे आजही नवल वाटते. आता मात्र आम्ही भेटी ला तरसतो.एकमेकींच्या हाताचे पदार्थ खाणे, एकत्र येऊन जेवण करणे हे अगदी महिन्यातून एकदा झालेच पाहिजे. बरोबर बाजारात जाणे,एकत्र बसून पोथी किंवा अन्य पुस्तक वाचताना इतका आनंद मिळतो तो जगाच्या पाठीवर कोठेही नाही, एकदा आम्ही दोघींनी मिळून दासबोधाच्या परीक्षा दिल्या. तब्बल तीन वर्षे आम्ही न चुकता दूपारी दासबोध वाचून प्रश्न पत्र सोडवायचो. *प्रपंच आणि परमार्थ* दोन्ही सांभाळून...!

मैत्रीत खरेपणा असला पाहिजे, माझी एक मैत्रीण स्पष्ट बोलणारी आहे आणि वेळेची पाबंद आहे. तिला जर एखाद्या दिवशी बाजारात चलते का म्हणून विचारले तर जमले तर ती पटकन हो म्हणते,नाही तर स्पष्ट सांगते की आज जमणार नाही. तिच्या भेटीत एक ओढ असते, तिला भेटल्याशिवाय राहवले जात नाही सरळ सांगते मी आज येणार खूप दिवस झाले भेटीला.

तोंडावर गोड बोलून पाठमागे निंदा करणारी मैत्री कधीच टिकून राहत नाही. प्रथमच कुणाकडे जात आहोत, त्या वेळी टू द पांइट बोलले पाहिजे ,आल्यावर वायफळ बडबड, घरातील लोकांची निंदा, काळावेळाचे भान नसणे, घरी जायचा पत्ताच नाही, अशा लोकांशी मैत्री कधीच होवू शकत नाही.

आता आता माझी एक मैत्रीण अगदी जीवाला जीव देणारी, आमच्या नवीन घरी आल्याने उदास झाली आम्हाला ही तिला सोडून येताना खूप वाइट वाटले. झाले असे की आम्ही राहते घर काही अडचणी असल्याने पाडून नवीन घर बांधून काढायचा विचार केला. आम्हाला आमचे राहते घर सोडून भाड्याने घर घ्यावे लागले, मग या मैत्रीणीला फोन केला, तिने पूर्ण मैत्री पणाला लावून छान घर ही मिळवून दिले,शिवाय वर्ष भर पूर्ण साथ दिली, जिथे म्हटले तिथे माझ्या सोबत आली. एका नातेवाईकाचा जेवढा आधार नसेल पण तिने पूर्ण साथ दिली. मी कुठे ही गेले तर तिनं माझ्या मुलीला पूर्ण कंपनी दिली, आम्हाला रात्री उशीर व्हायचा यायला पण ती आनंदाने सर्व तिच्या घरचे पण  सांभाळून हीचा पूर्ण पणे साथ देऊन मस्त पैकी गप्पा मारत असायची आनंदाने.अशी निस्वार्थ मैत्री मिळेल का कुठे?तर असे आहे मैत्री सारखे सुख जगात नाही, मैत्री असावी तर अशी.आहेत का तुम्हाला ही अश्या जीवाभावाच्या मैत्रिणी?काय म्हणता आहे ?मग शेअर करा की.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू