पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

धन्य नामदेव

????????????????????????????????????


    अभंग रचना


      ६|६|६|४


     धन्य नामदेव 


देवाचा लाडका । असे नामदेव।

केली उठाठेव । देवानेही ॥१॥


नैवेद्य खावया । हरी स्वये आला।

 आनंदात न्हाला । नामदेव॥२॥


तुम्ही आम्ही सारे। किती भाग्यवंत। 

थोर पुण्यवंत । संत लाभे॥३॥


जयाचिया साठी।  देव प्रकटला।

वंदन तयाला । मनोभावे॥४॥


धन्य नामदेव । थोर सारे संत।

मीपणाचा अंत। होवो आता॥५॥


गजानन करी । नामाचे भजन।

करावे पूजन । संतांचेच॥६॥


           ©️ गजानन तुपे

          96992 46358

                 मुंबई



आज आज संतश्रेष्ठ नामदेव महाराजांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने ही अभंग सेवा सर्व साहित्यिक, सारस्वत आणि संतांचे चरणी समर्पित करतो.

   ????जय हरी विठ्ठल????

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू