पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझ्या गोड आठवणी

बाहेर पाऊस पडत होता व मी मस्त आल्याचा चहा घेत बसले होते. विचार करता करता माझे मन अचानक माझ्या आयुष्यातील आंबट-गोड आठवणींमध्ये रमून गेले.  अशाच माझ्या जीवनातील काही गोड आठवणी. 

         आमच्या दोघांचे लव मॅरेज झाले होते .एका मैत्रिणीच्या लग्नात आम्हा दोघांची भेट झाली होती.  त्या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. जवळ जवळ एक दीड वर्षानंतर आमचे लग्न झाले.  तोपर्यंत आम्ही त्या वेळी एकमेकांना पत्र लिहित होतो. तेव्हा मोबाइल वगैरे नव्हते ना.  त्यामुळे पत्रांमधून च आमची ओळख पक्की झाली. 

             राम खूप छान मराठी आर्टिकल्स वगैरे लिहीत असत.  त्यांनी मला ते सर्व साहित्य वाचायला पाठवले होते.  मी सुद्धा शिकत असताना कविता वगैरे लिहायचे.  एकदा ते म्हणाले तुझ्या कविता मला वाचायला पाठव .मी देखील लागलीच माझी वही त्यांना नेऊन दिली.  व सांगितले की काही सुधार करायचा असल्यास सांगा. मी अभ्यास करता करता घाईतलिहिलेल्या त्या कविता होत्या.  आठ दिवसांनी यांनी एक मोठे पत्र लिहून ती वही परत केली. पत्रात माझ्या कवितांचे कौतुक तर होतेच, पण एकदम खड्या शब्दात व थोड्या कॉमेडी अंदाजात.  त्यांनी लिहिले होते "तुझ्या लिहिलेल्या कविता छानच आहेत पण....त्यात बरेच पण आहेत. एक तर तुझ्या कविता पिसाळलेल्या वाटतात .(अर्थात तुझे वय पाहता त्या अशाच असायला हव्यात.)  दुसरे आणि महत्वाचे म्हणजे तू या कविता कधी मासिकात पाठवल्यास तर कविता लिहिल्यावर संपादकाला शेवटी एक ता.क.पाठव .तो म्हणजे शेवटी ता. क. लिहून त्यासमोर सगळे चिन्ह आणि काही अनुस्वार लिहून खाली लिहून दे की जेथे ज्याची गरज असेल ते चिन्ह किंवा अनुस्वार लावून घ्यावे" .  तर अशाप्रकारे मला माझ्या पहिल्यावहिल्या कवितांना पहिलावहिला विनोदी प्रतिसाद मिळाला. 

              काही दिवसांनी पुन्हा एक पत्र पाठवले मी खोलले  तरआतून एक रुमाल निघाला मला कळलेच नाही ,रुमाल कशाला पाठवला? पण पत्र वाचले तर शेवटी परत एकदा ता. क. हा रुमाल सुनंदाचा, (सुनंदा यांचीलहान बहीण व माझी पक्की मैत्रीण) असल्यास तिला देऊन दे .तुला नंतर गिफ्ट आणून देईन.  खरंतर त्या दिवशी माझा वाढदिवस होता, म्हणून ते गिफ्ट होते .त्यावेळी असे छोटे छोटे गिफ्ट ही आमच्यासाठी फार मौल्यवान असायचे. 

               मी हाताने स्वेटर विणण्याचा व्यवसाय बऱ्याच वर्षापासून करते.  मला खूप ऑर्डर्स असायचे. एकदा आम्ही लोकरी घ्यायला गेलो असता,  त्या दुकानदाराला हे म्हणाले कोणी आणखी विणकाम करणारे मिळतील का? तो दुकानदार मला म्हणाला, "मॅडम ऑर्डर जास्त आहेत का ?कोणी मदतनीस हवा आहे का? "मी हसले व त्याला म्हणाले त्यांनाच विचार! तर हे मिस्किलपणे हसून त्याला म्हणाले, "अरे नाही माझे स्वेटर विणायचे आहे घरी तर माझ्या स्वेटरचा नंबर केव्हा लागेल काही सांगता येत नाही. तेव्हा मी  बाहेरूनच बनवून घेतो. " त्यांच्या स्वभावात मूळचीच विनोदी वृत्ती असल्याने आयुष्यातल्या अशा बऱ्याच गोड आठवणी आहेत. 

              असेच एकदा भाजी आणायला गेलो असता मी नेहमीप्रमाणे भाव करून भाजी घेतली .यांनी भाजीवाली ला पूर्ण पैसे दिले.  मी विचारल्यावर म्हणाले या गरीबांकडे भाव नको करत जाऊ, करायचाच असेल तर मोठ्या मॉलमध्ये करावा.  तेथे तर आम्ही एका जीन्स साठी दोन ते अडीच हजार ही देतो तिथे कुणी भाव करत नाही. मला ते पटले व मी त्या दिवसापासून भाव करणे सोडून दिले.  एकदा एक ठेलेवाला काही टिकल्या, बांगड्या, रबर बंड, क्लिपस् घेऊन आला. मी त्याच्याकडून सामान घेतले. काही 98 रुपये झाले. मी त्याला शंभर रुपये दिले.  व तो दोन रुपये देईल म्हणून उभे होते. तर त्यानी पाच रुपये दिले. मी त्याला म्हटले अरे 98 झाले. तर तो म्हणाला" मॅडम तुम्ही तर काही भावच केला नाही. काही बायका तर इतकी किचकिच करतात म्हणून आम्ही भाव जास्त सांगतो. तुम्ही हे पाच रुपये परत घ्या.  मला आश्चर्यच वाटले व यांचे म्हणणे पटले. खरंच गरिबा कडून भाव  करूच नाही. 

           तर अशा बर्‍याच आठवणी मनात आहे, लिहायला बसले तर शब्द सीमाही कमी पडेल बाकी पुन्हा नंतर कधी.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू