पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जाणितो सावता

  संत "सावता माळी" यांच्यावर अभंग रचना

 

काव्यप्रकार- मोठा अभंग

  वर्ण रचना ६/६/६/४


  शीर्षक - जाणितो सावता



कर्तव्या मानले। कर्म आणि धर्म।

 भक्तीचे हे मर्म। सांगे जगा॥१॥


जात माळियाची।नाम ते सावता। 

 करी बागाइता।भक्तिभावे॥२॥


कधी नाही केली।पंढरीची वारी। 

 प्रत्यक्ष श्रीहरी।घरी येई॥३॥


विश्वाचा नियंता।सर्व स्थळी आहे।

पिकांमध्ये पाहे। पांडुरंग॥४॥


जाणितो सावता।देह हा नश्वर।

कर्मात ईश्वर । उभा दिसे॥५॥


ऐकुनी भजन।डोले वृक्षवेली।

सावत्याची बोली।ऐसी होती॥६॥


गजानन सांगे।सावत्याचे गुण।  

 लेखणीचे ऋण। कसे फेडू॥७॥



 ©️ गजानन तुपे

    96992 46358

       Mumbai 


संत थोर संत सावता माळी आपल्या आयुष्यात कधीही पंढरीला गेले नव्हते.त्यांची भक्ती कर्म अधिष्ठित होती. पंढरीच्या विठू रायाची पालखी त्यांच्या घरी यायची अशी संस्थांमध्ये वदंता आहे.


अभंग सर्व संत सारस्वत आणि साहित्यिक यांच्या चरणी समर्पित...!!!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू