पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रॉपर डे

                       

                        " प्रॉपर डे "


आज 26 जुलै 2020 माझ्या मोठया  भावास अल्कोहोलिक ग्रुप मधील बर्थडे म्हणजे  " प्रॉपर डे " च्या मनःपूर्वक  शुभेच्छा. ज्या दिवशी आपण जोडले जातो त्या तारखेला ' प्रॉपर डे ' म्हणून ते साजरे करतात. 

सलग 5 वर्ष त्याने अतिशय सचोटीने, जिद्दीने  स्वतःसं  'दारू '  सारख्या भयंकर विषापासून दूर ठेवलं. ह्या सारखा आनंदाचा दिवस आम्हा सर्व  क्षीरसागर कुटुंबियांना कोणताच नाही. आमच्या घरातील प्रत्येकासाठी आठवणीतला  दिवस. त्याचे कारण म्हणजे आमच्या घरातला मोठा मुलगा माझा  भाऊ अरुण एका नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी एका संस्थेशी जोडला गेला होता.  त्या संस्थेचे नावे अल्कोहोलिक्स अनॉनिमस. जगभरात संस्थेचे उपक्रम चालू असतात. या संस्थेच्या मार्फत दारुडे, बेवडे  किंवा अल्कोहोलिक  काही म्हणा, पण 100% सुधारले जातात आणि सुधारले आहेत.याचा प्रत्यय म्हणजे माझा मोठा भाऊ  अरुण.  

वयाच्या 17 व्या वर्षा पासून त्याला दारू चे वाईट संगती मुळे व्यसन लागले होते. अक्षरशः आयुष्याची वाताहत केली होती. त्याच्यामुळे आमच्या सर्व नातेवाईक, मित्र मंडळी मध्ये कायम अपमानित व्हावे लागायचे.  आमची  सर्व इज्जत  त्याच्या व्यसना मुळे मातीमोल ठरली होती.  समाजात सम्पूर्ण कुटूंबातील सर्वांना त्याच्या एकट्यामुळे मान खाली खालावी लागत होती  दारू मुळे त्यानें कित्येकदा स्वतः ला  संपविण्याच्या प्रयत्न केला होता. सर्वत्र अतिशय वाईट अवस्था असायची त्याची. प्रेम  तर सोडा कुणी त्याला साधे हाक ही देत नसे. जो पर्यंत तो शुद्धीत  तो वर चांगला माणूस असायचा. अत्यन्त शांत  स्वभाव असणारा आणि प्रेमळ असा होता. पण दारू ने त्यास कुठेही तोंड दाखविण्यासाठी जागाच ठेवली नाही. 

वर्ष 2014  दिनांक 24 जुलै रोजी आमच्या घरी देवा सारखा,विश्वास सकपाळ,  भाऊचा जवळचा लहानपणीचा मित्र आला होता. त्याच्याशी बोलण्यातून कळाले कि तोही आता त्याचं कुटुंब सर्व एकत्र सुखात संसार करीत आहे. दारू पायी त्याची बायको मुलांना घेऊन गेली होती,  सरकारी नोकरी, जाण्याची वेळ आली होती. त्यास कुणी तरी चांगला मार्ग दाखवून  दारू पासून मुक्ती दिली होती. आई सर्व जीव एकवटून ऐकत होती. आणि त्यांस क्षणी आई ने  विश्वास भाऊस विनंती केली की तू  अरुण लाही  सुधार .  

आणि लगेचच  त्याने  स्वतः आपल्या पदर खर्चाने अरुण भाऊंस गोड बोलून 26 जुलै 2015 ला त्यांच्या  अकोला जवळील  वाशिम येथे " अल्कोहोलिक अनानॉमियस " च्या शिबिरात नेले. आणि आश्चर्य म्हणा अगर  चमत्कार त्या दिवसांपासून  तो  आज पर्यंत अरुण भाऊ ने " दारू ' च्या  थेंबाला देखील स्पर्श केला नाही.  सगळे  प्रयत्न हे त्याचे स्वतःचेच. कारण त्याने स्वतःचा आत्मविश्वास, दृढ निश्चय इतका प्रबळ होता की आम्हाला नवल वाटायचे. सोबत  विश्वासभाऊ  ची मोलाची साथ हि होतीच. 

एकमात्र नक्की की  अरुण भाऊ आज  5 वर्ष  सलग  दारू सारख्या व्यसना पासून मुक्त राहून सुखी, आनंदी झाला आहे. आज त्याचा सर्व कुटूंबातील प्रत्येकाला अभिमान वाटतो आहे. मुले छान शिक्षण घेतायेत. घरात आणि समाजात आदर दिला जातो. 

             चांगला माणूस म्हणून तो आज  इतरांनाही आवडतो आहे आणि आता तो  आपल्या सारख्या दारुड्या लोकांना सुधारण्यासाठी प्रयत्न करतो आहे.  त्याने त्याचं ते ध्येय केले आहे.  सलाम त्याच्या प्रामाणिक कार्याला, माणुसकीला.

समाजातील कित्येक कुटुंब  दारुड्या व्यक्ती पायी उध्वस्त झाली आहेत,  अशा लोकांना विश्वास भाऊ , अरुण भाऊ आणि त्यांच्या समुहातील सर्व मित्र  सुधारण्या साठी झटत आहेत.  त्यां सर्वांना  बळ,  देवो ही मनापासून  देवाला प्रार्थना.  

 दारुड्या हा माणूस आहे त्यांस सुधारण्या साठी आपण ही समाज म्हणून पुढे येऊन त्यास मदत करायला हवी, ही प्रत्येक मानवाची जबाबदारी आहे.                    

आमच्या संपूर्ण क्षीरसागर कुटुंबियांना 26 जुलै हा दिवस, वाईट आठवणीचें रूपांतर गोड, आनंदी आठवणी करून देतो. 


                            :  समाप्त :


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू