पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्ताने

मुलं लहान आहेत.  शिक्षकाच्या काम केवळ मुलांना शिकवण नसून त्या विद्यार्थ्यांना प्रगल्भ करणं हे  आहे. 

 तिसरी ते सातवी पर्यंत ची मुले आहेत.  आणि जर ती देवासारखे बसायला लागली नक्कीच कुठेतरी चुकत आहे.  ही मुलं नैसर्गिकरीत्या चंचल असणारच शाळेतच त्यांचा गोंधळ उडतो.  काही मुलांना सतत पेन्सिलीला टोक काढण्याची सवय असते. 

 अरे प्रत्येक मुलाची ग्रहणशक्ती.  आणि ग्रहण करण्याची पद्धत ही वेगळीच असते. 



एखाद्या मुलाला ऐकून चांगलं समजतं वाचण्यापेक्षा,  एखाद्या मुलाला वाचून चांगलं कळतं ऐकण्यापेक्षा किंवा बघण्यापेक्षा. 

 सर्वसामान्य मुलगा तिनी पद्धतीचा सारखा उपयोग करत असतात आणि त्यांची कपॅसिटी सारखी असते.  ही मुलं तुमच्या आमच्यासारखी 50 ते 75 टक्के वाली. 



 शिक्षक शाळेत सर्वांना नी:पक्षपाती एकाच पद्धतीने शिकवत असल्यामुळे मुलांना त्यांच्या आकलन  शक्ती आणि आकलन पद्धती प्रमाणे  कमी अधिक मार्क मिळतात. 

 ऑनलाइन शिकवत असताना ही समस्या अधिक गंभीर होते.  वर्गात कसे शिक्षकांचा शेवटच्या भागापर्यंत लक्ष जातं.  ऑनलाइन मध्ये समस्या आणखी गंभीर होते.   कारण आकलन शक्ती बरोबर आणि ग्रहण करण्याच्या पद्धती बरोबर  नेटवर्क कंनेक्टिविटी ही आणखीन गंभीर समस्या जन्म घेते. 

 मधली वाक्यं  मिस होऊ शकतात.  आम्ही काय करतो.  समजा सगळ्यांचे तिसऱ्या पॅरेग्राफ मधलं चौथ वाक्य मीस  झालं,  आम्ही अख्खा  तिसरा पॅरेग्राफ परत घेतो.  मुलं  वैतागून सांगतात सारे झालं होतं  आमची लेक्चर वाढली,  हरकत नाही त्यांना योग्य ज्ञान मिळणे हा  त्यांचा हक्क आहे. 


 शाळेत  आपण कसे फळ्याकडे बघत असतो खाली बघून लिहीत  असतो परत फळ्या कडे बघत असतो काही बघून लिहीत असतो,  सतत हालचाल होत असल्याने.  मुलं थकतात  पण पेंगत नाहीत.  ऑनलाईन मध्ये मुलं सतत स्क्रीनवर बघत असतात. 

 मुलांच्या डोळ्यांना थकवा येतो. मुलं पेंगतात पण. 


 दर  20 मिनिटानंतर,  मी मुलांना डोळे मिचकावायला   सांगतो.  व मुलांना पाणी प्या आणि हलकं होऊन यायला सांगतो. 

 मुलं सतत ॲक्टिव्ह राहतात.  त्यांची ग्रहण शक्ती वाढते. 

 ऑनलाईन  मध्ये गणित सर्वात चॅलेंजिंग असतो. मुलांना 

  म्हणाल्या म्हटल्याप्रमाणे टेक्स्ट बुक उघडा पीपीटी बघा कंपास उघडा,   त्यांची तारांबळ उडते आणि ते होऊ द्यायचे नसल्यास विषय  कुठलाही असो,  टेक्स्टबुक बरोबर पीपीटी किंवा ॲडिशनल पीडीएफ फाईल,  आदल्या  दिवशी किंवा ऑनलाइन लेक्चर सुरू होण्याआधी पंधरा मिनिट मुलांना देतो मुळे त्यांची तारांबळ उडत नाही.  काही मुलं फटाफट जातात.  काही मुलं ही पाच ते दहा मिनिटे मागे रेंगाळतात.  त्यावेळी त्यांच्यासाठी थांबलं पाहिजे.  एखादा मुलगा सतत रेंगाळत असेल किंवा सतत पाठी  पडत असेल.  तर बाकीच्यांचं ऑनलाइन शिकून  झाल्यानंतर,  त्या मुलाला  अधीक 10-15 मिनिट देणे गरजेचे आहे.  जेणे करून तो त्याचं राहिलेलं कम्प्लिट करील. 


 कधीकधी नेटवर्क  खूपच खराब असतं,  जन नवीन चाप्टर घेणे शक्य नसल्यास,  आधीच्या धड्याची  थोडी थोडी उजळणी केल्यास वेळ मार्गी लागतोच,  मुलाचे ज्ञान भक्कम होते.  शाळेतले शिक्षक असो  किंवा क्लास मधले शिक्षक असो,  त्यांना योग्य ज्ञान मिळणे त्यांचा हक्क आणि शिक्षकाचे कर्तव्य आहे. 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू