पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माप

माप


"अनुभव कडे चलतेस?" विनय ने विचारले. 
"हो" मला मनापासून आवडतं विनय आणि सुधा वहिनी कडे जायला. म्हणायला कलकत्ता भारताच्या पाच मोठ्या  शहरातलं एक शहर पण आमच्या करता नुसतीच गर्दी  ऐके गर्दी आपलं म्हणायला एकच घरं आहे ते म्हणजे विनयभावजींच.
ते पण इटावा उत्तरप्रदेशातले आणि आम्ही  पण,बरं दोघांची छान मैत्री आहे एकाच  कंपनीत  नौकरीला, हे सगळं  ठीक  आहे पण मला आवडते ती सुधाभाभी त्यांची गोड मुलं आणि बाबूजी.
सहा महिने झाले इथे बदली होउन कम्पनीचे क्वार्टर  शहरापासून लांब आणि कॉलनीच्या  एका टोकाला  आमचं क्वार्टर तर  दूसर्या टोकाला सुधाभाभीचं घर. भाषेचा पण गोंधळ रसगुल्ल्या सारखं गोल गोल गोड बोलणं जमत नाही. आम्ही  उत्तराखंडाची खडीबोली बोलणारे.
म्हणून  त्यांच्याकडे जायचं म्हटलं की मी उत्साहानं पटकन तयार  होते.
अनुभवने छेडलचं,"अगं,सेकंड शो च तिकिट  असलं तरं फर्स्ट शो च सांगावं लागतं तेव्हा  वेळेवर तैयार होणारी विनयकडे,जायचं म्हटलं की पटकन तैयार  होते." 
आता याला काय सांगायचं त्यांच्या  घरी जायचं म्हणजे काही फॅशन शो ला जायचे आहे का?त्यात साधीसुधी सुधाभाभी बाबूंजी समोर तिच्या डोक्यावरचा पदर उतरत नाही , तिथे कशाला हवा मेकॲप?
असो आम्ही  पोहचलो तरं घरात कोणी नाहीं बाबूजी एकटे बसलेले. 
आम्हाला पाहून  म्हणाले, "या या विनय सुनबाई  मुलं बाहेर गेलेत काही महत्त्वाची खरेदी करायला."
वाटलं उलटपावली परतावं पण बाबूजींनी थांबवलं सर्वात जास्त  एकटेपणा तरं त्यांना जाणवतोय.
आणि गप्पांच्या नादात बाबूजी  केव्हा  इटावाला पोहचले कळलंच नाहीं. 
"काय सांगू बेटा, इथं हाता वर हात ठेऊन बसलोय, तिथे इटावाला ही गोधुलीबेला म्हणजे गोरजमुहूर्ताची वेळ ..म्हणजे कसली घाई गडबडीची वेळ,  गुरं रानातून परतात ,आमची गौरी,गाय कोणाला  हात लाऊ देत नाही.
आमची एक एक म्हैस 10ते12किलो दूध एक वेळ देते. मी हरियाणा ला जाउन आणल्या होत्या.
आता मोठी सुन कुठे कुठे लक्ष ठेवेल?
घरी धान्याचे पोते येऊन पडले असतील, बटाटे आले असतील शेता वरुन. मोठा नोकरी, शेतीवाडी सगळं  संभाळून घेतो पण नातू अनिरुध्द खूप सांभाळून  घेतो.
आणि चावडीची गम्मत तर हरेराम बाजपाई आल्या शिवाय जमतच नाही काय आल्हा म्हणतो म्हणून सांगू?"
"बरं बाबूजी येतो आता" म्हणून उठलो आणि बाबूजी  इटावा हून कलकत्याला  परतले.खरं तरं बाबूजी इटावा  सोडून  कुठे गेलेच नव्हते, म्हणून आज ही त्यांच्या मनात शेतीची हिरवळ आहे डोळ्यात धान्याचे  सोनं लखलखतय, ते तरं सुधा भाभी एवढ्या मोठ्या  शहारात लहान  मुलांना  घेउन येणार  मुलगा कम्पनीत दिवसभर  कामाला म्हणून  सोबतीला आलेले
 परतीत मी अनुभवला म्हटलं  "विनय भैय्या ला सांग, बाबूजींना इटावा ला पाठवायला."
"वेडी आहेस का?
एक तरं किती ही चांगले संबंध असले तरी त्यांच्या मधे बोलणं योग्य नाही,दूसरं बाबूजींना काही तक्रार  नाहीं ,किती छान एडजेस्ट  केलंय त्यांनी."
 "हो तरीही."
"तरीही  काय? दोन बेडरुम्सचा  फ्लॅट आहे त्यातला एक बेडरुम  विनयनं बाबूजींना दिलाय  तिथेच कोपऱ्यात  चौरंगावर रामचरितमानस आणि हनुमान चालिसा ठेऊन  पूजा घर बनवलं त्यांना  काहीच  तक्रार  नाही."
" हेच  मला म्हणायचं की त्यांनी एडजेस्ट  केलंय आणि एडजेस्टिंग आयुष्याचा एक भाग  असू शकते अख्खे आयुष्य एडजेस्टिंग असू शकतं नाही,अनुभव."
"म्हणजे काय म्हणायचंय तुला?"
"हेच की बाबूंजीच्या मनाचं माप इटावाच्या मोकळ्या वाड्याचं आहे दोन बेडरूम्सच्या फ्लॅटच नाही."
"त्याचं वाड्यातील मोठं पूजा घरं त्यात ओल्या पंचात हनुमान चालिसा म्हणणारे बाबूजी, मग रोज बाळकृष्णाला लोणी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवणारे गाई म्हशींशी बोलणारे  इथे कसे मनापासून  खुश राहतिल?"
"तुझं बरोबर आहे पण होतील हळुहळु ओळखी." 
"ती ओळख असते अनुभव मित्रता  नाही त्यात सहवासाचा आपलेपणा  कसा येणार?
कारणं साठीच्या वयाच्या माणसाची स्थिती त्या  वृक्षा सारखी असते ज्याची मूळं खोलवर  आजूबाजूला पसरलेली असतात ते लहानसं रोपं राहत नाही की ऊपटून दूसरीकडे  लावलं तरी बहरेल ."
सगळ्यांच्या मानसिकतेचं आपापलं मापं असतं आणि त्या मापातंच माणूस खुश असतो.

डॉ. संध्या भराडे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू