पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विशी ते पंच्यांशी


                "  विशी ते पंच्याशी  "
               दूर झालो तरी बंधन सुटत नाही , नवीन नाती जोडली तरी जुनी नाती तशीच राहतात , नातं फक्त रक्ताचे जरूरी नाही , मैत्री च नातं खूप छान असतं . त्यात काही स्वार्थ नसत फक्त प्रेम असतं . एक मैत्रिण असावी कधीच न रागावणारी आणि नेहमी आपली बाज़ू घेणारी . रोज़ बोलणारी नसली तरी अडचणीत धाउन येणारी हवी अश्याच या दोघी मैत्रिणी ......
            अरे कुणी शशिकला ला बारस्या च़ा निरोप देता का ... अरे वहिनी तुमची मैत्रीण  बाहेर आली आहे तुमीच़ सांगा ..तेवढ़्यात शशिकला आत आली.. अगं बेबी तुला वाढदिवसाच्या  शुभेच्छा ...बेबी तू माझ्या नावाने कां हाक मारत होती .....अगं शशिकला उद्या माझ्या बाळाचं  बारसं आहे पण तुला निरोप दिला नाही तेच सांगत होते आणि तू आलिस ..
"अगं उद्या बारस आणि तू आज़ सांगते बेबी"..
"अगं आता काही बोलू नकोस न .उद्या तुला यायचं आहे बस्स "...
"बरं मग मी घरी ज़ाते काही तयारी  पण नाही गऽऽ
माझी "..
" बरं ज़ा पण उद्या लौकर ये  शशिकला " 
          "होग येते "...
               जशी  आली तशीच शशिकला परतली . बेबी पण ना मला पहिले सांगायच तर वेळे वर सांगते.. किती त्रास पडेल मला आता.. अशी भुणभुण करत शशिकला घरी आली..आल्या-आल्या घरात कापड़ शोधलं  लगेच कापून -  शिउन लेस ,शो बटन लाउन सुंदर झबल  शिवल गेलं . संध्याकाळी बाजारात जाऊन २ गज़रे आणि बाळा साठी खेळणं म्हणून छान  घोड़ा  घेतला . चला आता सर्व तयारी झाली .आता थोडा वेळ स्वस्त बसते ..
              दूसर्या  दिवशी शशिकला छान तयार हून गज़रा लाउन बेबी कडे पोहोचली . तिनं बेबी साठी पण गज़रा आणला होता तो तिला लाऊन दिला .  दोघी जुन्या सिनेमा च्या हिरोईन सारख्या दिसत  होत्या. दोघी सावळ्या पण फीचर्स एकदम शार्प  त्या  मुळे दोघी  दिसायला स्मार्ट ....
            बाळाचं  बारसं  व्यवस्थित झाले .शशिकला ने आणलेला घोड़ा आणि झबल बाळाला दिलं . बेबी ला दोन्ही खूप आवडलं ..
          तो काळ किती छान होता छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद असायचा .कोणी दिलेली छोटीशी 
भेटवस्तु पण मोठा आनंद द्यायची . मुख्य म्हणज़े
थोड़क्यात गोडी असायची ..
         काही १-२ वर्षांत बेबी इंदौर सोड़ून वेगळ्या ठिकाणी निघून गेली . इकडे शशिकला च़े पण लग्न झालं आणि ती पण बाहेर गावी  गेली . पहिले काळी फोन नसल्याने संवाद साधला जात नव्हता .त्यामुळे नात्यात थोड़ी रिक्तता येऊन जायची  पण मना मधे भावना नेहमीच खूप प्रबळ असायची .
          शशिकला चे दीर बाळ  ,आणि बेबी चे  दीर बाबी दोघं पक्के मित्र .लहान पणा पासून बरोबर शिकले . आता नौकरी करत होते . अजूनही त्यांची घट्ट मैत्री होती . 
आता काळ २०-२२ वर्ष पुढ़े गेला होता .  बाळ आणि बाबी ची मैत्री तशीच होती . एके दिवशी बाबी नी बाळ ला विचारले कारे शशिकला वहिनी ची मुलगी लग्नाची आहे ना ? माझा भाचा लग्नाचा आहे . तो डॉक्टर आहे..  
       मी विचारतो त्यांना मग तुला सांगतो ..बाळ  बोलला .
         मग काय तो बेबीचा मुलगा आणि शशिकला ची 
मुलगी . पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि लग्न ठरलं.लौकरच लग्न झाले . पुन्हा सगळे आपापल्या संसारात रमले . बेबी आणि शशिकला ची मैत्री तशीच होती . भेटल्या की दोघी जुन्या गोष्टीत रमायच्या . 
बेबी चे मुलगा - सून आता बेबी बरोबरच रहात होते . बेबी चे मिस्टर आता नव्हते . पुढे २५ वर्ष बेबी आपल्या नातवंडांन मधे गुंतली होती . शशिकला पण आपल्या परिवारात मग्न होती .
. आता छोटे - मोठे  आज़ारपण चालू असायचं. दोघी खूपच सहनशील आणि संकोची स्वभावाच्या ..भेटल्या कि एक मेकानां आप आपल्या दुखण्या बद्दल सांगत बसायच्या . शशिकला आपल्या घरी जायच़ बोलली कि बेबी तिच्यावर रागवायची . तुला काय काम आहे ,तिथे जाउन काय करशील ...एक दोन दिवस तरी शशिकला चे पुढे वाढायचे . 
एक दिवशी बेबी पडली आणि तिचे पायाचं फ्रेक्चर झाले .फीमर चे फ्रेक्चर  होते . घरीच पट्टा लावला गेला आणि दोन महिन्या साठी पलंगा वर झोपून रहाणे भाग़ होते . पण सहनशील खूप .  त्यात पण सतत  हाच विचार कि आपल्या मुळे कुणाला ही त्रास  नको व्हायला . सूने ला पण वाटायचं या किती.    सहन करतात कधीच काही डिमांड नाही कधीच काही कंप्लेंट नाही . कधी कधी सून म्हणायची आई तुमी किती सहन करता कधी तरी काही बोलत जा ,थोडी चिडचिड करत जा .पण कधीच बेबी ने कंम्प्लेन्ट केली नाही .
          थोडे थोडे दिवस मदतीला कुणी न कुणी 
येत असे पण आता प्लास्टर तीन महिन्या साठी झाले
प्रत्येकाला आपल्या घरी जावच लागणार . 
एक महिना  सहज़ निघाला . आता पडल्या- पडल्या
बेबीला कंटाळा यायचा .पण टी .व्ही . आणि वाचायची आवड होती त्या मुळे वेळ जात होता .                
                 आपल्या मुलीच्या मदतीला शशिकला काही दिवस  आली . मग काय दोघी मैत्रिणी आनंदात . आता त्यांचि मैत्री  ५० वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा फुलली होती   खूप गप्पा मारायला मिळाल्या होत्या .आता बेबीचे सर्व काम शशिकला ने घेतल होत . ८५ वर्षांची बेबी आणि ८० वर्षांची शशिकला . शशिकला जणु लहान झाली होती . बेबी चे काम धाऊन - धाऊन  करत होती . अगं शशिकला आता गुलाबी डबीतल्या गोळ्या दे ,आता लाल डबी च्या दे , आता पांघरूण घाल , आता चल दोघी चहा पिऊ  असं त्यांचं चालायचे . आता शशिकला चा  बेड़ पण बेबी बरोबर त्याच खोलीत लागला गेला . रात्री झोप नाही लागली कि  दोघी गोष्टी करत असायच्या . त्यांच्या गोष्टी एकाला कुणाला झोप लागल्यावर संपायच्या . 
        शशिकला चे ज़ायचे दिवस आले . तिला घरी जाणं जरूरी होतं . बेबी ला कळल्यावर लहान मुला सारखं  तिच सुरु  झाल !! तू नको जाऊ ,नको जाऊ . तू गेलिस तर माझं कसं होणार .
शशिकला ला पण खूप वाईट वाटत होते पण जाणं भाग होतं . ती  आपल्या मुली कडे खूप रडू लागली .आता मी कशी जाऊ बेबी ला सोडून . मला तिला सोडून जाणं खूप कठिण झाले आहे . तिला
लेकी ने समजून सांगितले आई तू काळजी नको करू त्यांच सर्व व्यवस्थित करू . बेबी ला पण वाटलं कि शशिकला ला मला सोडून जाण्यात त्रास होत आहे तेव्हा तिनी मनाची तयारी केली . सूने ला सांगितले आई ला साडी दे अशी माझी इच्छा आहे . मग शशिकला ला साडी दिली. आणि ती इंदौर ला निघाली ..
आता बेबी पण उठून बसु लागली होती तब्येतीत सुधारणा होती . महीन्या भरातच वाकर ने चालणं सुरु झाल . शशिकला रोज़ फोन करून बेबी बरोबर गोष्टी करायची . थोड्या दिवसात बेबी अगदी
छान बरी झाली .तरी तिचं सूने ला एक वाक्य असायचं
ज्या दिवशी तुला पराठा बनवून देईन त्या दिवशी मी खरी बरी झाले समजिन . शशिकला ला पण तेच कि अगं तू ये तर खरी आता मी तुला चहा करून पाजिन.......
             दोघींची मैत्री आहे ,हे सुरुवाती पासून माहित  होतं पण या काळात त्याची प्रगाढता  पहिल्यांदा जाणवली .
.       अशी या दोघींच्या  मैत्री ची मी साक्षीदार आहे . वीशी ची मैत्री मी  ऐकली होती  आणि पंच्यांशी ची स्वतः अनुभवली .मी म्हणजे शशिकला ची मुलगी आणि बेबी ची सून........                         
                      सुनिता गोगटे ड़गांवकर 
                          २३जुलाई 

 


 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू