पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्रीकृष्णाचा पाळणा




      द्वापारयुगी "ग्लानी" "धर्माला" 

     धर्म स्थापण्या जन्माला "आला"

     कान्हा-कन्हैया म्हणती तयाला  

   श्रीकृष्णा...... जो जो रे जो ...


       जाहला जन्म बंदि"खान्यात"

       गाठे मथुरा भर "पाण्यात"

       गोकुळ गाते गुण "गाण्यात" .१.

           श्रीकृष्णा जो जो रे जो...


    शिशुपाल, कंस "कर्दनकाळ"

      छेदली त्यांच्या कंठाची "नाळ"

   "चक्रपाणि" हा देवकी "बाळ" .२.

        श्रीकृष्णा जो जो रे जो...


        अष्ट-पत्नींचा जाहला "वर"

       द्रौपदीसाठी धावे "सत्वर"

       राधा म्हणाली तो "योगेश्वर" .३.

        श्रीकृष्णा  जो जो रे जो...



©️ गजानन तुपे


            काही स्पष्टीकरण देणे फार गरजेचे आहे.. म्हणून या ठिकाणी देत आहे... त्यातून खऱ्या अर्थाने सर्वांना समजणारा श्रीकृष्ण उलगडून सांगावासा वाटतो...


पाळण्याचे ध्रुवपद....


           द्वापार युगात माणसांना नात्यांची चिंता राहिलीच नव्हती... म्हणूनच कंसाने देवकीला बंदीखान्यात टाकले... म्हणूनच कौरवांनी पांडवांना वनवासात पाठवून पुन्हा न्याय मिळू दिला नाही...द्रौपदीचे वस्त्रहरण भर सभेत केले गेले....याठिकाणी हा "धर्म" नावाचा शब्द "माणुसकी" या व्यापक अर्थाने आपल्याला कळायला हवा... म्हणजेच माणसांमधल्या "माणसाचा" आणि माणुसकीचा अंत होत होता आणि खऱ्या अर्थाने मानवतावाद लोप पावत चालला होता. म्हणजेच कर आणि आली होती. म्हणून "द्वापारयुगात" श्रीकृष्णाचा म्हणजेच आपल्या लाडक्या कान्हा आणि कन्हैयाचा जन्म झाला असे मला याठिकाणी म्हणायचे आहे....


पहिले कडवे


            ज्या मुलाचा जन्म बंदिखान्यात झाला असेल. ज्या मुलाचे बालपण गाई म्हशीच्या शेणा-मुता सोबत पशुपालनामध्ये गेले आहे ....त्याने असंख्य खोड्या करूनही अख्या गोकुळाला स्वतःचे वेड लावले आणि त्याठिकाणी ते अख्ख गोकुळ त्या कृष्णाची स्तुती "गाणी" गाऊन करते आहे असे मला म्हणायचे आहे....


दुसरे कडवे


           शिशुपाल आणि कंस हे भगवान परमात्मा श्रीकृष्ण यांचे त्या जन्मातील (०म्हणजे अवतारातील)नातेवाईक होते....मात्र तरीही  त्यांच्या अनीतीला त्यांनी कधीही अभय दिले नाही... त्याउलट त्यांचा "वध" करून कधीही चुकीच्या गोष्टींची बाजू घेऊ नका .....  भले ते तुमचे कितीही जवळचे आप्तेष्ट किंवा नातेवाईक असले तरीही त्यांना अजिबात माफ करू नका... कारण त्यामुळे जनमानसात अनाचार आणि अत्याचार वाढत जाईल हा आदर्श घालून दिला..... जेव्हा रणांगणात अर्जुन विषाद वाटून "हतप्रभ" झाला होता...(ज्ञानेश्वरी -पहिला अध्याय अर्जुनविषादयोग..) तेव्हा ते उदाहरण देऊन... अत्याचार अन्याय आणि अनीतीचे अनुकरण करणाऱ्या जवळच्या लोकांनाही संपवावे लागते... असे भगवान परमात्म्याने अर्जुनाला श्रीमद्भगवद् गीतेमध्ये सांगितले... त्यासोबतच शस्त्राचा वापर न करणारा सुदर्शन चक्रधारी म्हणजेच "चक्रपाणी"  योग्य वेळ येताच... अन्यायाचा नाश करायला कसा तत्पर होता ....  ते याठिकाणी मला सांगायचे आहे...


तिसरे कडवे


      परमात्मा भगवान श्रीकृष्ण यांना आठ पत्नी होत्या. सगळ्यात पहिली म्हणजे वैदर्भीय कन्या रुक्मिणी (इथे फार मोठी गोष्ट सांगायची आहे... ती म्हणजे लग्न झाल्यावर भगवान श्रीकृष्णांच्या घरी आलेली रुक्मिणी त्यानंतर कधीही आपल्या माहेराला गेली नाही... आजकाल किती लोकांना जमेल... हे..??? हाही एक प्रश्नच आहे ना...) ते त्यांची आठवी पत्नी कालिंदी... अशी अशी एकूण आठ लग्ने  झाली... (स्वतःला सोडून इतर सात पत्नींचे स्वागत रुक्मिणीने केले बरं का....) तोच श्री कृष्ण पांचाली म्हणजेच पांडवांच्या पत्नीसाठी आणि त्याच्या लाडक्या कृष्णेसाठी (कृष्ण आणि द्रौपदी जेव्हा एकमेकांशी बोलत असत.. तेव्हा भगवान परमात्मा श्रीकृष्ण.. द्रौपदीला "कृष्णा" म्हणायचे..) तिच्या लज्जारक्षणासाठी..तत्परतेने धावला..... त्याच लाडक्या गोकुळातल्या कृष्णाला राधेने अनंत योगांची मालिका घडवून आणणारा तू योगांचा ईश्वर म्हणजेच "योगेश्वर" आहेस असे संबोधून त्यांच्या शिरावर "मोरपीस" खोचले होते... (जे "मोरपीस" भगवंताने आयुष्यभर आपल्या मस्तकी मिरवले...)


कवितेचा म्हणजेच पाळण्याचा संपूर्ण भावार्थ सांगून झालेला आहे..... भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी बुद्धी दिली तसे सादर केले .....


मनापासून धन्यवाद....


   ॥श्रीकृष्णार्पणमस्तू॥


    गजानन तुपे 

     मुंबई 

    96992 46358






पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू