पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

परतीच्या वाटेवर

   परतीच्या वाटेवर

स्तब्ध उभी मी अशी एकली

पाऊल पाऊल जडशीळ झाले

अस्तित्वाचे सारे ओझे

पाठीवरती पेलून आले.

मावळतीच्या खुणा येऊनी

एक अनोखी साद घालती

सांजसावल्या कातरवेळा

अनाम हुरहूर देऊन जाती.

मागे अस्ताव्यस्त पसारा

सोस मला तो आवरण्याचा

निरोप घेतानाचा क्षण तो

मौन पाकळीतून मिटण्याचा

एक तिरमिर उरात घेऊन

उठते मी अन् सावरते

स्वैरभैर धावताच मन हे

लगाम त्याचा खेचू बघते.

सुखदुःखाची वीणही आता

इथे तिथेही उसवून गेली.

विरून गेले वस्त्र तयाला

कशीच यावी नवी झळाळी?

मूळी जमेना आवर सावर

तळ्यात-मळ्यात करते हे मन

संभ्रमात मी पडले आता

निरोपणारा कुठला तो क्षण.....

                रेखा मिरजकर खारघर

                    नवी मुंबई

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू